02/08/2026
हायकोर्टाने कालच खडसावलं, आज तुकाराम मुंढेंनी थेट कोर्टाच्या कॅन्टीनवरच टाकली घाड, टप्प्यात कार्यक्रम केला.
Tukaram Mundhe न्यायालयाच्या खोचक टिप्पणीची तात्काळ दखल घेत आज गुरूवारी तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएच्या पथकाने थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनमध्ये धाड टाकली.
मुंबई : केवळ खासगी आस्थापनांवरच कारवाई का करिता? असा सवाल करून सरकारी कार्यालयांत कधी धाडी टाकणार? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना विचारला होता. न्यायालयाने कोंडीत पकडून २४ तासही होत नाहीत, तोच तुकाराम मुंढे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनमध्येच धाड टाकली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून मुंबईतील ५ नामांकित आणि प्रतिष्ठित क्लब्सवर धडक कारवाई करण्यात आली असून, अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन व अस्वच्छतेमुळे त्यांचे परवाने थेट निलंबित करण्यात आले.
नवी मुंबईतील एका बड्या हॉटेलवर मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. यावेळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कारवाईवर नाराजी व्यक्त करीत केवळ खासगी आस्थापनांच का लक्ष्य करिता? सरकारी कार्यालयांच्या कँटीनमध्ये कधी धाडी मारणार? असा सवाल विचारला होता.