06/04/2023
11 एप्रिल महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिक मध्ये प्रस्तुत होणार आहे जनसामान्यांच्या मुक्ततेचा जागर नाटक ' गोधडी ' !
नाटक : गोधडी
लेखक - दिग्दर्शक: मंजुल भारद्वाज
कधी : 11 एप्रिल 2023,
केव्हा : संध्याकाळी 6.30 वा
कुठे : परशुराम साईखेडकर, नाशिक !
कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, संध्या बाविस्कर, नृपाली जोशी, आरोही बाविस्कर, प्रांजल गुडीले, तनिष्का लोंढे, साक्षी खामकर, उदय देशमुख.
प्रकाश संयोजन : संकेत आवळे
11 एप्रिल महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिक मध्ये प्रस्तुत होणार आहे, रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित सांस्कृतिक वर्चस्वातून जनसामान्यांच्या मुक्ततेचा जागर नाटक "गोधडी" .
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून, पुरोगामी समाजाचा पाया घडवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी महाराष्ट्रात वर्णवादी व्यवस्थेविरुद्ध (जातीव्यवस्था) बिगुल फुकला होता. या सत्याच्या शोधकाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाचा व सामाजिक समतेचा एल्गार पुकारला.
नाटक गोधडी जातीमुक्त, समतावादी आणि संविधानसंमत भारताच्या विवेकाचा आवाज आहे ! आज भारतीय लोकशाही समोर केवळ राजकीय आणि आर्थिक आव्हानेच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक आव्हानं ही आहेत. राजकीय आणि आर्थिक आव्हानं हे माणसाच्या बाह्य व्यवस्थेला दूषित करत आहेत आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद मनुष्याच्या आंतरिक व्यवस्थेला दूषित करत आहे ज्याने त्याच्या आत विकार निर्माण होतो आहे. ज्याचा परिणाम व्यक्ती मर्यादित न राहता संपूर्ण समाज, देश आणि विश्वावर होत आहे.
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतानुसार कलेमध्ये ती ताकद आहे जी मनुष्याला मनुष्य करते आणि त्याच्या आतील विकाराला मिटवून विवेकाला जागवते.विचार आणि विकाराच्या संघर्षात जेव्हा विचार विकाराला मिटवतो व मानवी जाणिवेने जिवंत होतो, त्याच बोधाला 'कला' म्हणतात.कलेच्या बोधातून सांस्कृतिक चेतना प्रज्वलित करणार्यांना 'सांस्कृतिक सृजनकार' म्हणतात. मानवतेसाठी व विश्वाच्या कल्याणासाठी सांस्कृतिक सृजनकार आपल्या कलेतून काळाला आकार देतात. सांस्कृतिक सृजनकार मनुष्य निर्मित भेदाला मिटवतात व आपल्या सृजनेतून माणुसकीची पैरण करतात.
मनुष्याचा विवेक हीच त्याची खरी ताकद आहे आणि या ताकदीच्या बळावर मनुष्य अशक्याला शक्य करतो. मनुष्य समाजाची उन्नती ही मनुष्याला "माणूस" समजण्यात आहे. मानवी समाजाला एक संस्कृती आहे ती निसर्गाच्या विविधते सारखी आहे, जी मनुष्य आणि निसर्गाचे नाते निर्माण करते,जी मनुष्याला निसर्गाच्या जवळ नेते आणि निसर्गाला मनुष्याच्या आत प्रवाहीत करते. जी जाणीव निर्माण करते की,सहृदयता आणि माणुसकी ही भेदात नाही तर सहस्तित्वात आहे, सहप्रवासात आहे.
परंतु आज धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, प्रांतावादाच्या आणि राष्ट्रवादाच्या नावावर माणसा माणसात फूट पाडली जात आहे. त्यामुळे "मानवीसमाज" या संकल्पनेला तडा जाऊ लागला आहे. देश आणि समाजात फूट पाडणारे हे लोक आहेत तरी कोण ? जे सांस्कृतिक वर्चस्वाची मक्तेदारी करतात. भारतीय संस्कृतीत जेव्हापासून वर्णव्यवस्था आली तेव्हापासून आपला समाज आतून पोखरला गेला आहे. वर्णवाद हा सभ्यता आणि मानवतेवरचा कलंक आहे. वर्चस्ववादाच्या आत्मकेंद्रीत श्रेष्ठत्वाच्या विकारातून रुजलेली ही शोषण व्यवस्था भारताची संस्कृती नाही, तर ती विकृती आहे. मानवाला प्राण्यांपेक्षा हीन, तिरस्करणीय, अस्पृश्य ठरवणारा वर्णवाद आजही भारताला जातींच्या जुलमी समूहात कैद करून भारतीय संविधानाला रक्तबंबाळ करतो आहे. समता आणि धर्मनिरपेक्षतेचा शत्रू असलेला वर्णवाद हा भारताच्या आत्म्याला लागलेली वाळवी आहे.
गावं ही भारताचा आत्मा आहेत. आणि हीच गावं जातिवादाची केंद्र आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर, संविधानाला 72 वर्षे उलटून गेली तरी आजही गावं जातीवादाच्या विळख्यात अडकली आहेत. "गोधडी" हे नाटक भारतातील गावांना वर्णमुक्त करण्याचा सांस्कृतिक शोध आहे. कारण संस्कृती जेव्हा आपल्या शोधात निघते, तेव्हा माणूस आणि समाज विकारमुक्त होऊन विचारांनी परिपूर्ण होतो.
