Nashik Mirror

Nashik Mirror Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nashik Mirror, News & Media Website, Nashik.

Nashik Mirror फेज ला आजच फॉलो व लाईक करा.फेज वर सामाजिक, राजकीय, क्रिडा, धार्मिक, सांस्कृतिक,नवीन तंत्रज्ञान, शैक्षणिक, अशा सर्वच क्षेत्रातील नाशिक शहर जिल्हा सह देशभरातील घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवणार आहोत.
मुख्य संपादक: सागर आनप
संपर्क : 9604089617

25/10/2025

चूक माझी होती, कबुलीही माझीच.
अनधिकृत होर्डिंगवर माझा फोटो वापरला गेला, पण त्याची जबाबदारी मी घेतो.
महापालिका आणि पोलीस प्रशासनाची जाहीर माफी मागतो.
कायद्याचा सन्मान करु या — कारण नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे 🙏
#मीचुकलो_तुमीचुकूनका

📰 नाशिक मिरर — जमीनीवरून लोकांसाठी खरी बातमी घेऊन येणारा आवाज!
👉 आमचं पेज फॉलो करा आणि नाशिकच्या प्रत्येक अपडेटशी जोडा!

---

📌 Hashtags:

24/10/2025

🚨 नाशिक दूध बाजारात थेट पोलिसांना आव्हान!
“११२ ला फोन करा… काही फरक पडत नाही!” — या वक्तव्याने नाशिक शहरात खळबळ माजली आहे.
दूध बाजार परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे थेट हाक दिली असून, सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

📍 नाशिक मिरर न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलंय शहरातील प्रत्येक बातमी, थेट जमिनीवरून.

👉 पाहा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा!

#दूधबाजार #112 #दूधबाजार #मराठीरील #दूधबाजार #मराठीबातम्या

23/10/2025

नाशिकमध्ये दिवाळीच्या दिवशीच राडा करणाऱ्या भाईला पोलिसांकडून शिक्षा 👮‍♂️

राधाकृष्णनगर मधील स्वयंघोषित 'भाई'च्या दहशदीवर पोलिसांकडून इंस्टेंट कारवाई 🚨

📍सातपूर पोलीस ठाणे, नाशिक
🗞️ — नाशिकचा आवाज

NASHIK :रेड्यांच्या मिरवणुकीत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'चा गजर!* *Nashik Mirror News*👇🏻👇🏻👇🏻
23/10/2025

NASHIK :रेड्यांच्या मिरवणुकीत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'चा गजर!* *Nashik Mirror News*👇🏻👇🏻👇🏻

रेड्यांच्या मिरवणुकीत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'चा गजर!नाशिक पोलिसांच्या मोहिमेचा प्रतिध्वनी सणातही!....

*नाशिक : राधाकृष्णनगर मध्ये परप्रांतीय स्वयंघोषित ‘भाई’चा दिवाळीला राडा! | गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी**सवि...
22/10/2025

*नाशिक : राधाकृष्णनगर मध्ये परप्रांतीय स्वयंघोषित ‘भाई’चा दिवाळीला राडा! | गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी*

*सविस्तर बातमी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

राधाकृष्णनगर, नाशिकमध्ये दिवाळीच्या दिवशी परप्रांतीय स्वयंघोषित ‘भाई’ आकाश पांडे आणि त्याच्या बहिणीने गल्लीत.....

22/10/2025

नाशिकमध्ये दिवाळीच्या दिवशीच राडा! 💥
राधाकृष्णनगरात परप्रांतीय स्वयंघोषित 'भाई'चा दहशतीचा खेळ —
गल्लीतील नागरिकांना "कापून टाकू!" अशी धमकी 🚨
सातपूर पोलिसांकडून गुन्हा दाखल, पुढील कारवाईकडे लक्ष 👮‍♂️

📍राधाकृष्णनगर, सातपूर, नाशिक
🗞️ — नाशिकचा आवाज





21/10/2025

त्र्यंबकेश्वर रोडच्या वारसा हक्काच्या जमिनींमध्ये सरकारचा ( NMRDA ) मनमानी कारभार स्थानिक भूमिपुत्र व्यावसायिकांना व स्थानिक शेतकऱ्यांना बेघर व भूमिहीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे . विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी असून शेतकऱ्यांना बेकायदेशीर ठरून अतिक्रमण घोषित करून हडपण्याचा प्रयत्न NMRDA करत आहे असं त्याचं म्हणणं आहे ..

शेतकरी उद्भवस्त व लाखोंचे नुकसान NMRDA च्या जाचक अटींचा जाहीर निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे,

मंगळवार दि.21/10/25 रोजी
सकाळी 10.30 वा
NMRDA च्या निशादार्थ
बेझे फाटा येथे आ. हिरामण दादा खोसकर
यांच्या नेतृत्वा मध्ये
ठेचा भाकरी आंदोलन करून
"काळी दिवाळी ,साजरी करायची आहे असे नागरिकांनी सांगितले आहे,

लढा मातीसाठी ..
लढा शेतकऱ्यांसाठी ..
लढा भूमीपुत्र व्यवसायिकांसाठी..
काळी दिवाळी

असा नारा दिला जात आहे,

#काळीदिवाळी #त्र्यंबक #उपोषण

21/10/2025

नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे — देवेंद्र फडणवीस यांचं नाशिक पोलिसांना थेट कौतुक 👮‍♂️🔥

नाशिकमधील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे. त्यांनी सांगितलं — “नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. पोलिसांची ही मोहिम अत्यंत प्रभावी आणि लोकाभिमुख आहे.”

