MovieMeter Marathi

MovieMeter Marathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MovieMeter Marathi, Digital creator, Mumbai.

� MovieMeter मराठी वर तुम्हाला मिळतील नवीनतम मराठी, हिंदी आणि दक्षिणात्य, इंग्लिश वेबसीरिजवरील प्रामाणिक रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस अपडेट्स, आणि मनोरंजक सिनेमागोष्टी. मराठी गाणी.

� फिल्मप्रेमींसाठी, फिल्मप्रेमींनी तयार केलेलं!

🌺 तीन तासांच्या प्रयोगामध्ये तुमची इन्व्हॉल्व्हमेन्ट नसेल, ह्याचा अर्थ तुमचं लक्ष नाहीये.🌺🌺 ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्...
30/08/2026

🌺 तीन तासांच्या प्रयोगामध्ये तुमची इन्व्हॉल्व्हमेन्ट नसेल, ह्याचा अर्थ तुमचं लक्ष नाहीये.🌺
🌺 ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत नाटकादरम्यान फोन वाजण्याबद्दल एक भाष्य केलं त्यात त्या असे म्हणतात की,
🌼नाटक सुरू असताना कुणाचा फोन वाजला तरीही मी कधीच थांबत नाही. ही आजची मुलं थांबतात, दर्शवतात. कशाला? म्हणजे तुम्ही नाटकात इन्व्हॉल्व नसता. तीन तासांच्या प्रयोगामध्ये तुमची इन्व्हॉल्व्हमेन्ट नसेल, ह्याचा अर्थ तुमचं लक्ष नाहीये. फोनची बेल वाजली तर तुमचं लक्ष विचलित होत असेल तर असं कसं चालेल?’ त्यामुळे असं कोणी थांबलं की, मला राग येतो. पण, मी बोलत नाही. आजच्या मुलांनी याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि प्रयोग पुढे सुरू ठेवला पाहिजे.’ 🌼

🌺 एखाद्याला आपल्या आयुष्यातून कायमच निघून जायचं असेल तर आपण त्याला जाऊ द्यायचं 🌺🌺 गुणी अभिनेत्री अक्षया गुरव हिने अलीकडे...
30/08/2026

🌺 एखाद्याला आपल्या आयुष्यातून कायमच निघून जायचं असेल तर आपण त्याला जाऊ द्यायचं 🌺
🌺 गुणी अभिनेत्री अक्षया गुरव हिने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबद्दल एक भाष्य केलं त्यात ती असे म्हणते की,
🌼ही गोष्ट खरी आहे पण, आम्ही आजही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही दोघंही एकाच इंडस्ट्रीतले आहोत त्यामुळे पुढे-मागे जर अशी वेळ आली, तर एकत्र काम करायला मला आवडेल आणि त्यालाही आवडेल. आपण गोष्टी लेट गो करायला शिकलं पाहिजे. एखाद्याला आपल्या आयुष्यातून कायमच निघून जायचं असेल तर आपण त्याला जाऊ द्यायचं. त्याला थांबवण्यात काहीही अर्थ नाहीये. म्हणूनच मी माझं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवते. आता पुढे बघुयात आयुष्य कुठे घेऊन जातंय.”🌼

🌼गुणी अभिनेत्री शलाका पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
30/08/2026

🌼गुणी अभिनेत्री शलाका पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

🌺 माझ्यावर तसं कोणी प्रेम केलंच नाही. 🌺🌺 ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत प्रेमाबद्दल एक भा...
29/08/2026

🌺 माझ्यावर तसं कोणी प्रेम केलंच नाही. 🌺
🌺 ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत प्रेमाबद्दल एक भाष्य केलं त्यात त्या असे म्हणतात की,
🌼“मी कधीच प्रेमात पडले नाही. चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं आणि पुस्तकांमध्ये वाचायला मिळतं, तसं प्रेम मी खऱ्या आयुष्यात कधीच अनुभवलं नाही. माझ्यावर तसं कोणी प्रेम केलंच नाही. मग मीही कसं प्रेम करू शकणार? त्यासाठी समोरच्या व्यक्तीनेही तसं प्रेम करणं गरजेचं आहे ना? माझ्यासाठी कधीच कोणी वेडं झालं नाही.”🌼

