लोकवाङ्मय गृह

  • Home
  • लोकवाङ्मय गृह

लोकवाङ्मय गृह प्रगतिशील विचारांशी बांधिलकी जोपासणारी प्रकाशन संस्था
https://lokvangmaybooks.in/

लोकवाङमय गृह

‘लोकवाङमय गृह’ ही प्रकाशन संस्था मराठी साहित्यक्षेत्रात ४५ वर्षांहूनही अधिक काळ कार्यरत आहे. या काळात विविध विषयांवरील शेकडो पुस्तके ‘लोकवाङमय गृह’ने प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. त्यात कथा-कादंब-या आहेत, तसेच समीक्षाग्रंथही आहेत. इतिहास, तत्त्वज्ञान व राजकीय विचारधारेवरील अनेक पुस्तके आहेत. दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारी पुस्तकेदेखील प्रकाशित केली आहेत.

तसेच एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील वैचारिक साहित्य नव्या पिढीला पुनर्मुद्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्याची योजना यांद्वारे काही उत्तम पुस्तकांचे प्रकाशन ‘लोकवाङमय गृह’ने आजवर केले आहे व भविष्यातही आणखी काही पुस्तके या योजनांमध्ये प्रकाशित होणार आहेत.

प्रगतिशील विचारांशी बांधिलकी हे ‘लोकवाङमय गृह’चे व्रत आहे आणि ‘वाङमय’ हे ‘लोकवाङमय’ ठरावे, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे हे उद्दिष्ट आहे. ‘लोकवाङमय गृह’ हा एक साहित्यप्रेमी, पुस्तकप्रेमी लोकांचा मोठा परिवार आहे. यात लेखक, वाचक, पुस्तकविक्रेते यांच्याबरोबरच या ना त्या प्रकारे, निरपेक्ष भावनेने ‘लोकवाङमय गृहा’ला मदत करणा-या अनेकांचा समावेश होतो. ‘लोकवाङमय गृहा’चे मासिक मुखपत्र असलेले ‘आपले वाङमय वृत्त’ हा या परिवाराला एकत्र गुंफणारा धागा आहे. आपण वाचक असाल, विक्रेते असाल किंवा सहृदय पुस्तकप्रेमी असाल, आपले या परिवारात स्वागत आहे.

25/07/2025

डाॅ. पूजा पराग सामंत संपादित आणि लोकवाङ्मय गृह प्रकाशित 'शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य' पुस्तकाचा प्रकाशन समारंभ.

शुक्रवारच्या कार्यक्रमाची आठवण. आवर्जून या. पुस्तकं तुमची वाट पहाताहेत.
22/07/2025

शुक्रवारच्या कार्यक्रमाची आठवण.
आवर्जून या. पुस्तकं तुमची वाट पहाताहेत.

। नवे पुस्तक ।लेखकाचे घर । ऊर्मिला चाकूरकर▪ पाने : १५२। बांधणी : पेपरबॅक। लेखसंग्रह । मुखपृष्ठ : सरदार जाधव ▪ अमेझॉन लिं...
19/07/2025

। नवे पुस्तक ।

लेखकाचे घर । ऊर्मिला चाकूरकर

▪ पाने : १५२। बांधणी : पेपरबॅक
। लेखसंग्रह । मुखपृष्ठ : सरदार जाधव

▪ अमेझॉन लिंक :
https://amzn.in/d/9NS45yt

▪ ऑनलाईन खरेदीसाठी वेबसाईट लिंक : https://lokvangmaybooks.in/product/%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a4%b0-%e0%a5%a4-%e0%a4%8a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%82/

