Live Nanded

Live Nanded Stay updated with our latest news of Nanded

आपल्या नांदेडला सिटी बस अत्यंत गरजेची आहे.तुमचे काय मत आहे??
02/09/2024

आपल्या नांदेडला सिटी बस अत्यंत गरजेची आहे.

तुमचे काय मत आहे??

06/05/2024

🟡 YELLOW ALERT:
*वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता*

नांदेड दि. 6 मे :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 6 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 6 व 7 मे 2024 हे दोन दिवस *येलो (Yellow) अलर्ट* 🟡 जारी केलेला आहे. दिनांक 6 व 7 मे 2024 ह्या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

*या गोष्टी करा* : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

*या गोष्टी करु नका* : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

नांदेडच्या बातम्या मिळविण्यासाठी जॉईन करा:

26/04/2024

देगलूर येथे एका युवकाचा ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न : अधिक माहितीसाठी हा व्हीडिओ बघा

04/04/2024

लोकसभा निवडणुकीसाठी नांदेडमध्ये एकूण ९२ अर्ज दाखल

नांदेड दि. ४ एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माहिती दिली आहे.

अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. दुपारी 11 वाजेनंतर छाननीच्‍या कामास सुरूवात होणार आहे. त्‍यामुळे उद्या दुपारपर्यंत ९२ अर्जापैकी किती अर्ज रद्य झाले हे कळेल. उमेदवारांना अर्ज ८ एप्रिल पर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.

31/03/2024

गुवाहाटीला विमानफेऱ्या नाहीत
😐 🙄

31/03/2024

पुणे - मुंबई वगळून इतर ठिकाणांसाठी विमानसेवा आजपासून सुरू. 🌍✈️✈️

30/03/2024

नांदेडला विजेच्या गडगडाटांसह जोराचा वारा, पाऊस नाही

तुमचा एरिया आणि अनुभव कमेंट करा

असे शिस्तबद्ध ट्रॅफीकचे चित्र आपल्या नांदेडला कधी बघायला मिळणार ??शेअर करा 🙏
30/03/2024

असे शिस्तबद्ध ट्रॅफीकचे चित्र आपल्या नांदेडला कधी बघायला मिळणार ??

शेअर करा 🙏

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील 924 किलोमीटर अंतराचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नुकत्याच मीटर गेज...
29/03/2024

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील 924 किलोमीटर अंतराचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नुकत्याच मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झालेल्या रेल्वे लाईन्स वगळता नांदेड विभागातील पूर्वीच्या ब्रॉडगेज रेल्वे लाईन्सचे संपूर्ण विद्युतीकरण झाले
#नांदेड

29/02/2024

केंद्राच्या किसान योजनेसह महाराष्ट्रात प्रत्येकी दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा....आचारसंहिता लागायलं मोकळी...!

दुकान फर्नीचर सोबत किरायाने देणे आहे"राम हाईट्स"  वेदांत नगर, तरोडा (खु), मालेगांव रोड,राज मॉल B जवळ. साइज 200sq ft समोर...
13/02/2024

दुकान फर्नीचर सोबत किरायाने देणे आहे

"राम हाईट्स" वेदांत नगर, तरोडा (खु), मालेगांव रोड,राज मॉल B जवळ.

साइज 200sq ft समोर
10ft माेकळी जागा भाडे रू 12000/–(निगोशिएबल)। डिपोजिट 50000/–

किराणा व जनरल स्टोअर, मेडिकल स्टोअर,इलेक्ट्रीशियन, डेयरी,साठी उपयुक्त

संपर्क 7385523331, 8208381488

https://maps.app.goo.gl/sSwFu74kr1nYADqp7

Address

Nanded

Telephone

+918446952250

Website

https://whatsapp.com/channel/0029VaeI1PxKWEKmaRCllZ12

Alerts

Be the first to know and let us send you an email when Live Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Live Nanded:

Share