आज समस्या अशी आहे की, शोषण-अन्याय सहन करत बहुतांश शोषित समाज शोषकाच्या भूमिकेत येण्यातच आपला उद्धार पाहत आहे. हा आहे सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे ज्याला समाज म्हणून आपण कधीच प्रश्न विचारत नाही.आणि वर्षानुवर्षे,पिढीदर पिढी आपण संस्कृतीच्या नावाखाली रुढीवादी परंपरेच्या शोषण चक्रात पिसत राहतो. शोषणाचे हे चक्र असेच सुरू राहते.
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिद्धांत "गोधडी"या नाटकातून परंपरेच्या जडत्वाला खोडून मानवी चैतन्याचा प्रवाह सृजित करत आहे. आणि गोधडे नाटक शोषित आणि शोषक दोघांनाही वैचारिक रित्या उन्मुक्त करते.प्रदीर्घ काळाच्या सांस्कृतिक वर्चस्वशाली रूढी आणि परंपरा द्वारे बेदखल समाजाला स्वतःच्या मूळ संस्कृतीचा शोध घ्यायचा आहे जी विविधतेला जपते.
वर्णवादी सत्ता जनतेला 'आस्थेच्या' खुंटीला बांधून त्यांचे अनंतकाळापर्यंत शोषण करते आहे. नाटक "गोधडी" हे जनतेला कर्मकांडाच्या बंधनातून मुक्त करण्याचा मार्ग आहे. नाटक "गोधडी" सर्वसामान्यांच्या सांस्कृतिक मुक्तीची मशाल आहे !
11 एप्रिल 2023 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून सर्वसामान्यांच्या सांस्कृतिक मुक्तीच्या जागृतीला सुरुवात होणार आहे. "थिएटर ऑफ रेलेवन्स" शुभचिंतक आणि अभ्यासक प्रस्तुत गोधडी हे नाटक महाराष्ट्र आणि भारतभर प्रस्तुत होण्यासाठी सज्ज झाले आहे.
याची सुरुवात 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिक पासून होणार आहे, रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित सांस्कृतिक वर्चस्वातून जनसामान्यांच्या मुक्ततेचा जागर नाटक "गोधडी" ल11 एप्रिल 2023, संध्याकाळी 6.30 वा.परशुराम साईखेडकर, नाशिक येथे प्रस्तुत होणार आहे.
...
11 अप्रैल महात्मा जोतिबा फुले के जन्म दिवस से शुरू होगा जनसामान्य का सांस्कृतिक वर्चस्ववाद से मुक्ति का जागर ! - मंजुल भारद्वाज
नाटक : गोधडी
कब: 11 अप्रैल 2023, शाम 6.30 बजे
कहां : परशुराम साईखेडकर, नाशिक !
कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, संध्या बाविस्कर, नृपाली जोशी, आरोही बाविस्कर, प्रांजल गुडीले, तनिष्का लोंढे, साक्षी खामकर, उदय देशमुख.
प्रकाश संयोजन : संकेत आवळे
नाटक गोधडी – वर्ण मुक्त, समता मूलक और संविधान सम्मत भारत के विवेक की आवाज़ ! 11 अप्रैल महात्मा फुले के जन्म दिवस से शुरू होगा जनसामान्य की सांस्कृतिक मुक्ति का जागर ! थिएटर ऑफ़ रेलेवंस नाटक गोधडी की प्रस्तुतियां पूरे महाराष्ट्र और भारत में करने के लिए सज्ज है !
नोट : आप अपने यहाँ इस नाटक का आयोजन कर सकते हैं ! .....
जनसामान्य की सांस्कृतिक मुक्ति की मशाल है नाटक गोधडी !
वर्णवाद सभ्यता और मनुष्यता पर कलंक है. वर्चस्ववाद के आत्मकेंद्रित श्रेष्ठता के विकार से पनपा यह शोषणकारी तंत्र भारत की संस्कृति नहीं विकृति है. मनुष्य को पशु से हीन,तुच्छ,अछूत बनाने वाला वर्णवाद आज भी भारत को जातियों के दमनकारी समूहों में कैद कर संविधान को लहूलुहान कर रहा है.
समता, धर्मनिरपेक्षता का शत्रु वर्णवाद भारत की आत्मा में लगा हुआ दीमक है. भारत की आत्मा है गाँव और गाँव वर्णवाद को पालने-पोषने के केंद्र हैं. आज़ादी के 75 साल, संविधान के 72 साल बाद भी गाँव वर्णवाद के शोषण में जकड़ा हुआ है.
नाटक गोधडी भारत के गाँव को वर्ण मुक्त करने का सांस्कृतिक शोध है. क्योंकि संस्कृति जब अपनी खोज में निकलती है तब मनुष्य और समाज विकार मुक्त हो विचार युक्त होते हैं.
वर्णवादी सत्ता जनता को ‘भगवान’ के खूंटे पर बांध अनंतकाल तक उसका दोहन करती है. नाटक गोधडी जनता को भगवान के खूंटे से मुक्त करने का मार्ग है. जनसामान्य की सांस्कृतिक मुक्ति की मशाल है नाटक गोधडी !.....