▪ संपर्क : ८४५४०४९०३६ । ०२२-२४३७६०४२
***
लेखकाच्या सगळ्या अवस्थांचं साक्षी असतं घर, घराच्या भिंती. त्याने सोसलेली अस्वस्थता, असोशी याची सहानुभूती घेतलेली असते या घराच्या भिंतींनी, तिथल्या वस्तूंनी. लेखन सुरू करण्यापूर्वीचा आवेग, नंतर अकस्मात लेखणी थांबल्यानंतर झालेली उलघाल - शब्द सुचत नाहीत, शब्द फुटत नाहीत अशा अवस्थेत घातलेल्या अस्वस्थ येरझारा, मनातला कल्लोळ हे सारं पाहिलेलं असतं लेखकाच्या घरानं. लेखक खरंच सर्वकाळ लेखक असतो, का मधून मधून विसरूनच जातो आपण लेखक असल्याचं हेसुद्धा माहीत असतं फक्त घरालाच. खरंच किती काळ की सर्व काळ, तो जळत असतो, धुमसत असतो आतल्या आत हेही माहीत असतं फक्त घरालाच. अशा प्रज्ञावंत-प्रतिभावंत लेकरावर घराचं छप्पर जरा अधिकच हळवं होऊन सावली धरतं मायेची. घराच्या भिंती जास्तच मायाळू होऊन जातात लडिवाळ अशा लेकरासाठी. घरातल्या वस्तूंना लागलेला असतो लेखकाचा परिसस्पर्श आणि येते एक वेगळीच झळाळी त्यांच्यावर !
***

। नवे पुस्तक ।आऱ्या। शांताराम पंदेरे▪ पाने : २२०। बांधणी : पेपरबॅक। आठवणी । मुखपृष्ठ : सरदार जाधव ▪ अमेझॉन लिंक : Aarya ...
19/07/2025

। नवे पुस्तक ।

आऱ्या। शांताराम पंदेरे

▪ पाने : २२०। बांधणी : पेपरबॅक
। आठवणी । मुखपृष्ठ : सरदार जाधव

▪ अमेझॉन लिंक :
Aarya । Shantaram Pandere । आऱ्या । शांताराम पंदेरे https://amzn.in/d/ewQ1Ka5

▪ ऑनलाईन खरेदीसाठी वेबसाईट लिंक :
https://lokvangmaybooks.in/product/%e0%a4%86%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a5%a4-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87/

▪ संपर्क : ८४५४०४९०३६ । ०२२-२४३७६०४२

***
काही दोष नसताना ज्यांना शेकडो वर्षे साधी अक्षर ओळख इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारली होती, अशा समाज-अर्थ घटकांतील तरुण-तरुणी, प्रौढ स्त्री-पुरुष स्वतःच्या आयुष्याबद्दल, आत्मकथनच नाही तर विविध प्रकारांतून व्यक्त होऊ लागले आहेत. ही एक प्रकारची 'ग्रासरूट नॅनो साहित्यिक, सांस्कृतिक क्रांती' सुरू आहे.

एका बाजूला लेखक त्यांच्या आठवणीतून त्यांच्या जीवनात घडलेले प्रसंग/ घटना, त्यातून त्यांच्या मनात उठलेले भावना तरंग, विचार शृंखला वाचकांशी शेअर करत असतात. तर त्याच वेळी ते प्रसंग /घटना ज्या काळात घडलेल्या असतात त्या काळातील कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रक्रियांनादेखील स्पर्श करत असतात. व्यक्तीचे आत्मकथन आणि ती फ्रेम कधीच वेगळे काढता येणारे नसतात. या फ्रेमचे वैशिष्ट्य हे की ती व्यक्तिनिरपेक्ष असते. आत्मकथन करणाऱ्या पुरती मर्यादित नसते. त्या काळातील अगणित व्यक्ती / कुटुंबांना आपल्यात सामावून घेत असते.

'आऱ्या' च्या कालखंडाच्या दस्तावेजीकरणाला 'स्टॅण्ड अलोन' महत्त्व आहेच.

पण त्यातून आजच्या काळातील कोट्यवधी कष्टकऱ्यांच्या आयुष्यातील गुंता सोडवण्यासाठी किमान अंशतः दिशादिग्दर्शनदेखील होऊ शकेल असे वाटते.
***

लोकवाङ्मय गृह प्रकाशित प्रदीप कोकरे यांच्या 'खोल खोल दुष्काळ डोळे' या कादंबरीला 2025 सालचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार ...
18/06/2025

लोकवाङ्मय गृह प्रकाशित प्रदीप कोकरे यांच्या 'खोल खोल दुष्काळ डोळे' या कादंबरीला 2025 सालचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर !

