24/08/2026
‘भाषा’ हे संवादाचं माध्यम असलं तरी तिचा अभ्यास अखंड साधना म्हणून ज्यांनी केला, या अभ्यासाला शास्त्रकाट्याची कसोटी लावूनही तिचं सौंदर्य, बलस्थानं आणि लालित्यही ज्यांनी अत्यंत सहजतेने उलगडून दाखवलं अशा डॅा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
भाषा प्रदुषित होऊ नये, बोली भाषेचं महत्त्व जपतांना प्रमाण भाषेचं महत्त्वही दृष्टिआड होऊ नये हा विचार बाईंनी रूजवला. २०१६ ला महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने ‘ डॅा अशोक केळकर भाषा अभ्यासक’ पुरस्काराने बाईंना सन्मानित केलं. मराठी भाषा गौरव दिनी हा कार्यक्रम झाला. या सोहळ्यात ‘मराठी अस्मिता’ला बाईंच्या कार्याचं महत्त्व सांगायची, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची संधी मिळाली, याचा अतिशय आनंद आणि समाधान आहे.