Marathi Talkies

Marathi Talkies is a recreation of & collection of good content of Marathi Cinema!

This page is created for & dedicated to #माय_मराठी Cinema!

It's not just a PR thing.It's all about the love for Maraathi Cinema!

Too soon! Farewell, Priyaa!Bid adieu!Om Shanti!
01/09/2025

Too soon! Farewell, Priyaa!
Bid adieu!
Om Shanti!

तब्बल २४ वर्ष झाली नाटकाला. २४ वर्षांनी त्यांच्याच नाटकाचं परेश मोकाशी यांनी चित्रपटात रूपांतर केलय. २४ वर्षात खूप काही ...
03/01/2025

तब्बल २४ वर्ष झाली नाटकाला. २४ वर्षांनी त्यांच्याच नाटकाचं परेश मोकाशी यांनी चित्रपटात रूपांतर केलय.

२४ वर्षात खूप काही बदललंय. नाटकाचा सिनेमा करताना त्याचं आधुनिकीकरण टाळलं आहे. त्यामुळे नाटक न पाहिलेला आजचा प्रेक्षक त्याच्याशी कनेक्ट होणं तसं कठीण आहे. ज्यांनी नाटक पाहिलंय, तो काळ पाहिलाय ते नक्कीच एन्जॉय करतील.

प्रशांत दामले सर एकदम भारी. त्यांच्या गोड हि*टलर ने धमाल उडवून दिलेय. आनंद इंगळेना फार थोडा स्क्रीनटाईम मिळाला आहे. पण सर्वच कलाकारांची कामं उत्तम. सर्वात जास्त लक्षात राहिलाय तो मनमित पेम चा बबन. मनमित ने बबन जबरी केलाय. अगदी छोट्या छोट्या जागातही त्याने कायच्याकाय धमाल उडवून दिलेय. मनमितच खास कौतुक.

अवघ्या १०० मिनिटांचा हा सिनेमा. आज शो हाऊसफुल होता आणी आलेला mob पण सही होता. जाम सगळे खळखळून हसत होते, त्यामुळे माहोल निर्माण झाला होता.

फार्स आवडत असेल आणी फार्स फार्स म्हणून बघता येत असेल, एन्जॉय करता येत असेल तर अवश्य बघा. चिकित्सा वगैरे करत बसायचं असेल तर नका बघू.


#मुक्कामपोस्टबोंबीलवाडी

*वास्तववादी चित्रपट निर्मितीचे पितामह* मुंबई, दि. २३ :  भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व...
24/12/2024

*वास्तववादी चित्रपट निर्मितीचे पितामह*

मुंबई, दि. २३ : भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे, पितामह म्हणून प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल अजरामर राहतील, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभूषण श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

चित्रपट माध्यमाचे सामर्थ्य ओळखून भारतीय चित्रपट सृष्टीच्या विकासात, वैभवात भर घालण्याचे त्यांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली. कर्नाटक कोकणी कुटुंबातून आलेल्या दिवंगत बेनेगल यांनी छायाचित्रकार असलेल्या वडिलांनी भेट म्हणून दिलेल्या कॅमेराद्वारे वयाच्या बाराव्या वर्षीच चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. अंकुर, द सिडलींग, मंथन, मंडी, जुनून यांसारख्या अनेक चित्रपटांनी भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी निर्मितीचे पर्व आणले. त्यांनी माहितीपट, जाहिरात पट निर्मितीतही आपला ठसा उमटवला. यातही त्यांची लेखनशैली आणि मांडणी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. समांतर चित्रपट चळवळीला बेनेगल स्पर्श आणि विचार देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या चित्रपटातून सर्वसामान्यांचे जगणे पडद्यावर आले. सहजता हे त्यांचे वैशिष्ट्य नव्हते तर कला आणि त्यांच्या जगण्याचे ते सूत्र होते. बेनेगल यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती तर केलीच त्याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक नामवंत कलाकार दिले. त्यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून अनेक कलाकार घडले. चित्रपटसृष्टीला आधुनिक वळण देणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकांच्या प्रभावळीत श्याम बेनेगल अग्रणी होते. त्यांच्या कलाकृतींचे, शैलीचा अभ्यास रसग्रहण आजही कुठे ना कुठे सुरू असते, हीच त्यांच्या कलाविष्काराची महत्ता आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा एक मार्गदर्शक अध्वर्यू काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने चित्रपट निर्मिती, कला क्षेत्राचे भरून न निघणारी हानी झाली आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