लोकवाङ्मय गृह परिवारातर्फे प्रदीप कोकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

Pradeep Kokare Sahitya Akademi

#प्रदीपकोकरे #खोलखोलदुष्काळडोळे #साहित्यअकादमी #युवापुरस्कार

भुरा । शरद बाविस्कर । सतरावी आवृत्ती    #भुरा
30/05/2025

भुरा । शरद बाविस्कर । सतरावी आवृत्ती

#भुरा

। लोकवाङ्मय गृह प्रकाशित नवी पुस्तके ।आकर्षक सवलतीत खरेदी करण्यासाठी आजच आमच्या वेबसाईटला भेट द्या : https://lokvangmayb...
29/05/2025

। लोकवाङ्मय गृह प्रकाशित नवी पुस्तके ।

आकर्षक सवलतीत खरेदी करण्यासाठी आजच आमच्या वेबसाईटला भेट द्या : https://lokvangmaybooks.in/

। लोकवाङ्मय गृह आगामी ।शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य । संपा. डॉ. पूजा पराग सामंत ▪ पाने : २१६ । बांधणी : पेपरबॅक ।...
28/05/2025

। लोकवाङ्मय गृह आगामी ।

शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य । संपा. डॉ. पूजा पराग सामंत

▪ पाने : २१६ । बांधणी : पेपरबॅक । मुखपृष्ठ : सरदार जाधव

***
'लाल निशाणे आमुची, शोभा विळा हातोड्याची' आणि 'धरतीची आम्ही लेकरं' अशी बेधुंद गाणी गाणाऱ्या शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे वाङ्मय लोकवाङ्मय गृहाच्या वतीने प्रथमतःच प्रकाशित होते आहे. गव्हाणकर यांच्या लोकनाट्यांचा, प्रबोधनशाहिरीचा व काही गद्य लेखनाचा समावेश या खंडात आहे. गव्हाणकर यांचा लाल बावटा पथक व मार्क्सवादी पक्षाशी जवळचा संबंध होता. त्यांच्या नाटकाचे स्वरूप जरी प्रचारी वाटले तरी त्यांची नाटके सामाजिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची लोकनाटके आहेत. प्रबोधननाटके म्हणून त्यांना विशेष महत्त्व आहे. या लोकनाट्याचे नाते महात्मा फुले यांच्या नाटकाशी आहे. अण्णा भाऊ, अमर शेख आणि गव्हाणकर यांनी या लोकनाटकांचा वापर आधुनिक दृष्टीने केला. त्यासाठी त्यांनी 'नवे तमाशे' हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला आहे. त्यांनी पूर्वपरंपरेतील या कलाप्रकारातील दैवी दृष्टी काढून टाकून त्याचा वापर सामाजिक प्रबोधनासाठी केला. गव्हाणकरांची ही लोकनाट्ये प्रश्नकेंद्री आहेत. या नाटकांत फॅण्टसीचा सर्जनशील वापर असून या नाटकांना स्वातंत्र्यानंतरच्या भारताचे तपासणी नाटक (इन्क्वायरी नाटक) म्हणून त्यांना असाधारण असे महत्त्व आहे.
गव्हाणकरांच्या या वाङ्मयातून तत्कालीन सामाजिक चळवळी, वर्ग जाणीव, विविध प्रकारचे लढे, मार्क्सवादी विचारदृष्टी व वाङ्मयस्वरूपावर नव्याने प्रकाश पडेल. त्याचबरोबर गव्हाणकरांच्या वाङ्मयाचे स्वरूप, त्यातील राजकीय, सामाजिक आशय आकळता येईल. गव्हाणकरांच्या लोकनाट्यातील विषय हे आजही तेवढेच प्रस्तुत आहेत. त्यांच्या वाङ्मयात भारताच्या अस्वस्थ कालखंडाचे व भविष्यातल्या समतास्वप्नाचे चित्र होते. या निमित्ताने गव्हाणकरांच्या लोकनाट्ये, शाहिरी त्यामधील प्रयोगशीलता, विचारविश्व, राजकीय भान व प्रबोधन चळवळी यातील आंतरसंबंधाचा नव्याने विचार होईल. द. ना. गव्हाणकरांच्या वाङ्मयाची प्रबोधनभेट वाचक, कार्यकर्ते आणि अभ्यासकांना निश्चितच भावेल.
- रणधीर शिंदे
***

