The Voice of Mumbai

The Voice of Mumbai The Voice of Mumbai is digital media company based in Mumbai. We bring a fresh and unique approach t www.instagram.com/thevoiceofmumbai

हैद्राबाद गॅझेटीयरची अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासनचा आदेश जारी...|
02/09/2025

हैद्राबाद गॅझेटीयरची अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासनचा आदेश जारी...|




या फोटोला काय कॅप्शन द्याल? #आवाजमराठीचा
05/07/2025

या फोटोला काय कॅप्शन द्याल?

#आवाजमराठीचा

मेंढपाळांना वनांमध्ये  #चराई साठी परवानगी देण्यासंदर्भात विधानभवन येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेख...
04/07/2025

मेंढपाळांना वनांमध्ये #चराई साठी परवानगी देण्यासंदर्भात विधानभवन येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. वनांमध्ये विशिष्ट वयापर्यंत वाढलेल्या झाडांच्या परिसरात मेढ्यांना चरण्यासाठी परवानगी देण्यात आली असून अशा ठिकाणी मेंढपाळांना अडवू नये, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.


#पावसाळीअधिवेशन

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या  दुसरेबाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ ...
04/07/2025

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या दुसरेबाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.) भूषण गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.

#पावसाळीअधिवेशन

कसा वाटला फोटो? कॅप्शन सुचवा…
04/07/2025

कसा वाटला फोटो? कॅप्शन सुचवा…

मुंबई येथे उद्या ३० जूनपासून पावसाळी अधिवेशन २०२५ ला सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शासकीय चहापानाचा कार...
29/06/2025

मुंबई येथे उद्या ३० जूनपासून पावसाळी अधिवेशन २०२५ ला सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शासकीय चहापानाचा कार्यक्रम पार पडला.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून आयोजित महिला कलाकारांच्या ‘रंग मल्हार’ या विशेष पावसाळी कला प्रदर्शनाचे उद्घाट...
27/06/2025

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून आयोजित महिला कलाकारांच्या ‘रंग मल्हार’ या विशेष पावसाळी कला प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता अकादमीच्या कलादालनात होणार आहे. हे प्रदर्शन १० जुलैपर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे...|

येत्या १५ जुलैपासून रेल्वेचं तत्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना आधार संलग्न ओटीपी नोंदवणे बंधनकारक असणार आहे. IR...
12/06/2025

येत्या १५ जुलैपासून रेल्वेचं तत्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना आधार संलग्न ओटीपी नोंदवणे बंधनकारक असणार आहे. IRCTC ॲप किंवा IRCTC वेबसाइटवरुन तत्काळ तिकीट आरक्षित करताना प्रवाशांचा आधार संलग्न ओटीपीची नोंद करणं आवश्यक असेल...|

Maharashtra | येत्या २-३ दिवसात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्...
12/06/2025

Maharashtra | येत्या २-३ दिवसात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे...|

आदित्य गढवी यांचा लाईव्ह कॉन्सर्ट, मुंबईत!ट्राइबवाईब एन्टरटेन्मेंट आता मुंबईत घेऊन येत आहे, आदित्य गढवींचा दमदार लाईव्ह ...
11/06/2025

आदित्य गढवी यांचा लाईव्ह कॉन्सर्ट, मुंबईत!

ट्राइबवाईब एन्टरटेन्मेंट आता मुंबईत घेऊन येत आहे, आदित्य
गढवींचा दमदार लाईव्ह कॉन्सर्ट! संगीताचा हा अनुभव तुम्हाला मंत्रमुग्ध करेल बुकमायशो एंटरप्राइज, ट्राइबवाईब एन्टरटेन्मेंटने क्युरेट केलेला, आदित्य गढवी त्याचा बहुप्रतिक्षित आणि उत्साहित करणारा 'लाइव्ह इन कॉन्सर्ट' दौरा मुंबईत घेऊन येत आहे. त्याच्या दमदार आवाजासाठी आणि पारंपरिक गुजराती लोकसंगीत आणि समकालीन संगीताच्या खास मिश्रणासाठी ओळखला जाणारा आदित्य, नेस्को, गोरेगाव येथील मंचावर परंपरा, संगीत आणि संस्कृतीचा एक उत्साही सोहळा सादर करेल.

जर तुम्ही भारतातील इतर कोणत्याही शहरात असाल या जूनमध्ये मुंबईत आदित्य गढवीला त्याच्या अंदाजात लाईव्ह अनुभवण्याची ही दुर्मिळ संधी गमावू नका! आदित्य गढवी लाईव्ह इन कॉन्सर्ट कुठे आणि कधी अनुभवाल:

नेस्को सेंटर हॉल ४, मुंबई शुक्रवार, १४ जून २०२५ शनिवार, १५ जून २०२५


आदित्य गढवी आता प्रादेशिक आणि लोकसंगीतासाठी भारतातील सर्वात पहिले नाव बनले आहेत. 'खलासी', 'वाग्यो रे ढोल' आणि 'नागर नंदजी ना लाल' यांसारख्या गाण्यांनी त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील चार्ट्समध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांचे लाईव्ह शोज हे उत्साहाने भरलेले असतात, ज्यात भावपूर्ण प्रस्तुती, उत्सवासारखे वातावरण आणि एक संक्रामक ऊर्जा असते जी तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांना आकर्षित करते.

जूनमध्ये गरबा? लोकसंगीत प्रत्यक्ष आणि त्याच्या खऱ्या स्वरूपात अनुभवण्याची इच्छा असलेल्या चाहत्यांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव असेल.

