Digital Kesari

Digital Kesari “राजकारण ⚖️ | कला 🎭 | क्रीडा 🏏 | शेती 🌾 | संस्कृती 🪔 | विज्ञान 🔬
Real • Raw • Reality ⚡
तुम्ही फक्त पाहू नका… समजून घ्या”

12/09/2026

अंतरवालीत धाड टाका, अवैध दारू जप्त करा; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या घडामोडींवरून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. “अंतरवालीत धाड टाका, अवैध दारू जप्त करा,” अशी मागणी सदावर्ते यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून, त्यांनी अंतरवाली सराटी परिसरातील कथित अवैध दारूविक्रीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

12/09/2026

📚 पुतिन यांना PM मोदींची खास भेट; 2000 वर्षे जुन्या ‘तिरुक्कुरल’चा रशियन अनुवाद भेट

नवी दिल्ली येथे BRICS शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना प्राचीन तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरल’चा रशियन अनुवाद भेट दिला. संत-कवी तिरुवल्लुवर यांच्या या प्रसिद्ध ग्रंथात नैतिकता, शासन, न्याय, मानवी आचरण आणि जीवनमूल्यांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

मोदींनी ही भेट भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून दिली असून, भारत-रशिया सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचा संदेश यातून देण्यात आला.

TamilCulture CulturalDiplomacy DigitalKesari

11/09/2026

🌧️ तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही निसर्गापुढे माणूस हतबल!

अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने एका शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे या दृश्यातून दिसत आहे. रस्त्यांवर वेगाने पाणी शिरल्याने अनेक वाहने पाण्यात अडकली असून, नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं, तरी निसर्गाच्या रौद्र रूपापुढे माणूस किती असहाय्य आहे, याची जाणीव करून देणारे हे दृश्य आहे. 🌊😨

Rainfall ViralVideo WorldNews BreakingNews DigitalKesari

11/09/2026

जरांगेंच्या भेटीला अभिजीत दिपके!

CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली आणि आगामी आंदोलनाबाबत काय रणनीती ठरणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

JarangePatil

हवामान बदलाचे वाढते संकट; आता तरी जागे होण्याची गरज! 🌍अनियमित पाऊस, वाढते तापमान आणि दुष्काळामुळे शेतीसमोर मोठं आव्हान उ...
09/09/2026

हवामान बदलाचे वाढते संकट; आता तरी जागे होण्याची गरज! 🌍

अनियमित पाऊस, वाढते तापमान आणि दुष्काळामुळे शेतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आज आपण आवाज उठवला नाही, तर उद्या सोनं दिलं तरी धान्य मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Climate Change हा फक्त पर्यावरणाचा प्रश्न नाही, तर आपल्या अन्नसुरक्षेचा प्रश्न आहे.

09/09/2026

उपयोग संपला सरकार ने जरंगे पाटील यांना मारायच ठरवलं - संजय राऊत

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Kesari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share