Supriya Jadhav

Supriya Jadhav Welcome to Cooking And Traveling With Supriya page

92 year old Irani Cafe Mumbai click here
03/12/2025

92 year old Irani Cafe Mumbai click here

Dadar 92 year old Irani CafeAddress: Shrikant Lodge Tilak Rd near Tilak Bridge Dadar TT Dadar East Dadar Mumbai Maharashtra 400014Timing: 7:30 am–8 pm

Rock garden Nerul Navi Mumbai click here 👇🏻
18/11/2025

Rock garden Nerul Navi Mumbai click here 👇🏻

रॉक गार्डन

Amitabh Bachchan House Mumbai click here 👇🏻
17/11/2025

Amitabh Bachchan House Mumbai click here 👇🏻

Amitabh Bachchan House Mumbai Jalsa bungalow Juhu Mumbai

Jewel Park Of Navi Mumbai Nerul click here 👇🏻
14/11/2025

Jewel Park Of Navi Mumbai Nerul click here 👇🏻

jewel Park Of Navi Mumbai Nerul Address:- Sector 26 Nerul Navi Mumbai Maharashtra 400706Timing:- Morning 5am to 11am Evening 5pm to 9pmEntry ...

Cheapest price market in mumbai click here 👇🏻
11/11/2025

Cheapest price market in mumbai click here 👇🏻

CSMT Railway station Street Market Cheapest Price

Pancham puriwala Mumbai most popular and 177 year old restaurant click here 👇🏻
10/11/2025

Pancham puriwala Mumbai most popular and 177 year old restaurant click here 👇🏻

Pancham Puriwala Mumbai Popular Restaurant

६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा
02/10/2025

६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा

मोहनमाळस्त्रिया गळ्यात घालत असलेला एक अलंकार. हा सोन्यापासून बनविलेला असतो. हा तीन पदरी असतो.   #पारंपरिकदागिना  #दागिना...
21/09/2025

मोहनमाळ
स्त्रिया गळ्यात घालत असलेला एक अलंकार. हा सोन्यापासून बनविलेला असतो. हा तीन पदरी असतो.
#पारंपरिकदागिना #दागिना #मोहनमाळ

जोधळी माळ" किंवा जोंधळी पोत ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक दागिना आहे, जी जोंधळ्याच्या दाण्यांसारख्या सोन्याच्या किंवा चा...
21/09/2025

जोधळी माळ" किंवा जोंधळी पोत ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक दागिना आहे, जी जोंधळ्याच्या दाण्यांसारख्या सोन्याच्या किंवा चांदीच्या लहान मण्यांना एकत्र जोडून बनवली जाते. ही नाजूक आणि सुंदर दिसते आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून वापरली जाते.
जोंधळ्याच्या दाण्यांच्या आकाराचे लहान मणी वापरून हे दागिने बनवले जातात.
हे दागिने तीन पदरीपासून दहा पदरीपर्यंत उपलब्ध असतात, ज्यामुळे ते खूप नाजूक आणि आकर्षक दिसतात.

प्रतीकात्मक अर्थ: जोंधळे हे धान्य असून, समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या दागिन्याला विशेष महत्त्व आहे.
लोकप्रियता: जोंधळी पोत महाराष्ट्रात एक पारंपरिक आणि आवडता दागिना आहे.
#जोधळीमाळ #पारंपरिकदागिना #दागिना

ठुशी एक महाराष्ट्र राज्यात आढळणारा दागिना. हा दागिना स्त्रीया वापरतात. हा दागिना तनमण्या प्रमाणेच गळ्याभोवती बांधला जातो...
21/09/2025

ठुशी एक महाराष्ट्र राज्यात आढळणारा दागिना. हा दागिना स्त्रीया वापरतात. हा दागिना तनमण्या प्रमाणेच गळ्याभोवती बांधला जातो.ठुशीच्या मध्यभागी पाचू व माणिक रत्न देखील असतात . #ठुशी

नासिका भूषणे हा अलंकाराचा एक प्रकार आहे. शिरोभूषणे, कंठभूषणे, बाहुभूषणे आदींच्या तुलनेने पाहता पुरुषांपेक्षा स्त्रियांतच...
20/09/2025

