25/06/2024
*आनंदाच्या डोही आनंद तरंग*
तुमच्या एखाद्या कृतिमुळे किव्हा कामामुळे तुमच्या बरोबर समोरच्याच्या चेहवऱ्यावरचा आनंद आणि समाधान दिसले की स्वतःला किती आनंद होतो ना, तसंच काहीस माझ्या नुकताच झालेल्या कार्यक्रमामूळे माझ्या बरोबर घडले ...
तसे गेली १२ वर्षे आम्ही अनेक कार्यक्रम आयोजित केले होते, ज्यात शेकडो लोक सहभाग होत होते, पण ते सर्व कार्यक्रम उद्योजकांसाठी आणि त्यांच्या उद्योगवाढीसाठी होत होते. पण हा कार्यक्रम वेगळा होता, तसा फॅशन इंडस्ट्री शी माझा लांब लांब पर्यंत काही संबंध नाही, तरी देखील असे काही वेगळे करून बघूया म्हणून ORRA सारख्या एका मोठ्या ब्रँड सोबत काम करण्याचे ठरविले आणि अवघ्या ८-१० दिवसात कार्यक्रमाची लगबग सुरु झाली. मनात धाकधूक, काय होईल - कसं होईल याची, पण जर तुम्ही ठरवलं तर कुठून ना कुठून तुम्हाला मदत यायला सुरु होते आणि कामं मार्गी लागत. तसेच काहीसे झाले, नाही तर असा कार्यक्रम करायचा म्हंटला तर किमान २-३ महिने अगोदर तयारी करावी लागते, पण इथे ORRA च्या टीमचा मला चांगलाच पाठिंबा होता, त्यांच्यामूळे आणि माझ्या काही मित्रमंडळीमुळे हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडणे शक्य झाले .
तर कार्यक्रम सुरु झाला आणि सर्व मान्यवर मंडळी आणि पाहुणे कार्यक्रमाला येऊ लागली, तिथे उपस्थित असलेल्या ९९% लोकांसाठी रॅम्प वॉक किंवा फॅशन वॉक नवीन होते, ते देखील खरे हिऱ्यांचे दागिने घालून छान रॅम्प वॉक करायचे होते, असं त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडणार होतं. सर्वांच्या मनात धाक धुकं होती, पण उपस्थित असलेल्या अनेकांनी आनंदाने सहभाग घेतला, त्यांना माझी मैत्रीण आणि कार्यक्रमाची guest ऑफ honor करुणा संखे हिने रॅम्प वर कसे चालायचे, कशा रीतीने पोसेस द्यायच्या, नजर कशी ठेवायची ह्याचे थोडक्यात प्रात्यक्षित दाखवले आणि तिला बघून एका पाठोपाठ एक गेस्ट रॅम्प वॉक करू लागले. तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद आणि चालतानाचा उत्साह बघून मला खूप खूप आनंद होत होता. 'फॅशन का हे ये जलवा' या गाण्यावर ८- १० वर्षाच्या मुलाने ते 76 वर्षांच्या अशोक दुगाडे सर आणि त्यांच्या पत्नीने हातात हात घालून नाचत सुंदर रॅम्प वॉक केला.कार्यक्रमामध्ये विविध वयाच्या महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता, या कार्यक्रमात कोणत्याच वयाचे, दिसण्याचे बंधन नव्हते, होता फक्त आनंद आणि प्रत्येकासाठी आयुष्यात एक सुंदर आठवण. प्रत्येक व्यक्तीला आपण देखील अशी फॅशन करू - रॅम्प वॉक करू असे आतून वाटत असते पण अनेकदा मनात असलेल्या भीतीमुळे आपण घाबरतो, संकोच करतो, पण इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी त्यावर मात केली आणि रॅम्प वॉक चा आनंद घेतला.
रॅम्प वॉक सोबतच सर्वांसाठी नेल आर्ट, टॅटू मेकिंग, कँडल मेकिंग असे विविध उपक्रमांचा ही सहभाग होता त्याचाही आनंद अनेकांनी घेतला.
माझा हा कार्यक्रम निव्वळ आनंदासाठी होता. *रचना आर्ट्स अँड क्रीएशन्स* चा हा उपक्रम कसा वाटला हे सर्वांनीच नक्की कमेंट्स मध्ये सांगा.
रचना लचके बागवे
*रचना आर्ट्स अँड क्रीएशन्स*
9930026020