28/09/2025
उल्हास नदीवर अवैध कब्जा! मनपा कारवाई का नाही? पूराचा धोका!
"उल्हासनगर ३ मध्ये गंभीर प्रकार समोर आला आहे. काही भुमाफियांनी शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांचा फायदा घेत उल्हास नदीच्या जागेवर अवैध कब्जा केला आहे. स्टेशन रोड, सी एच एम कॉलेजसमोर, प्रभाग क्रमांक ३ — पैनल नंबर ११ मध्ये दुकानदाराने नदीवर भराव करून सुमारे दहा फूट जागा हडपली आहे आणि त्यावर दुकान उभे केले आहे.
हे फक्त जमीन हडपण्याचे प्रकरण नाही — पावसाच्या हंगामात भरभरून पाणी येऊन पूर येऊ शकतो आणि परिसरातील रहिवाशांचा जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो. उल्हास नदीचे हक्क पायमल होत असताना, उल्हासनगर महापालिका अद्याप का कारवाई करत नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो.
नदीवरील अवैध कब्जा त्वरित हटवणे आणि मनपा प्रशासनाने योग्य कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा परिणाम भयानक ठरू शकतात. नागरिकांचे जीवन आणि शहराची सुरक्षा यासाठी आता त्वरीत पाऊले उचलणे आवश्यक आहे!"