07/11/2025
भिवंडीतील सरवली एमआयडीसीत भीषण आग | Bhiwandi | Fire
कल्याण रस्त्यावरील सरवली गोवा MIDC परिसरात 7 नोव्हेंबरला भीषण आग लागली. एमआयडीसीतील मंगलमूर्ती डाईंग कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास ही आग लागली. कपड्यांवर रंग प्रक्रिया करणाऱ्या या तीन मजली कंपनीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ठेवलेल्या मोठ्या प्रमाणातील कपड्यांच्या साठ्याला आग लागल्याने आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केलं. या घटनेनंतर तातडीने अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण समजलेले नाही.