15/10/2025
THANE | ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर मनपा कारवाई
- ठाणे स्टेशनच्या बाहेरील परिसरात वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले आक्रमक झाले आहेत. कोर्टाने घालून दिलेल्या दीडशे मीटरच्या मर्यादेच्या आत कुठल्याही फेरीवाल्यांना बसू देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाहेरील शहरांमधून आलेल्या फेरीवाल्यांनी ठाणे स्टेशन ते गोखले रोड परिसरातील पदपथ व्यापले आहेत. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशी तक्रार नागरिकांकडून मिळताच, वाघुले यांनी महानगरपालिकेशी संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी आयुक्तांकडून केली. त्यानुसार मंगळवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई केली.
#बोल
#फेरीवाला
#ठाणे