फडणवीस पुढे म्हणाले की, नाशिक पोलिसांनी गुन्हेगारीवर केलेली मोहीम राज्यभर आदर्श ठरत आहे. “कुठलीही काळजी करू नका, कायदा तुमच्या पाठीशी आहे. बांधून ठेवा धैर्य, आणि दबावाखाली काम करू नका — कारण कायदा आणि न्याय दोन्ही तुमच्या बाजूने आहेत,” असे आश्वासक शब्द त्यांनी पोलिस व नागरिकांना दिले.

नाशिक पोलिसांच्या सजगतेमुळे आणि तत्पर कारवाईमुळे शहरात शिस्त आणि सुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. “नाशिकचं नाव आज राज्यात कायद्याच्या अंमलबजावणीत सर्वात पुढे आहे,” असं गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.

नाशिक मिररकडून नाशिक पोलिसांना सलाम 🙌 🚓🔥

21/10/2025

ठक्कर बाजारातील व्हिडिओवरून गोंधळ! पोलिसांकडून तत्पर कारवाई — खरी घटना उघडकीस! 🚔

नाशिक शहरातील ठक्कर बाजार परिसरातील एका रिक्षाचालकाकडून प्रवाशाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि शहरभर चर्चेचा विषय ठरला. मात्र नाशिक पोलिसांनी अवघ्या काही तासांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून खरी घटना उघडकीस आणली आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तपासात स्पष्ट केले की व्हायरल झालेल्या व्हिडिओतील रिक्षाचालक किंवा रिक्षेचा त्या घटनेशी काहीही संबंध नाही. प्रत्यक्षात हा प्रकार एका फिरस्तीने लहान मुलाला अश्लील शब्द बोलल्याने झाला होता. मुलाने हे आपल्या वडिलांना सांगितले आणि शौचालयातील कर्मचाऱ्यांनाही माहिती दिली. त्यानंतर त्या फिरस्तीने मुलाचे वडील आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.

घटनेचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर “रिक्षाचालक प्रवाशाला मारहाण करतो” असा दावा करत व्हायरल करण्यात आला. मात्र नाशिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खरी माहिती समोर आणली आणि दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

“नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे” असं सांगत पोलिसांनी पुन्हा एकदा आपलं काम किती जलद, अचूक आणि पारदर्शक आहे हे सिद्ध केलं आहे. 👮‍♂️👏

🚓🔥

21/10/2025

ठक्कर बाजारातील व्हिडिओवरून गोंधळ! पोलिसांची तत्पर कारवाई — खरी घटना उघडकीस! 🚔

नाशिक शहरातील ठक्कर बाजार परिसरातील एका रिक्षाचालकाकडून प्रवाशाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि शहरभर चर्चेचा विषय ठरला. मात्र नाशिक पोलिसांनी अवघ्या काही तासांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून खरी घटना उघडकीस आणली आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तपासात स्पष्ट केले की व्हायरल झालेल्या व्हिडिओतील रिक्षाचालक किंवा रिक्षेचा त्या घटनेशी काहीही संबंध नाही. प्रत्यक्षात हा प्रकार एका फिरस्तीने लहान मुलाला अश्लील शब्द बोलल्याने झाला होता. मुलाने हे आपल्या वडिलांना सांगितले आणि शौचालयातील कर्मचाऱ्यांनाही माहिती दिली. त्यानंतर त्या फिरस्तीने मुलाचे वडील आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.

घटनेचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर “रिक्षाचालक प्रवाशाला मारहाण करतो” असा दावा करत व्हायरल करण्यात आला. मात्र नाशिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खरी माहिती समोर आणली आणि दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

“नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे” असं सांगत पोलिसांनी पुन्हा एकदा आपलं काम किती जलद, अचूक आणि पारदर्शक आहे हे सिद्ध केलं आहे. 👮‍♂️👏

🚓🔥

20/10/2025

🚔 नाशिक पोलिसांचा कायद्याचा बालेकिल्ला पुन्हा सिद्ध!

➡️ माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांना पोलिसांनी अटक केली.
➡️ नाशिक पोलिसांनी दाखवून दिलं — कायद्यापुढे कुणीही मोठं नाही!
➡️ न्याय सर्वांसाठी समान, हीच खरी नाशिक पोलिसांची ओळख. 🙌

💬 सन्मान नाशिक पोलिसांचा — जेथे नियमच राज्य करतो!

#कायद्याचाबालेकिल्ला

19/10/2025

🚨 नाशिक पोलिसांचं अधिकृत स्पष्टीकरण – आयटीआय सिग्नलवरील आत्महत्येच्या प्रयत्नावर मोठा खुलासा!

➡️ सातपूर पोलिसांनी दिली अधिकृत माहिती 💬
➡️ घटनेमागचं खरं कारण समजून घ्या या व्हिडिओत 🎥
➡️ सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे वाचला एक जीव 🙏
➡️ पाहा पूर्ण व्हिडिओ आणि जाणून घ्या संपूर्ण सत्य 🔍

🗣️ सारांश:
नाशिक पोलिसांचं वक्तव्य आता समोर आलं आहे — नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा! 👇

#नाशिकपोलीस #सातपूरपोलीस

Address

Nashik
422012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Mirror posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nashik Mirror:

Share