Rpi Athawale press Release

Rpi Athawale press Release Hon Ramdas Athawale. Minister of State for social justice n empowerment
Govt of India

*महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राजकारणा पलीकडे जाऊन सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांची एकजूट**बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार ...
14/10/2025

*महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राजकारणा पलीकडे जाऊन सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांची एकजूट*

*बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन*

मुंबई 14 ~ केल्याशिवाय ऐक्याचा प्रहार मुक्त होणार नाही महाबोधी महाविहार अशी काव्यमय सुरुवात करून आंबेडकरी बौद्ध जनतेने सामाजिक धार्मिक राजकीय राज्य करणे आवश्यक आहे. माझ्या निमंत्रणाला मान देऊन सर्व पक्षीय बौद्ध नेते मोर्चास उपस्थित राहिले.प्रा4.जोगेंद्र कवाडे यांना आणि मला ही वाटते की रिपब्लिकन ऐक्य व्हावे .काही लोकांना वाटते की ऐक्य होऊ नये.प्रकाश आंबेडकर यांनीही समाजाच्या एकजुटी साठी प्रयत्न करायला पाहिजे होते. मी मंत्री असलो तरी आंबेडकरी कार्यकर्ता आहे.त्यामुळे मंत्री असलो तरी मी नामंतरासाठी मोर्चे काढले होते आता महाबोधी महाविहार मुक्ती साठी मोर्चा काढला आहे.बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नावर बौद्धांना न्याय द्यावाच लागेल.बी टी ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहार चे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावेच लागेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी आज 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून
सर्व पक्षीय बौद्ध नेते ;सर्व रिपब्लिकन गट आणि सर्व बौद्ध संघटनांच्या एकजुटीतून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती च्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात आला.या विराट मोर्चात राज्यातील सर्व आंबेडकरी बौद्ध जनतेने रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन घडविले.या बौद्ध जनतेच्या एकजुटी च्या मोर्चात राजकारणा पलीकडे जाऊन सर्व पक्षीय बौद्ध नेते एकजूट झाले होते.यावेळी पूज्य भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो; भंते विनाचार्य; भदंत हर्षवोधी;आकाश लामा; आदी भिक्खू संघ उपस्थित होते.
यावेळी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिति चे निमंत्रक केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले; प्रा.जोगेंद्र कवाडे; डॉ.राजेंद्र गवई; नानासाहेब इंदिसे; सुरेश माने सौ सीमाताई आठवले;सुलेखाताई कुंभारे ; खासदार वर्षाताई गायकवाड; खासदार चंद्रकांत हंडोरे; आमदार राजकुमार बडोले; आमदार संजय बनसोडे; आमदार बालाजी किणीकर: आमदार संतोष बांगार; अर्जुन डांगळे;सभेचे सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले यावेळी अविनाश महातेकर; देशक खोब्रागडे; चंद्रबोधी पाटील; काकासाहेब खांबलकर ; जीत आठवले; जयदीप कवाडे; पप्पू कागदे; आनंद शिंदे; राजू वाघमारे; तानसेन ननावरे; राजा सरवदे; बाबुरव कदम;सागर संसारे; सुनील निर्भवने;अविनाश कांबळे; कुणाल कांबळे ; बुद्धभूषण गोटे; सुरेश सावंत; घनश्याम चिरणकर ; विलास रूपवते; रवी गरुड; मिलिंद सुर्वे; श्रीकांत भालेराव;दयाळ बहादुर ; सिद्धार्थ कासारे; विवेक पवार; चंद्रशेखर कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

13/10/2025
*भूमिहीनांना गायरान जमीन मिळवून देणार ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाच्या गायरान हक्क परिषदेत प्रचं...
13/10/2025

*भूमिहीनांना गायरान जमीन मिळवून देणार ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*रिपब्लिकन पक्षाच्या गायरान हक्क परिषदेत प्रचंड गर्दी*

मुंबई / छत्रपती संभाजी नगर ~ वर्षानुवर्षे गायरान जमीन कसून उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या ताब्यातून या जमीन सरकार काढून घेत आहे. गायरान जमिनीवरील आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. तो मिळत नसेल तर तो संघर्ष करून हिसकावून घेतला जाईल, हक्कासाठी लढले पाहिजे लढल्या शिवाय काही मिळणार ;वेळ आली तर गायरान हक्कासाठी मुंबईत गायरानधारकांसाठी विराट आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. ते गायरान हक्क परिषदेत बोलत होते.

संत एकनाथ रंगमंदिरात रविवारी रिपाइंच्या वतीने गायरान हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम होते. यावेळी भाजप चे राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, मिलिंद शेळके, रिपाइं चे युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे; दौलत खरात, ब्रह्मानंद चव्हाण, किशोर थोरात, विजय मगरे, नागराज गायकवाड बाळकृष्ण इंगळे; दिलीप पाडमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सभागृह प्रचंड गर्दीने भरून गेले होते.

मी घेतो माझ्या भीमाची आण, तुम्हाला मिळवून देतो गायरान, या शिघ्र कवितेने ना. रामदास आठवले यांनी आपली भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी गायरान जमिनी १९९० नाही तर २०१४ पर्यंत ज्यांच्या ताब्यात आहेत, त्यांना त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी दाखवली. यावेळी जिल्हाभरातून गायरान जमिनी कसणारे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

राज्यातील भूमिहीनांना गायरान जमिनी द्याव्यात, तो कोणत्याही जातीचा असो, अशी भूमिका रिपाइंची असून, राज्यातील भूमिहीनांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी, अशी मागणी लवकरच महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती केंद्रीय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली.

गायरान जमिनीचा लढा आता तीव्र करण्यात येणार असून, या संघर्षासाठी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तर जाऊ परंतु हा हक्क मिळवूनच देऊ, असा विश्वासही पीडितांना दिला. दरम्यान, शासनाने गायरान जमिनीसह त्यांची घरे पाडली आहेत हे चुकीचे आहे. अतिवृष्टीत गायरान जमिनीवरील नुकसानीचेही पंचनामे करण्याचीही मागणी यावेळी केली.

संविधान मान्य नसणाऱ्यांना देशाबाहेर काढावे : आठवले

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा : हा देश संविधानानुसार चालतो. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा संविधानांवरील हल्ला आहे. ज्यांनी हल्ला केला आहे, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा, तसेच ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना देशाबाहेर काढावे, असे विधान केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी म्हणाले.

आपला देश डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो. त्यामुळे येथे नेपाळ, बांगलादेशासारखी अराजकता निर्माण होणार नाही. काँग्रेसने संविधानांबाबत नरीटिव्ह पसरवला आहे. त्यांचा नारा गरीबी हटावचा होता, परंतु देशातून गरीब हटले आहेत. भारताची इकॉनॉमी डेड झाल्याचे काँग्रेसच्या वतीने बोलले जाते, परंतु इकॉनॉमी नाही तर काँग्रेसच डेड झाली आहे. म्हणूनच त्यांना जन-तेने बाहेर फेकले असल्याची टिका आठवले यांनी केली.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rpi Athawale press Release posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share