AIR News Mumbai

AIR News Mumbai Official account of RNU, All India Radio, Mumbai. Working under http://prasarbharati.gov.in, Ministry of Information and Brodcasting, Govt. of India.

27/08/2026

: नेपाळमधील महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या शोधासाठी राज्य सरकार केंद्राच्या माध्यमातून नेपाळ सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

दोन बसमधून गेलेल्या ४५ जणांच्या दोन गटांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून नेपाळ आणि कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या पर्यटकांची माहिती संकलित केली जात आहे.

Girish Mahajan

27/08/2026

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या पुढाकारामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू

काठमांडूहून जनकपूरमार्गे ते बिहारच्या दिशेने रवाना झाले.

जनकपूर-बिहार सीमेपर्यंत मिनी बस, दानापूरपर्यंत बस आणि त्यानंतर रेल्वेने त्यांच्या परतीची व्यवस्था करण्यात आली आहे.

 : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कवडा इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्...
27/08/2026

: हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कवडा इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक ‘वारली राख्या’ साकारल्या.

राखी पौर्णिमेनिमित्त भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थिनींच्या कलात्मकतेचं सर्वत्र कौतुक

27/08/2026

: परेश राणे यांनी ‘खेलो इंडिया संवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांना दिलेल्या मार्गदर्शनाबाबत आपले विचार व्यक्त केले.

क्रीडा क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन युवकांनी आपली क्षमता सिद्ध करावी, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

27/08/2026

: रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘खेलो इंडिया संवाद’ कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं.

यावेळी सुमारे ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि २५ प्राध्यापक उपस्थित होते; क्रीडा शिक्षक मंगेश सकपाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

27/08/2026

: नवी मुंबईतील दिवाळे, बेलापूर, करावे, नेरुळ, सारसोळे, वाशी, घणसोली, ऐरोली आणि दिवा कोळीवाड्यांत पारंपरिक उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी.

आगरी-कोळी बांधवांनी पारंपरिक मिरवणूक काढत खाडीकिनारी नारळ अर्पण करून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

27/08/2026

: सोलापूरच्या युवा खेळाडू श्रेया परदेशी यांनी क्रीडा क्षेत्रातील अनुभव आणि प्रधानमंत्री Narendra Modi यांच्या मार्गदर्शनाबाबत आपले विचार व्यक्त केले.

‘खेलो इंडिया’सारख्या उपक्रमांमुळे युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नवी संधी आणि प्रेरणा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.

27/08/2026

: सोलापूरचे खेळाडू आदित्य प्रधान यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित ‘युवा कनेक्ट’ कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील अनुभव आणि विचार व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या युवकांशी संवादातून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.


 : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री   यांनी सोलापूरच्या युवकांशी संवाद साधत क्रीडा क्षेत्रातील विविध...
27/08/2026

: राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री यांनी सोलापूरच्या युवकांशी संवाद साधत क्रीडा क्षेत्रातील विविध संधींचा लाभ घेण्याचं आवाहन केलं.

नवीन तंत्रज्ञान, स्पोर्ट्स मेडिसिन, न्यूट्रिशन आणि सायकॉलॉजीच्या माध्यमातून युवकांनी क्रीडा क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करावे, असे त्यांनी सांगितलं.

Address

Broadcasting House, HT Parekh Marg, Opp. MLA Hostel, Churchgate
Mumbai
400020

Alerts

Be the first to know and let us send you an email when AIR News Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share