🌺 शाहरुख सरांपर्यंत माझं काम पोहोचलं 🌺🌺 मुंज्या फेम अभिनेता अभय वर्मा याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेता शाहरुख खान...
29/08/2026

🌺 शाहरुख सरांपर्यंत माझं काम पोहोचलं 🌺
🌺 मुंज्या फेम अभिनेता अभय वर्मा याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेता शाहरुख खान यांच्याबद्दल भाष्य केलं त्यात तो असे म्हणतो की,
🌼जेव्हा मला कळलं की शाहरुख सरांनी माझं काम पाहिलं आणि त्यांनी स्वतः दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद सरांना सांगितलं तो मुंज्या वाला मुलगा घे, अभय. तो या भूमिकेसाठी खूप चांगला राहील’, तेव्हा माझ्यासाठी यावर विश्वास ठेवणं खूप कठीण होतं. शाहरुख सरांपर्यंत माझं काम पोहोचलं आणि त्यांनी मला या मोठ्या प्रोजेक्टसाठी योग्य समजलं, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे.🌼

🌼गुणी अभिनेत्री नम्रता संभेराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
29/08/2026

🌼गुणी अभिनेत्री नम्रता संभेराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

🌼 गुणी अभिनेत्री शिवानी सुर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
29/08/2026

🌼 गुणी अभिनेत्री शिवानी सुर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

🌺 मी हैदराबादच्या एका अत्यंत पारंपरिक कुटुंबातून आलेली मुलगी होते. 🌺🌺 गुणी अभिनेत्री दिया मिर्झा यांनी नुकत्याच दिलेल्या...
29/08/2026

🌺 मी हैदराबादच्या एका अत्यंत पारंपरिक कुटुंबातून आलेली मुलगी होते. 🌺
🌺 गुणी अभिनेत्री दिया मिर्झा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत असे म्हणते की,
🌼आधी मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये अशा भूमिका फारशा लिहिल्या जात नव्हत्या. ‘तुमसा नहीं देखा’ हा चित्रपट प्रेटी वूमन पासून प्रेरित होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने शूट करण्यात आला होता. त्या चित्रपटात काम करणं खूप रंजक होतं.मी हैदराबादच्या एका अत्यंत पारंपरिक कुटुंबातून आलेली मुलगी होते. मला माझ्या शरीराबद्दल अजिबात आत्मविश्वास नव्हता. पण त्या चित्रपटात काम करताना माझ्या मनातील भीती दूर झाली. ‘मुझे तुमसे मोहब्बत है’ या एका गाण्याने माझ्या मनातील सर्व बंधनं तोडून मला माझ्या शरीराबद्दल खऱ्या अर्थाने आत्मविश्वास दिला,”🌼

28/08/2026

मैं जरा जल्दी मैं हुं 😂😂

🌺 गायक म्हणून किशोर कुमार हे माझे मोठे गुरू आहेत 🌺🌺 प्रसिद्ध गायक संगीतकार दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी अलीकडेच दिलेल्या...
28/08/2026

🌺 गायक म्हणून किशोर कुमार हे माझे मोठे गुरू आहेत 🌺
🌺 प्रसिद्ध गायक संगीतकार दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आपल्या गुरूबद्दल भाष्य केलं त्यात तो असे म्हणतो की,
🌼माझ्या संगीतप्रवासात मला अनेक गुरू लाभले. लहानपणी मी शिवानंद पाटील यांच्याकडे शिकलो. मी साऊंड इंजिनीअर असल्यामुळे संगीताच्या तांत्रिक बाबींचा माझ्यावर प्रभाव आहे. गायक म्हणून किशोर कुमार हे माझे मोठे गुरू आहेत. आजही एखादं गाणं गाताना अडचण आली तर मी स्वतःला विचारतो, ‘हे किशोरदांनी कसं गायलं असतं?’ संगीतकार म्हणून पंचमदांचं योगदान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. पण या सगळ्यांपेक्षा मोठा गुरू म्हणजे प्रेक्षक. त्यांनी इतकी वर्षं प्रेम दिलं, चुका दाखवल्या, चांगलं काम स्वीकारलं आणि वाईट नाकारलं. कलाकारासाठी याहून मोठा आणि प्रामाणिक गुरू दुसरा कोणी असूच शकत नाही.🌼
#मराठीसिनेमा

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MovieMeter Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share