29/08/2026
खंड ०५ – समरकंद | घटनाक्रम – ०२
समरकंदच्या ऐतिहासिक चौकात पोहोचलो… पण पुढे जे घडलं ते अजिबात अपेक्षित नव्हतं! 😳
Driver ने गाडी थांबवली. मला वाटलं, कदाचित काहीतरी झालं असेल... पण तो अचानक गाडी Reverse घेऊ लागला... आणि पुढच्याच क्षणी... धाडऽऽऽऽक! 💥 मोठ्ठा आवाज झाला!
मी अक्षरशः दचकलो! 😳 Driver ने मागच्या गाडीला जाऊन धडक दिली होती! काही क्षण मला नेमकं काय झालंय तेच कळेना. आजूबाजूचे लोक जमा होऊ लागले. ज्या गाडीला धडक बसली होती, त्या गाडीचा Driver अक्षरशः संतापला होता. माझा Driver मात्र खाली उतरला आणि त्याने व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळायला सुरुवात केली. मी गाडीतच बसून सगळं पाहत होतो... मनात एकच विचार होता... “आपण कुठल्या देशात येऊन काय काय अनुभव घेतोय राव!” 😅 साधारण पंधरा-वीस मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. शेवटी वाद मिटला आणि माझ्या Driver ने मला Registan Square च्या चौकात आणून सोडलं. आणि इथून माझ्यासमोर उलगडणार होतं... समरकंदचं इतिहासाने भरलेलं एक वेगळंच जग!
🕌 Registan Square...
हे एक प्रमुख Tourist Attraction असल्यामुळे या परिसरात लोकल उझबेकी नागरिक आणि पर्यटकांची बरीच लगबग होती. पादचाऱ्यांसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रशस्त असे फुटपाथ बनवले होते. आजूबाजूला जुन्या वास्तू, सुंदर इमारती, स्वच्छ रस्ते आणि पर्यटकांची वर्दळ... एक वेगळीच vibe होती! चालत चालत पुढे जात असताना मला रस्त्यात दोन उझबेकी मुली भेटल्या. मी नेहमीप्रमाणे संवाद साधायचा प्रयत्न केला... “Hello... How are you?” त्या हसत म्हणाल्या... “Fine!” मी विचारलं... “What's your name?” त्यातील एकीचं नाव होतं अरीजोदा आणि दुसरीचं जार्निगोर. खरंच खूपच युनिक नावं होती. मी त्यांना माझा परिचय दिला. “I'm from India.” India हे नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. मी त्यांना गंमतीने म्हणालो... “Say hi to India!” आणि तितक्यात त्यातील छोट्या मुलीने स्वतःहून हात जोडले आणि म्हटलं... “नमस्ते!” 🙏 मी तर अक्षरशः आश्चर्यचकित झालो! त्या दोघींना प्रॉपर इंग्रजी येत होतं आणि आपल्या देशात आलेल्या परदेशी पाहुण्याचा आदर-सन्मान कसा करायचा, याची जाणीव त्यांच्या छोट्याशा कृतीतूनही दिसत होती. माझ्यासाठी हा खूपच overwhelming experience होता. मी देखील हात जोडून त्यांना म्हणालो... “नमस्ते!” आणि पुढे निघालो. प्रवासात अशा छोट्या-छोट्या भेटींची गंमतच वेगळी असते. कधी एखादं मोठं monument आठवणीत राहतं... तर कधी रस्त्यात भेटलेली दोन अनोळखी माणसं! आजूबाजूचं वातावरण खूपच happening होतं. माझ्या एका बाजूला मोठ्ठा पार्क होता. आतापर्यंतच्या उझबेकिस्तान प्रवासात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत होती... इथली स्वच्छता! रस्ते, सार्वजनिक परिसर, tourist places... जवळपास सगळीकडे कमालीची स्वच्छता दिसत होती.