23/12/2024

अतुल कुलकर्णी हे मराठी सिनेसृष्टीतील उमदा नट आहेत. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आपलं आवडतं काम करताना मरण यावं, असं अनेकांना वाटत असतं. पण, अतुल कुलकर्णींना मात्र असं अजिबात वाटत नाही. त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

जगाचा इतिहासच बदलणारं आत्मचरित्र.‘आत्मपॅम्फ्लेट’ 6 ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत.                    .official        ...
22/09/2023

जगाचा इतिहासच बदलणारं आत्मचरित्र.

‘आत्मपॅम्फ्लेट’ 6 ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत.

.official .kanetkar@anujd .tanvi

नव्या देशात, नव्या दोस्तांसोबत, होणार नव्याने मस्ती! बॉईज आपले जगात भारी, तुटायची नाय ही दोस्ती! २० ऑक्टोबरपासून सर्व चि...
22/09/2023

नव्या देशात, नव्या दोस्तांसोबत, होणार नव्याने मस्ती!
बॉईज आपले जगात भारी, तुटायची नाय ही दोस्ती!
२० ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहात राडा करायला येतायत #धडाकेBOYZ
#बॉईज4
#बॉईज४



Directed By: .vishal
Produced By:
Co- Produced By:
Written By:
DOP:
Starring: .777

Project Head :
Distributor :

छत्रपती शिवरायांच्या परममित्राची, सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमाची गाथा... आजपासून चित्रपटगृहात !अवघे अवघे या 🚩🚩...
26/08/2023

छत्रपती शिवरायांच्या परममित्राची, सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमाची गाथा...
आजपासून चित्रपटगृहात !
अवघे अवघे या 🚩🚩🚩



Book Tickets Now
Link In Bio

#सुभेदार

Written & Directed By -
Presented By - .official &

Production Houses- .production

Producer’s Name -

.purkar .baji.music

26/08/2023
एका 'एव्हरग्रीन लव्ह स्टोरी' चा 'द एन्ड' झाला. रमेश देव यांच्या पाठोपाठ सीमा देव यांनी जगाचा निरोप घेतला..मराठी चित्रपट ...
26/08/2023

एका 'एव्हरग्रीन लव्ह स्टोरी' चा 'द एन्ड' झाला. रमेश देव यांच्या पाठोपाठ सीमा देव यांनी जगाचा निरोप घेतला..
मराठी चित्रपट सृष्टीतली एव्हरग्रीन पण तितकीच सोज्वळ जोडी म्हणून ते कायम स्मरणात राहतील.
"सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला..
भावपूर्ण श्रद्धांजली!

कोणाला नाही ऐकत, कोणाला नाही जुमानत.. दुनिया गेली तेल लावत म्हणत २९ सप्टेंबरपासून धुमाकूळ घालायला येत आहेत, 'तीन अडकून स...
23/08/2023

कोणाला नाही ऐकत, कोणाला नाही जुमानत..
दुनिया गेली तेल लावत म्हणत २९ सप्टेंबरपासून धुमाकूळ घालायला येत आहेत,
'तीन अडकून सीताराम' !

& Presents



Written & Directed By-
Story & Screenplay- .ranade.14

Producers-

Starring- .tatwawaadi

DOP - .amol
Music -
Lyrics -
Music Label -
BGM -
Editor -
Marketing & Publicity -
Publicity Design -
Digital Agency -
PR -
Visual Promotion- .studios

Shocked 😳
02/08/2023

Shocked 😳

दिनेश जगताप चा सिनेमा  “ आणीबाणी “ २८ जुलै पासून सर्वत्र प्रदर्शित होतोय नक्की पहा .. दिनेश खुप शुभेच्छा 👏👏👏
27/07/2023

दिनेश जगताप चा सिनेमा “ आणीबाणी “ २८ जुलै पासून सर्वत्र प्रदर्शित होतोय नक्की पहा .. दिनेश खुप शुभेच्छा 👏👏👏

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Talkies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi Talkies:

Share