12/01/2024
अट्टल सोनसाखळी चोर, गुन्हे शाखा घटक-२ भिवंडीकडून जेरबंद पोलीस आयुक्तालयातील १९ गुन्हे उघडकीस आणि २३,८९,०००/-रू.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हे शाखा घटक-२ भिवंडीची दमदार कामगिरी
ठाणे पोलीस आयुक्तालयात सोनसाखळीचे चोरीचे गुन्हयांना आळा घालून, घडलेले गुन्हे उघडकीस आणणेकामी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे व मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे यांनी आदेश दिले होते. त्याअनुषंगाने मा.सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे, ( शोध - १), ठाणे यांच्या सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी गुन्हे शाखा ठाणे अंतर्गत विशेष मोहिम राबवून, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार केले होते.
गुन्हे शाखा घटक-२ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गोपनीय सुत्राकडून मिळालेल्या बातमीचे आधारे,सराईत इराणी टोळीतील सक्रिय सदस्य आणि अट्टल सोनसाखळी चोर अब्बास शब्बर जाफरी, वय २३ वर्षे, रा.ठि. रूम नंबर १, पहीला माळा, अय्याज बिल्डींग, खान कंम्पाउंड, मुंजा बिल्डींगच्या बाजुला, शांतीनगर, भिवंडी, जि. ठाणे यास दिनांक ०३/०१/२०२४ रोजी २२.०० वा. ताब्यात घेवून, त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करून, ठाणे पोलीस आयुक्तालयात वेगवेगळया पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरी सह मोटार सायकल चोरी व मोबाईल फोन चोरीचे दाखल असलेले एकुण १९ गुन्हे उघडकीस आणून, ३०६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ०३ मोटार सायकल, ४ मोबाईल फोन असा एकुण २३,८९,०००/-रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक-२ भिवंडीकडून करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक - २, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन गायकवाड, सपोनि / धनराज केदार, सपोनि / सचिन ढोके, सपोनि / श्रीराज माळी, पोलीस उप निरीक्षक / राजेंद्र चौधरी, निसार तडवी, हनुमंत वाघमारे, सपोउपनि/रविंद्र पाटील, राजेश शिंदे, पोहवा /अमोल देसाई, सुनिल साळुंखे, देवानंद पाटील, मंगेश शिर्के, रंगनाथ पाटील, साबीर शेख, किशोर थोरात, शशीकांत यादव, सचिन साळवी, वामन भोईर, राजेंद्र राठोड, प्रकाश पाटील, सचिन सोनावणे, मपोहवा/श्रेया खताळ, माया डोंगरे, पोना/सचिन जाधव, पोशि / अमोल इंगळे, उमेश ठाकुर, जालींदर साळुंके, भावेश घरत, नितीन बैसाणे, चापोशि / रविंद्र साळुंके यांनी केली आहे.
नमुद अटक आरोपी यांच्याकडुन उघडकीस आलेले गुन्हे व हस्तगत मालमत्तेची माहिती खालीलप्रमाणे आहे.