#लोकवाङ्मयगृह

। नवे पुस्तक ।अरसड । व्यंकटेश सोळंके  ▪ पाने : २२० । किंमत : रु. ४००/-▪ बांधणी : पेपरबॅक । कादंबरी । मुखपृष्ठ : मिलिंद क...
27/05/2025

। नवे पुस्तक ।

अरसड । व्यंकटेश सोळंके

▪ पाने : २२० । किंमत : रु. ४००/-
▪ बांधणी : पेपरबॅक । कादंबरी । मुखपृष्ठ : मिलिंद कडणे
▪ अमेझॉन लिंक : https://www.amazon.in/dp/9393134642

▪ ऑनलाईन खरेदीसाठी वेबसाईट लिंक : https://lokvangmaybooks.in/product/%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%a1-%e0%a5%a4-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%87/

▪ संपर्क : ८४५४०४९०३६ । ०२२-२४३७६०४२

***
व्यंकटेश सोळंके यांची 'अरसड' ही कादंबरी मनी नावाच्या एका उपेक्षित कृषिकन्येच्या दुःखभोगाचा आणि सावत्रपणामुळे परित्यक्ता आईसोबत माया नसलेल्या आजोळी उपेक्षा आणि वंचनेचा धनी ठरलेल्या रमनाच्या करपलेल्या बालपणाचा करुण व्याकूळपट आहे. मानवी नातेसंबंधांमधून आकाराला येणारे अनेकमुखी विद्रूप असे राजकारण या कादंबरीचा गाभा आहे. विक्षिप्त, स्वार्थी आणि निष्ठुर अशी स्वभावचित्रे इथे रेखाटलेली आहेत.
चक्रम, सूर्याजी, यादव, गंगनबाई, मारती ह्या पात्रांच्या माध्यमातून व्यंकटेश सोळंके यांनी उभा केलेला कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांचा गुंता मानवी नातेसंबंधांतील पोकळ, खिळखिळ्या धारणेला भेदकपणे अधोरेखित करतो. श्रद्धा, लोकविधी, प्रथा, परंपरा, धारणा आणि विविध चालीरीतींतून प्रसवणारं समाजमन आणि त्यात गुंतत गेलेली, मुक्तीच्या वाटा विसरलेली गेल्या अर्धशतकातली पिढी 'अरसड' मध्ये पायात ठसठसणाऱ्या काट्यासारखी खुपत राहते. वेदनेचे अपार करुण असे समाजसंदर्भ त्यांच्या चरित्राला बिलगलेले आहेत. मराठवाडी, विशेषतः नांदेडी ग्रामीण बोलीभाषेचा उत्कृष्ट नमुना या कादंबरीत सशक्तपणे आविष्कृत झालेला आहे.
आई-मुलाच्या नात्यातील हृदय हेलावून टाकणाऱ्या अभावग्रस्ततेचं शोकात्म चित्रण या कादंबरीत आहे. पडीक अरसडासारखी रमना आणि मनीच्या आयुष्याची स्थिती असली, तरीही या उजाड, उदासवाण्या स्थितीतही पडीक नि खुरटं झालेलं 'अरसड' कधी तरी फुलेल आणि त्याचे सदाहरित उपवनात रूपांतर होईल अशी दुर्दम्य आस त्यांना आहे, हे या कादंबरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

- प्रा. डॉ. मथुताई सावंत
***

#लोकवाङ्मयगृह

लोकवाङ्मय गृह । प्रकाशनपूर्व सवलत योजना सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील कृत जून दीनमित्र-पत्रव्यवहार । संपा. रामदास...
27/05/2025

लोकवाङ्मय गृह । प्रकाशनपूर्व सवलत योजना

सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील कृत जून
दीनमित्र-पत्रव्यवहार । संपा. रामदास भोंग, यशवंत साळुंके