नासिका भूषणे हा अलंकाराचा एक प्रकार आहे. शिरोभूषणे, कंठभूषणे, बाहुभूषणे आदींच्या तुलनेने पाहता पुरुषांपेक्षा स्त्रियांतच नासिकाभूषणे वापरण्याची प्रथा दिसून येते. हा अलंकारप्रकार स्त्रिया एका नाकपुडीत, दोन्ही नाकपुड्यांत किंवा दोन नाकपुड्यांच्या मधील पडद्याला अडकवितात. इतर दागिन्यांच्या मानाने नासिकाभूषणांचे आकार-प्रकार मर्यादित आहेत. त्यांपैकी नथ, बेसर, चमकी, बुलाक, लवंग लटकन, घुंग्री, बाला, फुली, कतिया, मोरपंखी, संपानगी, मौनरिया व पोगूल इ. प्रकार प्रदेशपरत्वे विशेष प्रचलित आहेत. सामान्यत: सोने, चांदी, तांबे, पितळ इ. धातू त्याचप्रमाणे जडावकामासाठी हिरे, माणिक, मोती इ. मौल्यवान रत्ने यांचा नासिकाभूषणांसाठी उपयोग करण्यात येतो. त्यांतील काहींची जडणघडण वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक स्वरूपाची असते. उदा., चमकी हा नासिकाभूषणांतील आकाराने सर्वांत लहान असा प्रकार असून तो सोन्यावर रवे पाडून तयार करण्यात येतो. चमकीचा वापर पूर्वी हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश इ. भागांत विशेष रूढ असला, तरी आता भारतीय स्त्रीवर्गात तिचा वापर सार्वत्रिक झाला आहे. सामान्यत: एकाच नाकपुडीत घालावयाची चमकी स्त्रिया प्रदेशपरत्वे डाव्या अथवा उजव्या नाकपुडीत घालतात.
महाराष्ट्रीय स्त्रिया चमकी आणि नथ डाव्या नाकपुडीत घालतात तर दाक्षिणात्य स्त्रियांत सामान्यत: हे प्रकार उजव्या नाकपुडीत घालण्याची रूढी आढळते. चमकीचा वापर कुमारिकांप्रमाणेच विवाहित स्त्रियाही करतात. घुंग्री हे चमकीप्रमाणेच पण थोडे मोठ्या आकाराचे, सोन्यावर रवे पाडलेले, गोलाकार व संकीर्ण आकृतिबंधाचे नासिकाभूषण असून त्याचा वापर विशेषत्वाने नेपाळी व सिक्किमी स्त्रिया करतात.
स्त्रियांचे विशेष आवडते व आकारप्रकारांच्या बाबतीत अधिक कलात्मक असलेले नासिकाभूषण म्हणजे नथ होय. नथ हा शब्द संस्कृतातील ‘नाथ’ म्हणजे वेसण या शब्दावरून आलेला असावा, नथीचे अनेक प्रकार आढळतात. पुष्कळदाएक मोठी कडी व तिच्यात गुंफलेले वा जडवलेले मणी किंवा मौलिक खडे असे तिचेस्वरूप असते. अनेकदा मोठ्या आकाराच्या कडीवजा अशा या नथीचा नाकपुडीवरीलताण कमी करण्यासाठी ती एका साखळीने स्त्रिया आपल्या केसांना बांधतात. कतिया हीएक अशीच सोन्याची साखळी असून तिचे एक टोक नथीला अडकविलेले असते, तरदुसरे टोक एका आकड्याने केसात अडकविण्यात येते. त्यामुळे नाकपुडीवर पडणाराताण कमी होण्यास मदत होते. महाराष्ट्रात सोन्याचा फासा असलेल्या तारेत सात किंवाअधिक मोती व मधोमध लाल रत्ने बसविलेली, असे नथीचे स्वरूप असते. नथीला ‘मुखरा’ अशीही संज्ञा आहे. नथ ही सामान्यत: एकाच नाकपुडीत घालतात. सौभाग्याची निदर्शक म्हणून विशेषतः सौभाग्यवती स्त्रिया नथ वापरतात. पोगूल हे नासिकाभूषण जवळजवळ नथीसारखेच असून कोरोमंडलच्या किनाऱ्यावरील पुरुषही त्याचा वापर करतात, असे दिसते तर नथनी म्हणून ओळखली जाणारी कडी एखाद्या ख्यातनाम व्यक्तीच्या नावाने मुस्लिम समाजातील मुलांच्या नाकात घालण्याची प्रथा आहे. बाला या नासिकाभूषणाचा आकार चंद्रकोरसदृश असून त्याला मोत्यांचे झुपके लावलेले असतात.त्याचा वापर लाहोर भागातील स्त्रियांत आढळतो. फुली वा बेसर ही नक्षीदार नासिकाभूषणे चमकीवजा पण किंचित मोठ्या आकाराची असून त्यांचा वापर प्रौढ स्त्रियाकरतात. बेसर या नासिकाभूषणाला कधी कधी हिरे-मोत्यांनी जडविलेला एक पट्टा असतो व त्यावर सोन्याच्या चकचकीत टिकल्या बसविलेला दागिना लोंबकळत ठेवतात.नथधागा हे एक वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णाचे गोलाकार नासिकाभूषण असून त्याला सोन्याच्यादांडीत मोती अडकविलेली एक साखळी लावलेली असते. बुलाक हा एक लहान लोलकअसून तो कधी नथीत तर कधी दोन नाकपुड्यांमधील पडद्याला अडकविण्यात येतो. नथ व तिच्यातील पर्णाकार बुलाक हे कुलू प्रदेशातील स्त्रियांचे एक वैशिष्ट्यपूर्ण नासिकाभूषण आहे. भारतात इतरत्र तसे नासिकाभूषण आढळत नाही. लटकन हा एक नथीतील लोंबणारा लोलक असून लवंग या अंलकारात मोत्याबरोबर वैडूर्य किंवा एखादा चमकदार खडा जडविलेला असतो.
मोरपंखी किंवा संपानगी ही दोन्ही नासिकाभूषणे ओरिसातील असून पहिल्याचा आकार मयूरसदृश असतो व त्यामध्ये तारेत तासकाम केलेले असते तर दुसऱ्याचा आकार पॅगोडासारखा असतो आणि त्याच्या साखळ्यांना सु. २·५४ सेंमी.चेएक वेधक पिंपळपान अडकविलेले असते. मौनरिया हे राजस्थानी नासिकाभूषण म्हणजेमोठ्या आकाराचे गोल कडेच असून त्याचा आकार व सजावट पुष्पगुच्छसदृश असते.याचा वापर बहुधा लग्नसमारंभप्रसंगी विवाहित स्त्रियाच करतात. काश्मीरमधील गोलाकार नासिकाभूषणांत मात्र नक्षीकाम व कलाकुसर बरीच केलेली असून त्याला गोंडे लावलेले असतात तर काही वन्य जमातींतील स्त्रियांच्या नासिकाभूषणांमध्ये मोठ्या आकाराच्या कड्यात मणी आणि खडे बसविलेले असून या कड्यांनाच दोन्ही नाकपुड्यांच्या मधोमध लोंबकळणारी पदकेही लावलेली असतात. तमिळनाडूकडील नासिकाभूषणे ही कुलूप्रदेशातील नासिकाभूषणांच्या धर्तीवर दोन नाकपुड्यांच्या मधोमध घालण्याची पद्धत आहे.