समरकंद हे मध्य उझबेकिस्तानमधील Zarafshan नदीच्या खोऱ्यात वसलेलं एक प्राचीन शहर आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या शहराने अनेक साम्राज्यांचा उदय आणि अस्त पाहिलाय. समरकंद एकेकाळी Silk Road वरचं हे एक महत्त्वाचं केंद्र होतं. व्यापार, संस्कृती, शिक्षण, विज्ञान आणि खगोलशास्त्र... या सगळ्याचा ठसा आजही इथल्या वास्तूंमध्ये दिसतो. आणि आता... मी त्या इतिहासाच्या अगदी मध्यभागी उभा होतो! फायनली Registan Square च्या Entrance Gate जवळ पोहोचलो. आत जाण्यासाठी तिकीट काढावं लागणार होतं. मी 50,000 सोमचं तिकीट काढलं आणि आत प्रवेश केला. आत गेल्यानंतर काही क्षण मी फक्त समोर पाहत उभा राहिलो... कारण समोर जे होतं... तो फक्त एक चौक नव्हता. तो अक्षरशः इतिहासाचा एक जिवंत अध्याय होता! Registan Square हे समरकंदच्या जुन्या शहराच्या मध्यभागी असलेलं ऐतिहासिक सार्वजनिक मैदान आहे. मध्ययुगीन काळातील इस्लामिक वास्तुकलेच्या सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक म्हणून याकडे पाहिलं जातं. या संपूर्ण परिसराचं सौंदर्य मुख्यतः तीन भव्य मदरशांमुळे आहे. आणि त्या वास्तूंच्या भिंतींवर केलेलं काम पाहून मी अक्षरशः थक्क झालो. रंगीत, निळ्या, हिरव्या आणि सोनेरी रंगांच्या छोट्या-छोट्या टाइल्स... त्यातून तयार केलेली नक्षी... आणि त्यातली बारकाई! विशेष म्हणजे अनेक ठिकाणी हे काम इतक्या सूक्ष्म पद्धतीने करण्यात आलं होतं की जवळून पाहिल्यावर जाणवत होतं... ही फक्त decoration नव्हती... ही कला होती! एकेक छोटा तुकडा... एकेक pattern... आणि त्या प्रत्येकामागे कोणाचातरी वेळ, मेहनत आणि कल्पकता होती. फिरता फिरता मी Tilya-Kori Madrasa मध्ये पोहोचलो. “Tilya-Kori” म्हणजेच साधारण “सोन्याने नटलेले”. नाव का पडलंय हे आत गेल्यावर लगेच समजलं. मी एक मोठा दरवाजा ढकलून आत प्रवेश केला... आणि आतलं दृश्य पाहून काही क्षण अक्षरशः थांबलो. भिंती... घुमट... नक्षीकाम... सोनेरी सजावट... मोझेक... सगळं इतकं सुंदर होतं की जणू एखाद्या राजमहालात प्रवेश केल्यासारखं वाटत होतं. इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि कदाचित म्हणूनच प्रवास मला इतका आवडतो. पुस्तकातला इतिहास वाचणं एक गोष्ट आहे... पण त्या इतिहासाच्या वास्तूंसमोर स्वतः उभं राहणं... ही पूर्णपणे वेगळीच भावना आहे! आत एक छोटंसं Museum देखील होतं. तिथे अनेक स्थानिक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. एका ठिकाणी माझी नजर एका Camel Wool Shawl वर पडली. शाल खूपच मुलायम होती. मी किंमत विचारली तर साधारण 1,20,000 सोम, म्हणजे जवळपास ₹८००. Registan Square चा इतिहासही तितकाच interesting आहे. एकेकाळी हे सार्वजनिक मैदान होतं, जिथे विविध सार्वजनिक घोषणा केल्या जात आणि कार्यक्रम, उत्सव तसेच बाजार भरत असत. नंतर 15व्या शतकात Ulugh Beg Madrasa बांधण्यात आल्यानंतर हे ठिकाण शिक्षण आणि धार्मिक अभ्यासाचं महत्त्वाचं केंद्र बनलं. आज या परिसराचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व इतकं मोठं आहे की 2001 मध्ये Samarkand – Crossroads of Cultures या ऐतिहासिक केंद्राचा UNESCO World Heritage दर्जात समावेश करण्यात आला. फिरता फिरता अचानक एका ठिकाणी एक Statue दिसला. काही उझबेकी लोक तिथे उभे होते. माझ्या हातातला Camera आणि माझा वेगळा लूक पाहून त्यांना माझ्यासोबत फोटो काढायची खूप उत्सुकता होती. आणि मग काय... मी तिथे उभा राहिलो आणि एकामागून एक फोटो सुरू झाले! 