23/10/2025
Click link for more details https://youtu.be/kIm0KIKxPy8
नमस्कार मंडळी,
बरेच दिवस झाले, काही कारणास्तव टूर / ट्रेक झालेच नाहीत, समीकरण जुळते, तुटते पण मुहूर्त जमत नाही, अशातच दिवाळीची 5 दिवस सुट्टी, मुलांना पण सुट्टी, पण बायकोला सुट्टी नाही, त्यात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अचानक तिला सुट्टी मिळाली (खरेतर तिला 2 दिवस सुट्टी मिळणार होती, मग मुंबई बाहेरचा प्लान होणार होता.)
एका दिवसात मुंबई बाहेर जायचे तर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकणार, म्हणून ते टाळले, घरात दहावी चा मेंबर आहे, तर जास्त फाफट पसारा न करता थोडक्यात कार्यक्रम करायचे ठरले, त्यात सूर्योदय बघायचा प्लान मनात होता, कुठे जायचे ते ठरत नव्हते, त्यात एक किल्ला पाहिजे होता त्यावरून चांगला छान असा सूर्योदय दिसला पाहिजे, मग काय मुंबईतच पोर्तूगिजांनी बांधलेला आणि थोडाफार सुस्थितीत असलेला शीव किल्ला फायनल केला तो ही पहाटे 4 वाजता उठून.
सकाळी नित्य नियमये 4 ते 5 दरम्यानच आम्ही उठतोच, बायकोला मुलाला उठवले, (दहावीचा मेंबर रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करून गाढ झोपला होता.). आम्ही गाडी घेऊन निघालो, अवघ्या 30 मिनिटात किल्ल्यावर पोहोचलो, किल्ल्याचे दार सकाळी 6 वाजता उघडले जाते.
कधी कधी गर्दी जास्त असते सूर्योदय बघायला, म्हणून आम्ही लवकरच पोहोचलो. दार उघडायला आम्हीच पहिले होतो, सूर्योदयाची जागा निश्चित केली आणि वाट बघत बसलो, 6.37 चा सूर्योदयाचा मुहूर्त होता पण वातावरणात धुके / धूर / प्रदूषण असल्यामुळे काहीच दिसत नव्हते, नशीब एवढे पण नबळे नव्हते की जे काम करायला आलो ते होणारच नाही, आम्ही ठाण मांडून बसलो, हळू हळू संधिप्रकाशाची लाली दिसायला सुरुवात झाली. 7.10 ला साधारण तेजोमय सूर्याचे बिंब दिसायला सुरुवात झाली. मस्त असे फोटो काढले, घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले त्यात समाधान, असो पुन्हा लवकरच भेटू.
आपलाच,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs/ Borivali Hikers