Loha live news

Loha live news मत जनतेचे, प्रश्न सर्वसामान्यांचे

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ३० जून १ व ४ जुलै या तीन दिवसासाठी यॅलो अलर्ट जारी नांदेड, दि. ३० जून:- प्रादेशिक हवामानशा...
30/06/2025

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ३० जून १ व ४ जुलै या तीन दिवसासाठी यॅलो अलर्ट जारी
 
नांदेड, दि. ३० जून:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 30 जून 2025 रोजी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 30 जून, 01 जुलै, 04 जुलै 2025 या तीन दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. 30 जून 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस व 01 जुलै व 04 जुलै 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
या गोष्टी करा
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते.
 
या गोष्टी करु नका
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

🚍🚦उदगीर -🔁- छत्रपती संभाजीनगर (सिडको)..🚦🚍🔥 #लालपरी_आख्या_महाराष्ट्राची_शान✨❤️ ..😍❤️°*°*°*°*°*°*°*° 🔹🗺️🏁 मार्गे :- उदगीर ...
13/04/2025

🚍🚦उदगीर -🔁- छत्रपती संभाजीनगर (सिडको)..🚦🚍🔥
#लालपरी_आख्या_महाराष्ट्राची_शान✨❤️ ..😍❤️

°*°*°*°*°*°*°*°

🔹🗺️🏁 मार्गे :- उदगीर -- वाढवणा (पाटी) -- हाळी/हंडरगुळी -- शिरूर ताजबंद -- अहमदपूर -- किनगाव -- अंबेजोगाई -- केज -- मांजरसुंबा -- बीड -- गेवराई -- पाचोड -- आडुळ -- छत्रपती संभाजीनगर (सिडको).🔹
••••••••••••••••••

🔹उदगीर बस स्थानकावरून निघण्याची वेळ :-
⏰सकाळी :- ०७.३० वाजता.
⏰ दुपारी :- १२.०० वाजता.🔹
••••••••••••••••••

🔹सिडको (छत्रपती संभाजीनगर) बस स्थानकावरून निघण्याची वेळ :-
⏰सकाळी :- ०७.४५, ०९.०० वाजता.🔹
••••••••••••••••••

🔹मार्ग अंतर जाणे:- ३२० कि.मी.🔹
••••••••••••••••••

🔹मार्ग अंतर जाणे येणे:- ६४० कि.मी.🔹
••••••••••••••••••

🔹बस क्रमांक:- एम एच २० बी एल २३२८ (MH 20 BL 2328)🔹
••••••••••••••••••

🔹रा.प.म. उदगीर आगार (लातूर विभाग)🔹
••••••••••••••••••

🔹📸 छायाचित्र :- .mh.24 📸🔹
••••••••••••••••••

#वाट_पाहीन_पण_एसटी_नेच_जाईन😍😍❣️
••••••••••••••••••

‼️⚠️📢नोट :- सदरील Post,Video आणि Caption जो कोणी आम्हाला न विचारता Use करत असेल तर, जो Use करेल त्याचा Account ला ⚠️Copyright Scam लावण्यात येईल.💯👍🏻.

***************
🔹लाईक ❤️ कमेंट 💬 शेअर 💹 करा 🔹
•••••••••••••••••••

🔹🙏🏻असेच सहकार्य करत राहा 🙏🏻🔹
•••••••••••••••••••

🔹🛡️ अश्याच नवनविन पोस्ट साठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका 🛡️🔹
••••••••••••••••••••

.mh.24

🔴
•••••••••••••••••••••

🙏🏻✨ आमच्या पेजला भेट दिल्या बद्दल धन्यवाद ✨🙏🏻

10/04/2025

Address

Nanded

Telephone

918888011313

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loha live news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Loha live news:

Share