Konkan Times

Konkan Times कोंकणातील सगळ्यात मोठ डिजिटल बातमीपत्र

वंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून स...
01/07/2023

वंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?

Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसणार आहे.

Mumbai Goa Vande Bharat Express : कोकण रेल्वे मार्गावर मोठा गाजावाजा करत वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली आहे. सुपरफास्ट रेल्वे म्हणून तिला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वंदे भारत एक्प्रेसमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या महत्त्वाच्या 5 गाडया सायडिंगला पडणार आहेत. त्यामुळे या गाड्यांतून प्रवास करणाऱ्यांना काहीसा उशीर होणार आहे.

मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसणार आहे. वंदे भारत बाजू देण्यासाठी या गाड्या सायडिंगला टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना ताटकळत राहावे लागणार आहे.

वंदे भारत एक्प्रेस मुंबईतून पहाटे 5.25 वाजता सुटणार असून मान्सून वेळापत्रकाप्रमाणे दुपारी तीनच्या सुमारास तर एरवी दुपारी एक वाजता मडगावला पोहोचणार आहे. त्यामुळे या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या गाड्यांना नेहमी सायडिंगला टाकले जाणार आहे. यामध्ये नागपूर-मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस या गाड्या थांबवून ठेवण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव तेजस एक्स्प्रेस या गाडीलाही नेहमीच लेटमार्क लागणार आहे. तसेच दुपारी मडगावहून मुंबईसाठी सुटणारी तेजस एक्स्प्रेसही सायडिंगला पडणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

वंदे भारत सुरु झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारचे बुकिंग फुल्ल झाले होते. या पहिल्या फेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेन क्रमांक 22229 सीएसएमटी-मडगाव वंदे भारत या एक्प्रेसचे बुकिंग फुल्ल झाले आहे. सायंकाळपर्यंत चेअर कारच्या 512 पैकी 463 सीट बुक झाल्या होत्या, तर एक्झिक्युटिव्ह कोचमधील सर्व सीट बुक झाल्यात.

या गाड्यांना वंदे भारतचा फटका
वंदे भारत एक्प्रेसला कोकण रेल्वे मार्गावर प्राधान्याने ट्रॅक उपलब्ध करून घ्यावा लागणार असल्याने पाच गाड्यांना फटका बसणार आहे.

ट्रेन क्रमांक - 01139 कल्याण-मडगाव
ट्रेन क्रमांक - 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव
ट्रेन क्रमांक - 12618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक - 22119 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-तेजस एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक - 22120 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस

वंदे भारत : मुंबई ते मडगांवपर्यंत प्रत्येक ठिकाणचा तिकिट दर पाहा
मुंबई CSMT - मडगाव - एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये

मुंबई दादर - मडगाव - एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये

मुंबई CSMT - रत्नागिरी - एसी चेअर कार -1120 रुपये आणि EC Executive Class साठी 2125 रुपये

पनवेल - रत्नागिरी - सीसी एसी चेअर कार -1010 रुपये आणि EC Executive Class साठी 1900 रुपये

रत्नागिरी - मडगाव - एसी चेअर कार -1055 रुपये आणि EC Executive Class साठी 1880 रुपये

मुंबई CSMT - कणकवली - एसी चेअर कार -1365 रुपये आणि EC Executive Class साठी 2635 रुपये

पनवेल - कणकवली - सीसी एसी चेअर कार -1270 रुपये आणि EC Executive Class साठी 2450 रुपये

कणकवली - मडगाव - एसी चेअर कार - 790 रुपये आणि EC Executive Class साठी 1355 रुपये

मुंबई CSMT - मडगाव - एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये

पनवेल - थिविंम - सीसी एसी चेअर कार -1660 रुपये आणि EC Executive Class 3015 रुपये

कोकणातील घरं प्रचंड पावसातही इतकी मजबूत कशी? मातीची घरे टिकतात कशी?तुम्ही कधी हा विचार केलाय का की, एवढ्या प्रचंड पावसात...
12/06/2023

कोकणातील घरं प्रचंड पावसातही इतकी मजबूत कशी? मातीची घरे टिकतात कशी?

तुम्ही कधी हा विचार केलाय का की, एवढ्या प्रचंड पावसात कोकणातील घरं इतकी मजबूत कशी? कोकणात पावसात मातीची घरे कशी टिकतात? याचं प्रश्नांची उत्तर सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताय.

सह्याद्रीच्या माथ्यावर असलेलं तांबेड नावाचं गवत, खार्वी, बांबू आणि नारळाची झावळी अशा नैसर्गिक वस्तू वापरुन भक्कम भिंती उभ्या करत कोकणातली ही घर उभी केली जातात. निसर्गातील ही रान माणसे आपल्या घरांना मुलांप्रमाणे जपतात. निसर्गाशी एकरुप होऊन त्याचं संगीत गात असतात. निसर्गाचा वापरच निसर्गाचं संवर्धन करायला माणसाला शिकवतो. कोकणात प्रचंड पाऊस असतो अशावेळी, हे पाणी घरांच्या भिंतीमध्ये झिरपु नये यासाठी कोकणात विशिष्ठ रचनेची घरे बांधली जातात. घरांना शेणानं संपूर्ण आतून-बाहेरुन सारवलं जातं.

गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांना लाटेचा तडाखागणपतीपुळे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळाचा प्रभाव कोकणच्या...
12/06/2023

गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांना लाटेचा तडाखा

गणपतीपुळे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळाचा प्रभाव कोकणच्या किनारपट्टीवर जाणवत असून, गणपतीपुळे येथे किनार्‍यावर असलेल्या पर्यटकांना लाटांचा दणका बसला. या लाटांमुळे येथील काही स्टॉलमध्येही पाणी शिरून विक्रेत्यांचे नुकसान झाले.
यंदा मान्सून लांबला असला तरी बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळला आहे. समुद्रात 10 ते 11 फूट उंचीच्या लाटा उसळत असून, याचा तडाखा किनारपट्टी भागाला बसत आहे.

रविवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास उधाणाच्या लाटेचा दणका गणपतीपुळेत आलेल्या पर्यटकांना बसला. येथील कठड्यावर हे पर्यटक बसले होते. अचानक आलेल्या लाटेने ते समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. तेथे असलेल्या अन्य लोकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. या घटनेत पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली. या लाटेमुळे समुद्राचे पाणी नजीकच्या स्टॉलमध्येही शिरल्याने विक्रेत्यांचेही नुकसान झाले.

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करताय? तपासून घ्या तुमच्या गाडीची वेळ!कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागूरत्नागिरी :...
11/06/2023

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करताय? तपासून घ्या तुमच्या गाडीची वेळ!

कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू
रत्नागिरी : कोकणात कोसळणारा मुसळधार पाऊस लक्षात घेऊन मागील अनेक वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक लागू केली जाते. या कालावधीत बिगर पावसाळी वेळापत्रकाच्या तुलनेत अनेक गाड्यांच्या वेळेमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची वेळ तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून वेळोवेळी करण्यात आले आहे.

पावसाळी वेळापत्रकानुसार धावणाऱ्या गाडीने प्रवास करताना प्रवाशांनी आपल्या गाडीची वेळ तपासून घ्यायची आहे. आरक्षणावर तसे नमूदही केलेले असते. मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि शनिवारसारख्या घटना घडतात.
शनिवारी 10 जून रोजी कोकण रेल्वेच्या मार्गावरील गाड्यांना लागू झाले. खरे तर पावसाळी वेळापत्रक हे कोकण रेल्वेसाठी नवीन नाही. तरीही जेव्हा हा बदल होतो तेव्हा प्रवासाला निघताना गाडीची सुधारित वेळ तपासून न घेतल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. असाच गोंधळ रत्नागिरीत शनिवारी मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या बाबतीत उडाला. यामुळे अप जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे जाणाऱ्या 50 हून अधिक प्रवाशांची ट्रेन चुकली.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रेल्वे कडून सुधारित वेळेचा एसएमएस येणे अपेक्षित आहे, तो न आल्यामुळे आमची गाडी चुकली. रत्नागिरी स्थानकावर घडलेले या प्रकारामुळे गाडी चुकलेल्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांशी उचलत घातली.

पावसाळी वेळापत्रक लागू व्हायच्या आधी जर कुणी कोकण रेल्वे मार्ग देणाऱ्या गाडीचे आरक्षण केले असेल, तर त्यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीची सुधारित वेळ तपासून घ्यायची आहे. मात्र अनेक प्रवासी या सूचनेकडे दुर्लक्ष करतात आणि असा गोंधळ उडतो. असा अनुभव याआधी देखील पावसाळी वेळापत्रक लागू झाल्याच्या पहिल्या दिवशी आलेला आहे.
शनिवारी अशाच गोंधळामुळे गाडी चुकलेल्या प्रवाशांचा अनुभव लक्षात घेता, जर कुणी कोकण रेल्वे मार्गे जाणाऱ्या गाडीचे आगाऊ आरक्षण केले असेल तर प्रवासाला निघण्याआधी त्यांनी का आपल्या गाडीची वेळ तपासून घेणे गरजेचे आहे. असे न केल्यास तुमची देखील गाडी चुकू शकते.

‘कोरे’ मार्गाने धावत जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पाहत बसणे राजापूरवासियांच्या नशिबी!राजापूर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ...
11/06/2023

‘कोरे’ मार्गाने धावत जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पाहत बसणे राजापूरवासियांच्या नशिबी!

राजापूर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोकणात रेल्वे आणण्यासाठी ज्या तत्कालीन राजापूर लोकसभा मतदारसंघाने अत्यंत महत्त्वाचे भूमिका बजावली त्या राजापूर मतदारसंघातील रेल्वे स्थानक आणि प्रवासी जनतेच्या सोयी सुविधांबाबत रेल्वेला विसर पडला आहे. ओडिशामधील भीषण रेल्वे दुर्घटनेमुळे सेवा लांबणीवर पडलेली वंदे भारत एक्सप्रेस देखील राजापूरवासीय जनतेला केवळ पाहत बसावी लागणार आहे. गाड्यांना थांबे देण्याच्या बाबतीत राजापूरवर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रिया या निमित्ताने राजापूरवासीय प्रवासी जनतेने व्यक्त केल्या आहेत.

कोकणात रेल्वे यावी म्हणून तत्कालीन राजापूर लोकसभा मतदारसंघाने संसदेत महत्वाची भूमिका बजावली त्या राजापूरवर मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने सातत्याने अन्यायच केला आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेसला राजापुरात थांबा नाकारून तालुकावासीच्या पदरी घोर निराशा पडली आहे. यामुळे ‘कोरे’ मार्गावरुन धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस पहाणे एवढेच तालुकावासीयांच्या नशीबी आले आहे. दरम्यान राजापूर स्थानकात वंदे भारतला थांबा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी तालुक्यातुन वाढू लागली आहे.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share