इ. स. पू. १००० च्या काळातील नासिकाभूषण
संपादन
इ. स. पू. १००० च्या सुमारास हिब्रू स्त्रियांमध्ये एक वा अनेक नासिकाभूषणे घालण्याची प्रथा असल्याचे म्हणले जाते. तसेच आपले सामाजिक स्थान व प्रतिष्ठा दर्शविण्यासाठीही आफ्रिकेतील काही टोळ्यांमधील विवाहित स्त्रिया नाकात कडे अडकवीत तर काही स्त्रिया नाकपुडीत साळूची पिसे घालीत आणि काही टोळ्यांत हस्तिदंती नासिकाभूषणे घालण्याची पद्धत असल्याचेही उल्लेख सापडतात. भारतातील प्राचीन शिल्पे व भित्तिचित्रे यांतून नवव्या शतकापर्यंत तरी नासिकाभूषणे दिसत नाहीत. तसेच त्यांचे उल्लेखही अभिजात साहित्यातून आढळत नाहीत. नथ हा नासिकाभूषणातील एक महत्त्वाचा प्रकार असून हिंदू स्त्रियांत तो सौभाग्यालंकार म्हणूनच रूढ होऊन बसला आहे.तथापि ‘नथ’ शब्दाऐवजी दहाव्या शतकानंतरच्या संस्कृत साहित्यात ‘नासाग्रमौक्तिक’, ‘नासाग्रमुक्ताफल’ वा ‘मौक्तिक नासिकायाम्’ असे उल्लेख आढळतात. त्यामुळे नवव्या-दहाव्या शतकांनंतरच भारतात ‘नथ’ हा अलंकारप्रकार मुसलमानांच्या संपर्काने आला असण्यासाठी शक्यता काही विद्वानांनी दर्शविलेली आहे.

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Supriya Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share