15/10/2025
रोहित कडून शुभमनकडे भारतीय एकदिवशीय संघाचे कर्णधारपद देण्याच्या प्रश्नावर प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, ‘इंग्लंड दौरा खूपच कठीण होता. इंग्लंड दौऱ्यात खऱ्या अर्थाने शुभमन गिलची कसोटी लागली. पाच कसोटी सामना आणि अडीच महिने इंग्लंडसारख्या मजबूत संघाशी सामना करायचा. टीमही अनुभवी नव्हती. गिलला अजून काय सहन करायचं आहे?’ आता शुबमन गिलची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी लागणार आहे. कारण आता वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत त्याच्याकडे संघाची धुरा असणार आहे. अशा स्थितीत त्याच्यासाठी कठीण काळ सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यात ऑस्ट्रेलियाचा संघ चिवट आणि फॉर्मात आहे. त्यामुळे गिलची परीक्षा असणार आहे.
आणि येणाऱ्या काळात गिलसारखे नेतृत्व सर्वांसमोर यावे, म्हणून त्याला आतापासून संधी दिली जात आहे..
Follow: