15/01/2023
कुणबी युवा प्रतिष्ठानकडून
शालेय विद्यार्थांना उपयोगी वस्तूंचे वाटप
कुणबी युवा प्रतिष्ठान(रजि.) ही संस्था ही नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय उपक्रम घेऊन समाजाप्रती असणारी बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते.
आपल्या याच लौकिकाला जागत २०२३च्या सुरुवातीलाच दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पूर्वप्राथमिक मराठी माध्यम शाळा, हातिप, पूर्वप्राथमिक इंग्रजी माध्यम शाळा, हातिप, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी माध्यम शाळा, ताडील सायटेवाडी मराठी माध्यम,आंगणवाडी मराठी माध्यम शाळा, किन्हळ,जिल्हा परिषद मराठी माध्यम, करजगांव या शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना संस्थेकडून शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कुणबी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार गौरत, सचिव प्रमोद सुभाष खेराडे, खजिनदार अनुज विष्णू चव्हाण, सभासद चेतन नामोळे, संतोष पांढरे, सचिन चिपटे, निलेश जनार्दन पानकर, जयकुमार गौरत, सागर मांजरेकर, दत्ताराम रेमजे, यतिन पानकर, अंकुश शिंदे या शिलेदारांच्या साथीने कुणबी युवा प्रतिष्ठानचे सल्लागार दशरथ पाटील, संदीप राजपुरे आणि रवींद्र मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, दि. १३ जानेवारी, २०२३ रोजी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामध्ये सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, सर्व कर्मचारी, प्रत्येक गावाचे विद्यमान सरपंच, ग्रामीण सदस्य, पालकवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी कुणबी युवा प्रतिष्ठानचे सल्लागार, उद्योजक विजय नायनाक आणि कुणबी समोजन्नती संघ महिला अध्यक्षा सुवर्णा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच ज्या ज्या शाळेमध्ये कुणबी युवा प्रतिष्ठानने भेट दिली त्या शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना भविष्यातही काही आवश्यकता भासल्यास सढळहस्ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक शाळेतील भेटीमध्ये कुणबी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार गौरत, सचिव प्रमोद खेराडे, खजिनदार अनुज चव्हाण तसेच इतर पदाधिकार्यांनी कुणबी युवा प्रतिष्ठानबद्दल माहिती देत प्रतिष्ठानच्या ध्येय आणि उद्दिष्टे यांच्याबाबत माहिती दिली.