▪ पाने : २४८ । किंमत : ४००/-
▪ बांधणी : पेपरबॅक । साईज : ८.५ x ५.५ इंच
▪ प्रकाशनपूर्व सवलत रु. २८०/- । रु. ५० टपालखर्च

▪ ऑनलाईन नोंदणीसाठी लिंक : https://lokvangmaybooks.in/product/%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0/

▪ संपर्क : ८४५४०४९०३६ ( पैसे पाठवल्याचा तपशील आणि पिनकोडसहित संपूर्ण पत्ता व्हॉट्सऍप करावा. )
( प्रकाशनपूर्व सवलत १० जून २०२५ पर्यंत मर्यादित )

***
दीनमित्र पत्रव्यवहार : सत्यशोधक चळवळीचा लेखजोखा असून हे पुस्तक मुकुंदराव पाटील यांच्या दीनमित्र साप्ताहिकाच्च्या संपादकीय कार्याचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, ज्यामध्ये इ. स. १९१० ते १९१२ दरम्यान आलेल्या २२० पत्रांचा समावेश आहे. या पत्रव्यवहारात विसाव्या शतकातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीवर प्रकाश टाकणारी बहुजन समाजाची विचारधारा स्पष्टपणे दिसते.
हे पुस्तक महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. दीनमित्र पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सत्यशोधक विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात आलेला आहे. मुकुंदराव पाटील यांनी ग्रामीण भागातून सत्यशोधक विचार समाजात रुजवण्याचे कार्य सतत ५७ वर्ष केले. तत्कालीन समाजातील वर्ग संघर्ष, धार्मिक शोषण, सामाजिक विषमता, स्त्री-शिक्षण, बहुजन शिक्षण व शेतकरी जीवनाचे वास्तव हे या पत्रव्यवहारातून निर्भीडपणे मांडले आहे. यामध्ये सत्यशोधक विचारांचा समाजातील प्रत्यक्ष कार्यात कसा उपयोग केला जात होता, याचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.
हे पुस्तक सामाजिक सुधारणा चळवळीचा इतिहास जाणून घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.

***

#लोकवाङ्मयगृह

। नवे पुस्तक ।कोल्हाळ । श्वेतल परब▪ पाने : २०४  । किंमत : रु. ३५०/-▪ बांधणी : पेपरबॅक । कादंबरी । मुखपृष्ठ : मिलिंद कडणे...
26/05/2025

। नवे पुस्तक ।

कोल्हाळ । श्वेतल परब

▪ पाने : २०४ । किंमत : रु. ३५०/-
▪ बांधणी : पेपरबॅक । कादंबरी । मुखपृष्ठ : मिलिंद कडणे
▪ अमेझॉन लिंक : https://www.amazon.in/dp/9393134871

▪ ऑनलाईन खरेदीसाठी वेबसाईट लिंक : https://lokvangmaybooks.in/product/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a5%a4-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%ac/

