Hashtag Batmya

Hashtag Batmya बातम्या महाराष्ट्रभरातल्या!
बातम्यांचं नवं, डिजिटल स्वरूप
Hashtag बातम्या!

27/08/2026

मुंबई आणि महामुंबई परिसरात ऑटो आणि रिक्षा चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात आलंय... याच पार्श्वभूमीवर परप्रांतीय चालकांना ठिकठिकाणी मराठी भाषा शिकवण्यासाठी शिकवणी घेण्यात आली आणि त्यानंतर आता या परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी भाषा येत असल्याचं प्रमाणपत्र दिलं जातंय. असाच एक प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम बोरिवली पूर्वेत आमदार प्रकाश सुर्वे यांच्यामार्फत पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. याच कार्यक्रमातला व्हिडिओ असल्याचा दावा करत ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी आक्षेप नोंदवलाय... दरम्यान ज्यावेळी हे सादरीकरण झालं त्यावेळी एकनाथ शिंदे कार्यक्रमस्थळी उपस्थित नव्हते असं कळतंय...
#मराठीभाषा
( मराठी कम्पल्सरी , marathi compulsory news , marathi , मराठी भाषा , mumbai , mumbai news , prakash surve , latest marthi news , मराठी बातम्या , marathi language compulsory for auto taxi drivers in Mumbai )

27/08/2026

स्टँडअप कॉमेडियन समय रैना कायम काही न काही कारणाने चर्चेत असतो... आता त्याचा नवा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा सत्कार केल्याचं दिसतंय. तर यावेळी त्याने महाराष्ट्र सायबर सेलच कौतुक सुद्धा केलंय...
#समयरैना

पेपरफुटीच्या आरोपांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरतीची प्रक्रिया रद्द केली आहे. २२ मार्चच्य...
26/08/2026

पेपरफुटीच्या आरोपांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरतीची प्रक्रिया रद्द केली आहे. २२ मार्चच्या परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आलीय. गौरव पाटील यांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाल्याचे निष्पन्न झाल्यानं प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आता फेरपरीक्षेसाठी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नसून फेरपरीक्षेसाठी परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही.

Mpsc students , mpsc exam leak , mpsc drugs inspector exam , mpsc exam cancelled , mpsc paper leak , mpsc students update , mpsc exam updates marathi , mpsc विद्यार्थी , mpsc students protest )

25/08/2026

मुंबईच्या माझगाव परिसरात गणरायाच्या आगमन मिरवणुकीवेळी समाज कंटाकाकडून मिरवणुकीवर अंदाज फेकण्यात आल्याचा आरोप होता. प्रचंड तणावाची परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. दरम्यान आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपीला शोधून अटकही केली आहे. DCP जयंत मीना यांनी याबाबत दिलेली सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये...
#गणपतीआगमन #मराठीबातम्या

25/08/2026

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलीये तर जरांगे पाटलांनी आंदोलन करू नये अशी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सरकारकडून प्रयत्नही सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून काल अंतरवाली सराटी इथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तर आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेण्यात आलीय... सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी मात्र 28 ऑगस्ट च्या आत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 29 तारखेला आंदोलन करण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलंय... त्यामुळे सरकार 28 तारखेपर्यंत यावर तोडगा काढू शकतं का? हे पाहणं महत्त्वाचं असेल...
#मनोज_जरांगे_पाटील #मराठा_आरक्षण #मराठा
( Manoj Jarange Patil , manoj jarange patil latest news , manoj jarange patil aandolan , maratha reservation , मराठा आरक्षण , manoj jarange patil aandolan latest news , मनोज जरांगे पाटील , मनोज जरांगे पाटील आंदोलन , मनोज जरांगे पाटील news , मनोज जरांगे पाटील आंदोलन )

25/08/2026

मुंबई आणि महामुंबई क्षेत्रात मराठी भाषा ही रिक्षा आणि टॅक्सीचालकांना सक्तीची करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मराठी भाषा शिकण्यासाठी परप्रांतीय रिक्षाचालकांना वेळी देण्यात आला. मात्र तरीही मराठी न शिकलेल्या काही मुजोर परप्रांतीय रिक्षाचालकांनी मराठी बोलणार नाही असा पवित्रा घेतच सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरायला सुरुवात केली आहे. अशा मुजोरांना मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी इशारा दिलाय...
#मराठी #मराठीभाषा #मराठीएकीकरणसमिती
( Marathi language compulsory , marathi language compulsory for auto taxi drivers , marathi compulsion in mumabi , मराठी भाषा , मराठी भाषा सक्ती , मराठी एकीकरण समिती , marathi news , marathi news latest , मराठी बातम्या , marathi language compulsion law in Mumbai )

24/08/2026

मुंबई आणि महामुंबई क्षेत्रात रिक्षा - टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात आलं आहे. आता मराठी भाषा न येणाऱ्या चालकांवर कारवाई करायलाही सुरुवात झाली आहे. सरकारने वेळ देऊनही मराठी न शिकलेल्या परप्रांतीय रिक्षाचालकांनी आता प्रवाशांना वेठीस धरायची नवीच पद्धत सुरू केलीय. रिक्षा रस्त्यावर आणायची पण, कुठेही जाण्यासाठी भाडं घ्यायचं नाही अशी ही पद्धत आहे. अशा प्रकारे सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतलीय. गोरेगाव परिसरात मनसेच्या भूषण फडतरे आणि सहकाऱ्यांनी अशा रिक्षाचालकांना दणका दिलाय!
#मराठीभाषा #मराठी
( Marathi language compulsory , marathi compulsory for auto taxi drivers , mns news , mns on marathi , मनसे मराठी भाषा अनिवार्य , परप्रांतीय रिक्षाचालक , mns latest news , मराठी भाषा अनिवार्य , लेटेस्ट मराठी न्यूज , marathi news latest )

24/08/2026

राहुल गांधी यांचा पुण्यामध्ये छात्रों की गुंज हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय... या व्हिडिओमध्ये एक तरुणी राहुल गांधींच्या गालावर चुंबन केल्याचं दिसतंय... काहीजण याला राहुल गांधींवरील तरुणीचं निखळ प्रेम म्हणतायत तर काही जण यावर आक्षेपही नोंदवतायत. या व्हिडिओची चर्चा मात्र चांगलीच रंगलीय!
#राहुलगांधी
( राहुल गांधी , राहुल गांधी पुणे , rahul gandhi pune , rahul gandhi pune news , rahul gandhi pune video , girl kissed rahul gandhi , girl kissed rahul gandhi in pune chhatro ki gunj stage , marathi news , मराठी बातम्या , latest marathi news )

22/08/2026

छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात पोहोचले!
LoP Loksabha Rahul Gandhi reached at Pune for Chhatron ki Gunj
#राहुलगांधी

22/08/2026

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी आज पुण्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी छात्रों की गुंज या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मात्र त्याआधी आदल्या रात्री पुण्याच्या COEP हॉस्टेल परिसरात ABVP आणि काँग्रेस व NSUI कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला... यानंतर परिसरात राहुल गांधींच्या नावाने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली... हनुमंत पवार, जयश्री थोरात या घोषणाबाजी करताना दिसल्या!
#राहुलगांधी

Address

Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hashtag Batmya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share