08/05/2024
१८ जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ जालना येथे सकल गवळी समाज बांधवांचा मेळावा पार पडला. जालना शहरात गवळी बांधवांचा रहिवास मोठ्या संख्येने असून, हा समाज आपल्या विविध व्यवसायातून शहराच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर हातभार लावत असतो. आजपर्यंत नेहमीच हा समाज भारतीय जनता पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला तरी याहीवेळी भाजपाला असलेला आपला पाठिंबा असाच कायम ठेवा असे आवाहन यावेळी उपस्थित समाज बांधवांना केले.यावेळी शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष एजाज देशमुख,सुरेश पाटील, सिद्धिविनायक मुळे, अतिक खान, सुनील खरे यांच्यासह गवळी समाजाचे जालना जिल्हा भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गवळी समाज जालना जिल्हाध्यक्ष सुनील खरे, जालना ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष सोमेश काबलिये,धनराज काबलिये, चंपालाल भगत,तुजलेश चौधरी संदीप बटावाले, सेवकराम नारियवाले, प्रभूलालजी गोमतीवाले, नेमीचंद भुरोबाल, नेमीचंद भगवा,राजेश फतेलष्करी,समर्पण विजयसेनानी अभय यादव, मदन भुरेवाल,ब्रम्हा जांगडे,गणेश सुपारकर,मनीष नंद यादव,नारायण अप्पा काटकर, नरेंद्र जांगडे,बाबू मामा जतकर, पंजाबराव अवघड,तुलसीराम विजय सेनानी,सुबोध विजय सेनानी,गणेश बरावाले,जसुलाल भुरेवाल,लक्ष्मण आप्पा सुपारकर, कमलेश सुपारकर तसेच गवळी समाजातील असंख्य समर्थक बंधू-भगिनी , विविध भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
#जालना Raosaheb Patil Danve