News wari

News wari Newswari

| Voice of the People Local to Global | Nashik Maharashtra India Truth. Facts. Clarity.

06/06/2026

NEET पेपर लीक प्रकरणावर राष्ट्रीय युवक काँग्रेस आक्रमक; हरियाणातील कुरुक्षेत्रमध्ये केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन

NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रीय युवक काँग्रेसने हरियाणातील कुरुक्षेत्र येथे जोरदार आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

06/06/2026

“‘नही डरेंगे’ हा कॉक्रोच जनता पार्टीचा नवा नारा? आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल”

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनादरम्यान घुमलेला ‘नही डरेंगे’ हा नारा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आंदोलनातील घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दाखवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून हजारो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा नारा पक्षाचा नवा राजकीय संदेश ठरणार का, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे.

06/06/2026

वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असलेल्या रिद्धिका शर्मांचे नवे वादग्रस्त वक्तव्य; जंतर-मंतर आंदोलनात तरुणांना ‘डुक्कर’ म्हटल्याचा आरोप”

जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान रिद्धिका शर्मांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तरुणांना ‘डुक्कर’ म्हटल्याचा आरोप होत असून, यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित युवकांनी त्यांना घेरत थेट प्रश्न विचारले. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

06/06/2026

“कॉक्रोच जनता पार्टीबाबत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे स्पष्ट मत; युवकांच्या आंदोलनाकडे कसे पाहतात?”

देशाच्या राजकारणात नव्याने उदयास आलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि त्यांच्या आंदोलनांबाबत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी आपले मत व्यक्त केले. युवकांचा वाढता सहभाग, पारंपरिक राजकारणावरील नाराजी आणि नव्या राजकीय पर्यायांची गरज यावर त्यांनी भाष्य केले. कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यपद्धतीकडे ते कसे पाहतात आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत अशा चळवळींचे महत्त्व काय आहे, याबाबतचा हा विशेष संवाद.

YouthPolitics

06/06/2026

सोनम वांगचुक जंतर-मंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी उपस्थिती

06/06/2026

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाविषयी तरुणांचे काय मत?

जनतेच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तरुणांचा किती पाठिंबा?


06/06/2026

जंतर-मंतर आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संताप; ‘गोदी मीडिया’विरोधी घोषणां

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि विविध जनहिताच्या मुद्द्यांवर आवाज उठवत कार्यकर्त्यांनी ‘गोदी मीडिया’विरोधातही घोषणा दिल्या. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला.

06/06/2026

जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू; ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आज जोरात सुरू झाले आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’च्या घोषणांनी संपूर्ण जंतर-मंतर परिसर दुमदुमून गेला असून आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

06/06/2026

जंतर-मंतर आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके दिल्लीत दाखल, संविधानासह दिला संदेश

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनासाठी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. हातात भारतीय संविधान घेऊन त्यांनी समर्थकांना शांततापूर्ण आंदोलनाचा संदेश दिला.

06/06/2026

माऊंट एव्हरेस्टवर मृत घोषित केलेला शेर्पा 6 दिवसांनी जिवंत परतला; अन्न-पाण्याविना मृत्यूला हरवणारी थरारक कहाणी

जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवर बेपत्ता झाल्यानंतर मृत घोषित करण्यात आलेल्या एका शेर्पाने तब्बल 6 दिवस अन्न-पाण्याविना संघर्ष करत जिवंत परत येत सर्वांना धक्का दिला. प्रतिकूल हवामान, बर्फाच्छादित प्रदेश आणि जीवघेण्या परिस्थितीत त्याने दाखवलेली जिद्द आता जगभर चर्चेचा विषय ठरत आहे.

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News wari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share