14/01/2025
नांदेड जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईलमध्ये रोजगाराच्या संधी
• इच्छुकांनी संकेतस्थळावर नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 14 जानेवारी :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत नांदेड जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या 25 ते 45 वर्षे वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवाराकडे (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजीओ थेरपी, नर्स असीस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बी.एस्सी नर्सींग, पोस्ट बी.एस्ससी नर्सींगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
नांदेड जिल्ह्यातील इस्त्राईलला नोकरीसाठी जाणाऱ्या इच्छूक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे
00000
Maharashtra International, an innovative initiative by the Department of Skills, Employment, Entrepreneurship, and Innovation, Government of Maharashtra, is dedicated to connecting the state's skilled youth with global job opportunities. As a state-backed platform, we serve as a vital link between M...