02/06/2023
*विवाहजुळणी ते विवाहकार्यपूर्ती एक अनोखा संस्मरणीय स्वानुभव*- अतिशय वाखाणण्याजोगा हा प्रवास(आपल्याच समाजातील, आपल्याच परिवारातील आणि आपल्याच आठवण साठवणीतील) सहज सुचलं, तरी-प्रत्येकाने निवांत वेळात वाचावा असा:- साधारणतः मार्चमधील गोष्ट आहे. आपल्याच समाजातील (आमच्या नात्यातील) दिवस कार्यक्रमात गेलो असता तिथे आमचे सहकारी अत्यंत कृतीशील व्यक्तिमत्व- श्री.केलेदादा होतेच. हसत बोलत भेट झाली व त्यांचेबरोबर असलेले श्री. मुसळे (कळवणकर)ह्यांचा परिचय देत त्यांच्या मुलीसाठी स्थळ सुचविणेस विनंती करत त्यांचेजवळील आलेला एक मुलाचा बायोडाटा दाखविला आणि मी आश्चर्यचकीत होत नात्यातलेच असल्याचे व पुरेपुर प्रयत्न केला जाईल असे सांगितले,.तर मग नंतर मात्र लगेचच आपले नंदूशेठला फोन करून सांगितलं, बायोडाटांची माहिती पाठवली आणि त्याच दिवशी मुलामुलीची कुंडली व गुण जुळल्याचे तसेच समक्षेत्र, समवयस्क, कदकाठी सारखीच अशा आणखीन काही बाबी जुळल्या, पुढे काही दिवसातच एकाच दिवशी दोघांच्याही नुसताच पाहणीचा! नव्हे तर मुलाला नारळ व मुलीला साडी देणे कार्यक्रम झाला सर्व काही हसतखेळतच दोन्हीही घरची मंडळी अगदी खूश होती, मला तर हे स्वप्नवत वाटत होते.म्हणजे हा सुखद अनुभव प्रथमच घेत होतो कसे विधिलिखित असते तेही पुढे बघू या , मग एप्रिलमध्ये साखरपुडा कळवणला मोठा दणक्यात झाला बाकी सगळे पहातच राहिले मुला मुलीचे कळवणकर मामा मुळातच हौशी व एकमेकाचे पक्के मित्र हाही एक मुलामुलीच्या विवाहासाठी प्लसपाॅईंट ठरला, मग आम्ही अगदी बिनधास्त झालो पुढील संपूर्ण शिष्टाचार, मुलामुलीच्या प्री-वेडिंगची हौस, आणि मे-29 चा वेदिक पद्धतीचा व गोरज मुहूर्तात झालेला झगमगाटातील विवाह सोहळा अख्या कळवणच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत सस्मरणीय राहील असाच झाला वरवधूंच्या आईबाबांचे डोळे तर आनंदाश्रूंनी भरले होते. कारण ह्या विवाह सोहळ्यात कोणत्याही प्रकारची उणीव भासू न देता समस्त खंबीर पाठीराखेंच्या सहकार्याने कोणतेही गालबोट न लागता अत्यंत आनंदात पार पडला....आणि इथेच खरे तर संपूर्ण कुटूंब, परिवार, नातीगोती, समाजबांधवांचे एकजुटीचं दर्शन घडले. मी तर त्या विधात्याचे शतशः आभार मानतो की त्याने माझेकडून हे योगजुळणीचे काम करवून घेतले.... असा हा समस्त समाजासाठी आदर्शवत विवाह सोहळा सर्वांना लाभप्रद हो व नवदांपत्यास पुढील संसारवाटचालीस यशस्वीमय शुभेच्छा व हीच आई कुलस्वामिनी चरणी प्रार्थना 👆🏼👍🏼✌🏻👏🏼👏🏼👏🏼👌🙏💐❤️🌹🧡🤍💚😊- चंद्रकांत स पुरकर सर नाशिक4 धन्यवाद😃...