मनसे लाईव्ह - MNS Live

मनसे लाईव्ह - MNS Live Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मनसे लाईव्ह - MNS Live, Digital creator, शिवतीर्थ, दादर, Mumbai.

21/05/2025
https://www.facebook.com/share/p/1DKf8AwHow/
28/01/2025

https://www.facebook.com/share/p/1DKf8AwHow/

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या तमाम पदाधिकाऱ्यांना सस्नेह जय महाराष्ट्र,
३० जानेवारीला सकाळी १० वाजता मुंबईतल्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात भेटूया !

https://www.facebook.com/share/p/12BzX5pN3Uw/
12/12/2024

https://www.facebook.com/share/p/12BzX5pN3Uw/

भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने आज शब्दशः इतिहास घडवला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याचं, त्याच्या कुटुंबीयांचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनःपूर्वक अभिनंदन. कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा हा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे आणि जगजेत्यांची एक मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण होऊ दे हीच इच्छा.


पक्ष प्रवेश सांगली आज जत विधानसभेतील आर पी आय पक्षाचे जत विधानसभा अध्यक्ष श्री महादेव हुचगोंड, त्यांचे सहकारी विलास तेली...
12/12/2024

पक्ष प्रवेश सांगली
आज जत विधानसभेतील आर पी आय पक्षाचे जत विधानसभा अध्यक्ष श्री महादेव हुचगोंड, त्यांचे सहकारी विलास तेली मुकुंदा हिम्परण. पिंटू पवार व आकाश बंडगर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला
हा पक्षप्रवेश तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी सर, उपतालुका अध्यक्ष शरद चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला

09/12/2024

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे... यामुळे १०३ शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नाही.

प्रश्न हा या जमिनीपुरता नाहीये, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे ?काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्रसरकारने सादर केलं होतं, त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळं सांगायला नको. पण मुळात सुधारणा म्हणजे नक्की काय आहेत हे थोडक्यात समजून घेऊया...

१) एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे; वक्फ बोर्डाची जी मनमानी सुरु आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल.

२) एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे का सरकारी जमीन आहे याचा निवडा पूर्वी वक्फ ट्रिब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमणं केली गेली आहेत. हे नवीन विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी हा यापुढे निवाडा करेल

३) वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे आणि तसंच मुस्लिमेतर समाजाचं पण प्रतिनिधित्व असलं पाहिजे


४) आणि कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचे ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला राहील

५) आणि यापुढे एखाद्या व्यक्तीला त्याची संपत्ती वक्फ बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखं बोली करार नाही तर लेखी करार करावा लागेल, ज्याने त्याला कायदेशीर चौकट मिळेल.

या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नाही. श्री.नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ३७० कलम हटवणं, तिहेरी तलाकवर बंदी आणणं, राम मंदिर उभारणी अशी पावलं उचलली होती. ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता. आणि त्यातूनच आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठींबा दिला होता. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता, शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं. आणि हो, राज्य सरकारने पण, अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं...

यानिमित्ताने देशातील एकूणच वक्फ बोर्डांना पण एका गोष्टीची जाणीव मला आज करून द्यायची आहे ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी 'भूदान चळवळ' सुरु केली जिच्यात लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी, सरकारला परत केली होती जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल.
हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डानी पण दाखवावा.. सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं.

राज ठाकरे ।

https://www.facebook.com/share/p/1EDJnNxg1g/

रस्त्यांचे झाले तलावआता बदल हवा! It's Time For Change      #महाराष्ट्र      #विधानसभा२०२४
20/10/2024

रस्त्यांचे झाले तलाव

आता बदल हवा!

It's Time For Change

#महाराष्ट्र #विधानसभा२०२४

15/10/2024

आता निर्णय तुम्हाला घ्यायचाय तुम्हाला काम हवंय की वाद..??

मनसेला साथ देऊया, नवा महाराष्ट्र घडवूया..!!

निशाणी :- रेल्वे इंजिन

Raj Thackeray Amit Thackeray MNS Adhikrut

#योगेशचिले #निवडणूक #विधानसभा #राजसाहेब #राजकारण #राजठाकरे #मुंबई #महाराष्ट्र

Address

शिवतीर्थ, दादर
Mumbai
४०००१२

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनसे लाईव्ह - MNS Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share