मुंबईतील 'लाइव्ह इन कॉन्सर्ट' शोजमध्ये आदित्यची सर्वात मोठी हिट गाणी आणि त्याच्या विशिष्ट शैली व संगीताला अधोरेखित करणाऱ्या नवीन संगीत रचनांचा समावेश असलेली एक खास सेटलिस्ट सादर केली जाईल. प्रेक्षकांना तालबद्ध लोकसंगीत, अर्थपूर्ण बोल आणि गुजरात तसेच इतर ठिकाणचे सार दर्शविणारी दमदार मंचावरील उपस्थिती अनुभवायला मिळेल.

जिथे लोकसंगीत उत्सवाला मिळते आणि प्रत्येक ताल एक कथा सांगतो, असा हा अविस्मरणीय सोहळा चुकवू नका! तिकिटे केवळ बुकमायशो वर उपलब्ध आहेत, जे भारतातील अग्रगण्य मनोरंजन ठिकाण आहे.



*******

ट्राइबवाईब एन्टरटेन्मेंटबद्दल:
बुकमायशो एंटरप्राइजचा एक भाग असलेली ट्राइबवाईब एन्टरटेन्मेंट प्रा. लि., २०१९ मध्ये स्थापन झाली. कार्यक्रमांना येणाऱ्या नव्या पिढीसाठी अविस्मरणीय अनुभव तयार करण्याच्या उद्देशाने ते कार्यरत आहेत. भारतातील काही प्रमुख कलाकारांसोबत देशभरात दौरे आयोजित करून आणि महाविद्यालयीन बाजारपेठेत १५०० हून अधिक कार्यक्रम तसेच त्यांचा स्वतःचा Gen Z फेस्टिव्हल - VIBIN - आयोजित करून, ट्राइबवाईबकडे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा मोठा पोर्टफोलिओ आहे, जे सर्वांना आकर्षित करतात.

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या ट्रेन दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली!
09/06/2025

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या ट्रेन दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली!

राजभवनातील गोरखचिंचमलबार हिल येथील राजभवनातील ऐतिहासिक अश्या 'जल विहार' सभागृहाबाहेर एक मोठ्या बुंध्याचा वृक्षराज अनेक व...
07/06/2025

राजभवनातील गोरखचिंच

मलबार हिल येथील राजभवनातील ऐतिहासिक अश्या 'जल विहार' सभागृहाबाहेर एक मोठ्या बुंध्याचा वृक्षराज अनेक वर्षांपासून शांतपणे उभा आहे. देशविदेशातील प्रमुखांसाठी याच 'जल विहार' सभागृहात 'शाही भोज' (State Banquet) आयोजित केले जाते, त्यामुळे या सभागृहात समारंभासाठी येणाऱ्या प्रत्येकाला हा वृक्षराज एखाद्या तपस्व्यासारखा ध्यानस्थ बसलेला दिसतो. हा वृक्षराज म्हणजे बाओबाब किंवा गोरखचिंच.

बाओबाब मूळचा मादागास्कर - आफ्रिकेचा ! काहींच्या मते तो अरबांनी भारतात आणला तर काहींच्या मते तो सिद्दी लोकांनी आणला. आणखी काहींच्या मते पोर्तुगीझांनी त्याला भारतात आणले. राजभवनात तो केंव्हा आला व त्याला कुणी आणले हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही.

आपल्या बुंध्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवत असल्याने कदाचित याला 'जीवन वृक्ष' (Tree of life) देखील म्हणतात. त्यामुळे पाणी कमी असले तरीही हा वृक्ष बराच काळ तग धरून राहतो. त्याचे आयुष्य १००० वर्षे देखील असते. अनेकदा हा वृक्ष निष्पर्ण झालेला पाहिला आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनी निष्पर्ण असताना काढलेले चित्र दिले आहे.

इतक्यात मात्र पाऊस पडल्यामुळे त्याला हिरवीगार पालवी आली आहे. गोरखचिंचेखाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्यादान केले होते, म्हणून याला गोरखचिंच हे नाव पडल्याचे सांगितले जाते.

राजभवनातील या वृक्षराजाचे निश्चित वय तज्ज्ञच सांगू शकतील. परंतु सन १९६४ सालच्या एका प्रतिमेत तो बऱ्यापैकी प्रौढ दिसत आहे, त्याअर्थी त्याने सन १९४७ साली राजभवनातील ध्वज स्तंभावरील युनिअन जॅक उतरताना आणि तिरंगा फडकताना पाहिला असण्याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

दिनांक १ मे १९६० रोजी राजभवनात झालेल्या राज्यनिर्मितीच्या सोहळ्याचा तर तो नक्कीच साक्षीदार असणार.

'जल विहार' सभागृहाबाहेर सन १९६१ साली राणी एलिझाबेथ यांच्या उपस्थितीत फॅशन परेडचे आयोजन झाले होते. याच सभागृहात राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत व्हॅटिकनचे प्रमुख पॉप पॉल सहावे यांच्या सन्मानार्थ स्वागत समारोह आयोजित करण्यात आला होता. सन १९६९ साली या सभागृहात चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग यांनी सपत्नीक चंद्राच्या आकाराचा केक कापला होता.

किमान दिडशे वर्षे जुने असलेल्या या सभागृहात देशविदेशातील अनेक राष्ट्रप्रमुखांचे सन्मान झाले असल्याने, सभागृहाबाहेर उभा असलेला हा बाओबाब उर्फ गोरखचिंच अनेक सांस्कृतिक व राजकीय घडामोडींचा मूक साक्षीदार आहे, हे नक्की !

उमेश काशीकर
जनसंपर्क अधिकारी, राजभवन

Address

Fort
Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Voice of Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Voice of Mumbai:

Share