07/08/2025
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकरबाबत मोठा गौप्यस्फोट केला. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सापडल्याचा आरोप, रुपाली चाकणकर यांनी केला. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये 252 व्हिडीओ, तर 1487 आक्षेपार्ह फोटो आढळल्याचं चाकणकरांनी सांगितलं. तर 19 व्हिडीओ लैंगिक अत्याचाराचे असल्याची माहिती त्यांनी दिली. मुलींना ब्लँकमेलिंग करण्यासाठी या व्हिडीओ आणि फोटोंचा वापर झालाय. तर सिनेमात कामं देतो असं प्रलोभनं दाखवून लैंगिक शोषण केलं गेल्याचा आरोपही त्यांनी केला. खेवलकरसह यातील आरोपींची कसून चौकशी व्हावी, असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिल्याचं चाकणकरांनी सांगितलं. खेवलकरच्या मोबाईलमधील महिलांच्या फोटोंपैकी काही फोटो त्याच्या मोलकरणीचे असल्याचाही आरोप चाकणकरांनी केलाय. खेवलकरनं शोषण केलेल्या महिलांचा शोध घेतला जात असून हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केलाय.