07/09/2026
लहान मुलांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; ‘या’ ६ महत्त्वाच्या कारणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत आणि धावपळीच्या युगात आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर समस्या समोर येत आहेत. यातही तरुणांसोबतच आता लहान मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे (Heart Attack) प्रमाण चिंताजनक रीतीने वाढताना दिसत आहे. पूर्वी हृदयविकाराचा त्रास हा केवळ वयोवृद्धांमध्ये किंवा वृद्धापकाळात पाहायला मिळायचा, परंतु आजची लहान मुलेही याच्या विळख्यात अडकत आहेत.
लहान वयात हार्ट अटॅकचा धोका वाढण्यामागे जीवनशैलीतील बदल आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही मुख्य कारणे आहेत. पालकांनी याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढवणारी ६ प्रमुख कारणे:
१. चुकीची खानपान सवयी आणि जंक फूड: आजच्या काळात मुलांना घरातील पौष्टिक जेवणाऐवजी प्रक्रिया केलेले अन्न (Processed Food), फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्सचे व्यसन जडले आहे. या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स, साखरेचे प्रमाण आणि सोडियम खूप जास्त असते, ज्यामुळे लहान वयातच कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाची समस्या वाढते.
२. शारीरिक हालचालींचा अभाव: मैदानी खेळांचे प्रमाण कमी होऊन मुले आता तासनतास मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्ही स्क्रीनसमोर बसून असतात. शरीराला पुर0शी हालचाल किंवा व्यायाम न मिळाल्यामुळे शरीरातील चरबी वाढते आणि रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होतो.
३. अतिरीक्त ताणतणाव आणि मानसिक दाब: सध्याच्या स्पर्धात्मक युगात अभ्यासाचा ताण, पालकांच्या अपेक्षा, परीक्षांचे टेन्शन आणि सोशल मीडियावरील आभासी जगाचा प्रभाव यांमुळे लहान मुले आणि किशोरवयीन वयातील मुले मोठ्या प्रमाणावर नैराश्य (Depression) आणि तणावाचा शिकार होत आहेत. मानसिक तणाव हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असतो.
४. पुरेशी झोप न मिळणे: मुलांच्या वाढत्या वयात शरीराला आणि मनाला विश्रांतीसाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. उशिरापर्यंत जागी राहणे आणि अपुरी झोप घेतल्यामुळे शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या कार्यावर होतो.
५. लठ्ठपणा (Obesity): खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यांमुळे बालपणीच लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि हृदयविकाराचा धोका कैक पटीने वाढतो.
६. अनुवंशिकता आणि कौटुंबिक इतिहास: जर कुटुंबात आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना तरुण वयात हृदयविकाराचा त्रास किंवा उच्च रक्तदाबाचा इतिहास असेल, तर मुलांमध्येही अनुवंशिकतेमुळे (Genetics) हा धोका वाढण्याची दाट शक्यता असते.
पालकांनो, काय काळजी घ्याल?
मुलांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड करू नका. त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा आणि घरच्या ताज्या अन्नाचा समावेश करा. त्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवून त्यांचा मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. लहान मुलांच्या आरोग्याची कोणतीही तक्रार आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित आरोग्य तपासणी (Health Checkup) करणे केव्हाही हिरावह ठरते.