MBP Live24

MBP Live24 बातम्या | माहिती | मनोरंजन

अहिल्यानगर - प्रभाग 3 चे इच्छुक उमेदवार अभिजीत दरेकर यांची प्रेरणादायी मुलाखत पहा! बदलाच्या नव्या प्रवासाबद्दल, नेतृत्व ...
29/11/2025

अहिल्यानगर - प्रभाग 3 चे इच्छुक उमेदवार अभिजीत दरेकर यांची प्रेरणादायी मुलाखत पहा! बदलाच्या नव्या प्रवासाबद्दल, नेतृत्व गुणांबद्दल, सामाजिक कार्यातील सहभाग आणि भविष्यातील योजनांवर त्यांनी दिलेली स्पष्ट मते या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. या Exclusive Interview मध्ये अभिजीत दरेकर यांनी युवकांसाठीचा संदेश, समाजकारणातील भूमिका, आगामी बदलांची रणनीती आणि जमीनीवरील कामाचा अनुभव प्रामाणिकपणे शेअर केला आहे. (लिंक पहिल्या कमेंटमध्ये)

👉 हा व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
👉 तुमचे मत आणि प्रश्न कमेंटमध्ये लिहा!

नवरात्रीतले नऊ दिवस महिलांसाठी मोफत ओपीडी सेवा. माहेर हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम अहिल्यानगर.
21/09/2025

नवरात्रीतले नऊ दिवस महिलांसाठी मोफत ओपीडी सेवा.
माहेर हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम अहिल्यानगर.

भारदे हायस्कुलमध्ये ऐतिहासिक दुर्मिळ नाणी व नोटांचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादशेवगाव (अहिल्यानगर) - य...
27/08/2025

भारदे हायस्कुलमध्ये ऐतिहासिक दुर्मिळ नाणी व नोटांचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेवगाव (अहिल्यानगर) - येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुल मधील इतिहास विभागाच्या वतीने संग्राहक महेश लाडने यांच्या ऐतिहासिक दुर्मिळ नाणी व नोटा प्रदर्शनाचे आयोजन मंगळवारी सकाळी १० ते दु. 3 वेळेत करण्यात आले.

या प्रदर्शनाचे उदघाटन हरीश भारदे व प्रा. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना महेश लाडने म्हणाले की, 'मोबाईल हातातून निघाला तरच छंदाना वेळ मिळू शकतो.

छंद तुमच्या व्यक्तिमत्व विकसनासोबत मनाला आनंद देत फावला वेळ चांगल्या गोष्टीत घालवण्यास बळ देतात. म्हणून विद्यार्थ्यांनी आवर्जून छंदासाठी वेळ द्यावा'. या प्रदर्शनात २५ विविध देशातील नाणी व नोटा, त्यांची रंजक कहाणी देत महेश लाडने यांनी विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.

इयत्ता पाचवी ते दहावीच्या ९५० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन सुयोग बकोरे, दिलीप पालमकर, रवींद्र पवार, प्रसाद जहागीरदार व सर्व इतिहास शिक्षकांनी केले.

उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा, सण आपल्या बळीराजाचा., बैलपोळा निम्मित सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !      ...
22/08/2025

उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा, सण आपल्या बळीराजाचा., बैलपोळा निम्मित सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !

19/08/2025

राज्यात पुढील २४ तासासाठी 'या' पाच जिल्ह्यात रेड अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

मुंबई (MBP Live24) - राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज सांगितला आहे. त्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सायंकाळी ५.३० पासून ते दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सकाळी ५.३० पर्यंत ३.५ ते ४.३ मीटरउंच लाटांचा इशारा दिला आहे.

तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सकाळी ५.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० पर्यंत ३.३ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असल्याने सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली, रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील गड नदी, वाघोटण या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक नांदेड तालुका मुखेड येथे कार्यरत असून आतापर्यंत २९३ नागरिकांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभाग व राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (National Remote Sensing Centre) या केंद्रीय संस्थासोबत सतत संपर्क साधत आहेत. तसेच पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.

19/08/2025

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शाळांना दोन दिवस सुट्टी

सातारा (MBP Live24) – अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बुधवारी व गुरुवारी म्हणजेच २० व २१ ऑगस्ट रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून त्याअनुषंगाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा व कराड या तालुक्यांतील सर्व शाळा या दोन दिवस बंद राहतील.

तसेच कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण व फलटण या तालुक्यांतील परिस्थिती पाहून स्थानिक तहसीलदार व गटविकास अधिकारी शाळा बंद ठेवाव्या अथवा सुरू ठेवाव्या याबाबतचा निर्णय घेणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असून सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश संबंधित पालकांना देण्यात आले आहेत.

तसेच सुट्टीच्या काळात होणाऱ्या शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेऊन अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मुसळधार पावसाबाबत हवामान खात्याचा इशारा..
19/08/2025

मुसळधार पावसाबाबत हवामान खात्याचा इशारा..

नेवाशात फर्निचर दुकानाला भीषण आग, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यूनेवासा (अहिल्यानगर) – नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील मयूर रासने ...
18/08/2025

नेवाशात फर्निचर दुकानाला भीषण आग, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

नेवासा (अहिल्यानगर) – नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील मयूर रासने यांच्या फर्निचर दुकानाला सोमवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागून पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.

या आगीत रासने कुटुंबातील मयूर अरुण रासने (४५), त्यांची पत्नी पायल मयूर रासने (३८), दोन मुले अंश (१०) व चैतन्य (७) यांच्यासह अंदाजे ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर, यश किरण रासने (२५) हा गंभीर जखमी असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मयूर रासने यांचे फर्निचर दुकान व त्याच्याच वरच्या मजल्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब वास्तव्यास होते. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

स्थानिक नागरिकांनी बचावकार्याचा प्रयत्न केला मात्र तोवर ज्वाळांनी मोठे रूप धारण केले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दहीहंडीचा हा मंगल उत्सव तुमच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेची नवी किरणे घेऊन येवो.
16/08/2025

दहीहंडीचा हा मंगल उत्सव तुमच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेची नवी किरणे घेऊन येवो.

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when MBP Live24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MBP Live24:

Share