😄 क्षणभर खरंच... Celebrity झाल्यासारखी feeling आली राव! 😂 प्रवासात कधी कधी अशी छोटीशी celebrity moment देखील मिळते. आणि अशाच क्षणांमुळे प्रवासाच्या आठवणी अजून रंगतदार होतात. बराच वेळ फिरलो होतो. इतिहास, वास्तुकला, लोक, संस्कृती... सगळं अनुभवता अनुभवता वेळ कधी निघून गेला कळलंच नाही. आता मात्र पोटाने आठवण करून दिली... “इतिहास नंतर बघ... आधी जेवण कर!” 😂 एक Restaurant शोधलं. मस्त जेवण केलं आणि थेट माझ्या Hostel वर परतलो. दिवसामागून दिवस सरत होते... आणि माझी Uzbekistan Trip अपेक्षेपेक्षा जास्तच लांबत चालली होती. पण... मला अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या दिवशी माझ्यासोबत असं काही घडणार आहे, ज्यामुळे माझ्या या प्रवासाची दिशाच बदलणार होती! मी अचानक पुन्हा Tashkent ला का गेलो? तिथे भेटलेल्या त्या दोन व्यक्ती कोण होत्या? आणि त्यांनी मला उझबेकिस्तानच्या त्या बर्फाळ, डोंगराळ भागात नेमकं कुठे नेलं? पुढचा प्रवास माझ्यासाठी इतका अनपेक्षित का ठरला? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर... सर्वप्रथम आपल्या हक्काच्या मराठी पेजला Follow करायला विसरू नका. ❤️🙏
👇 कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा...
“उझबेकी पर्वत”
आणि शक्य असल्यास (अट नाही 🙏) पोस्टला १ Like ❤️ आणि १ Share नक्की करा. तुमचा प्रत्येक Like, Comment आणि Share माझ्यासारख्या स्वतंत्र मराठी प्रवासलेखकाला आणखी लिहिण्याची ऊर्जा आणि प्रेरणा देतो. ❤️
आणि हो...
अफगाणिस्तानच्या प्रवासातील असेच काही खरे अनुभव, अनोळखी माणसं, अनपेक्षित प्रसंग आणि २२ दिवसांचा माझा प्रत्यक्ष प्रवास तुम्हाला पुस्तकातून वाचायचा असेल, तर माझं पुस्तक...
📖 “नाशिककर इन अफगाणिस्तान” उपलब्ध आहे. हे फक्त अफगाणिस्तानच्या ठिकाणांचं वर्णन नाही... तर एका मराठी माणसाने त्या देशात प्रत्यक्ष फिरताना अनुभवलेल्या माणुसकीच्या, धक्कादायक, भावनिक आणि अविस्मरणीय क्षणांचा प्रवास आहे. ज्यांना माझ्या या प्रवासकथा आवडतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे या प्रवासाचा अजून एक जवळचा अनुभव आहे. ❤️
🛒 पुस्तक Amazon वरून मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://amzn.in/d/04UaVdrg
तुम्ही माझ्या प्रवासकथा वाचत असाल, तर त्या पुढेही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा एक Like, Comment, Share आणि पुस्तकाची एक प्रत माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 🙏❤️
भेटूया पुढच्या भागात... तोपर्यंत...
जय हिंद! 🇮🇳
जय महाराष्ट्र! 🚩
📍 ठिकाण : समरकंद, उझबेकिस्तान
✍️ विशाल चव्हाण
#समरकंद #उझबेकिस्तान #मराठीप्रवास #मराठीप्रवासी #प्रवासकथा #प्रवासलेखन #भटकंती #परदेशप्रवास