▪ संपर्क : ८४५४०४९०३६ । ०२२-२४३७६०४२

***
श्वेतल परब यांची 'कोल्हाळ' ही कादंबरी शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा विनाअनुदान धोरणावर सखोल आणि चिंतनपर मांडणी करते. शासन आणि स्वयंघोषित शिक्षणसम्राटांनी नफेखोर वृत्तीतून आपल्या शिक्षणसंस्थांमार्फत सुरू केलेल्या विनाअनुदानित शाळांमधून तुटपुंज्या वेतनावर काम करण्याची सक्ती करणारी व्यवस्था शिक्षकांचे अधःपतन करते. बेकारीच्या आवर्तात सापडलेल्या उच्चविद्याविभूषितांना आपल्या ऑक्टोपसी विळख्यात ओढून त्यांचे संपूर्ण आयुष्य सत्त्वहीन करून टाकणाऱ्या व्यवस्थेची कोल्हाळकृत्ये या कादंबरीत उजागर होतात. महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात जे विनाअनुदानित धोरण राबविले गेले त्याचे प्रत्यक्ष परिणाम, अध्ययन आणि अध्यापनाच्या चुकलेल्या धोरणाचा वास्तवदर्शी लेखाजोखा इथं येतो. हा अनुभवपट एका शिक्षिकेच्या नजरेतून आल्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंब यांची होणारी परवड अधोरेखित होतेच, शिवाय व्यवस्थेच्या पातळीवर गोष्टी कशा घडतात आणि कशा घडवल्या जातात याचं दाहक चित्रणही कादंबरी करते. अनुभवांच्या नेमक्या आणि नेटक्या निवडीतून निवेदनाला इथं समृद्धपणा आलेला आहे.
आपल्या न्याय्य हक्कांसाठी सत्तेशी संघर्ष करूनही निराशा, उद्विग्नता, हतबलता, आत्मक्लेश अशा मानसिक आवर्तात सापडलेल्या माणसांच्या आयुष्याच्या साऱ्याच दिशा ओस झाल्याचा शोकात्म प्रत्यय नित्याचाच होतो. नव्या पिढ्यांचे आयुष्य घडवणारे हात कधी गळफासात अडकतात तर कधी दिवास्वप्न पाहात भ्रमिष्ट होत जातात. यातून ज्ञानदानाची ही पवित्र व्यवस्था किती विरुपित झाली आहे, याचे प्रत्ययकारी चित्रण श्वेतल परब यांनी या कादंबरीत केले आहे.
मराठी कादंबरीत चित्रित झालेला शैक्षणिक अवकाश हा एकतर विद्यार्थीकेंद्री किंवा विद्यापीठ, प्राध्यापकांच्या स्टाफरूममधील चर्चा अशा मर्यादित स्वरूपाचा असतो. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या जगण्याचे स्खलन आणि व्यवस्थेने गिळंकृत केलेल्या छोट्या समूहघटकांचे दबले पिचलेले आवाज असा वेगळा आणि दुर्लक्षित अवकाश या कादंबरीत आला आहे. ते असंख्य आवाज या कादंबरीत कोल्हाळ माजवतात, हे या कादंबरीचे बलस्थान ठरते.

- गोविंद काजरेकर
***

#लोकवाङ्मयगृह

Address


Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00

Telephone

+918454049036

Alerts

Be the first to know and let us send you an email when लोकवाङ्मय गृह posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to लोकवाङ्मय गृह:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

Our Story

लोकवाङमय गृह

022 24362474 ‘लोकवाङमय गृह’ ही प्रकाशन संस्था मराठी साहित्यक्षेत्रात ४५ वर्षांहूनही अधिक काळ कार्यरत आहे. या काळात विविध विषयांवरील शेकडो पुस्तके ‘लोकवाङमय गृह’ने प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. त्यात कथा-कादंब-या आहेत, तसेच समीक्षाग्रंथही आहेत. इतिहास, तत्त्वज्ञान व राजकीय विचारधारेवरील अनेक पुस्तके आहेत. दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारी पुस्तकेदेखील प्रकाशित केली आहेत. तसेच एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील वैचारिक साहित्य नव्या पिढीला पुनर्मुद्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्याची योजना यांद्वारे काही उत्तम पुस्तकांचे प्रकाशन ‘लोकवाङमय गृह’ने आजवर केले आहे व भविष्यातही आणखी काही पुस्तके या योजनांमध्ये प्रकाशित होणार आहेत. प्रगतिशील विचारांशी बांधिलकी हे ‘लोकवाङमय गृह’चे व्रत आहे आणि ‘वाङमय’ हे ‘लोकवाङमय’ ठरावे, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे हे उद्दिष्ट आहे. ‘लोकवाङमय गृह’ हा एक साहित्यप्रेमी, पुस्तकप्रेमी लोकांचा मोठा परिवार आहे. यात लेखक, वाचक, पुस्तकविक्रेते यांच्याबरोबरच या ना त्या प्रकारे, निरपेक्ष भावनेने ‘लोकवाङमय गृहा’ला मदत करणा-या अनेकांचा समावेश होतो. ‘लोकवाङमय गृहा’चे मासिक मुखपत्र असलेले ‘आपले वाङमय वृत्त’ हा या परिवाराला एकत्र गुंफणारा धागा आहे. आपण वाचक असाल, विक्रेते असाल किंवा सहृदय पुस्तकप्रेमी असाल, आपले या परिवारात स्वागत आहे.