Xtralarge News

  • Home
  • Xtralarge News

Xtralarge News xtralargenews (XXL News) web portal Is all about giving othentic information. We are commited for Real Journalism, no parciality and not ajenda driven news.

only pure NEWS.

NCP चे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये..मुंबई, दि. ७ ऑगस्ट २०२५ ;राष्ट्रवादी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षाचे...
07/08/2025

NCP चे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये..

मुंबई, दि. ७ ऑगस्ट २०२५ ;

राष्ट्रवादी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

बाबाजानी दुर्राणी यांच्यासह परभणीतील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, जिल्हा बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक व हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशात दोन विचारधारा असून समतेचा, संविधानाचा सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक विचार आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधान व लोकशाही न माननारा हुकूमशाही व ‘हम दो हमारे दो’, हा विचार आहे. भारताचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे.
#काँग्रेस #परभणी #बाबाजानीदुर्राणी #मराठवाडा #शरदपवार

NCP चे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये.. मुंबई, दि.

.... भाजपला मिरच्या का झोंबतात ?मुंबई, दि. ७ ऑगस्ट २५;महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गा...
07/08/2025

.... भाजपला मिरच्या का झोंबतात ?

मुंबई, दि. ७ ऑगस्ट २५;

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीची पोलखोल केली तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतका राग यायचा कारण काय होते की त्यांनी असभ्य भाषेचा वापर करत टीका केली ? असा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे..

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, याचा एकच अर्थ जनतेला समजतो तो म्हणजे ही "मतचोरी" संगनमताने केली गेली का ? लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आयोग आणि भाजपने मिळून केला का ?

राहुल गांधी हे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, निवडणूक आयोगाचा बचाव करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते इतके धावपळ का करत आहे ? निवडणूक आयोग स्वतःचा बचाव करू शकत नाही का ?

राहुल गांधी विरोधात असभ्य भाषा वापरून मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले की "कुंपणच शेत खात आहे" राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत, त्याचं स्पष्टीकरण आयोगाने जनतेला दिलं पाहिजे. निवडणूक आयोगाला भाजपच्या क्लिनचीटची गरज इतकी भासते का ?
#काँग्रेस #निवडणूकआयोग #भाजपा #मतदान #राहुलगांधी #विजयवडेट्टीवार

.... भाजपला मिरच्या का झोंबतात ? मुंबई, दि. ७ ऑगस्ट २५; महाराष्ट

काँग्रेसने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान बंद करावा..मुंबई, दि. ७ ऑगस्ट २०२५ :काँग्रेस आणि विरोधकांनी महाराष्ट्राच्या म...
07/08/2025

काँग्रेसने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान बंद करावा..

मुंबई, दि. ७ ऑगस्ट २०२५ :

काँग्रेस आणि विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा सातत्याने चालवलेला अपमान बंद करावा, जर निवडणुकांवर टिकाच करायची असेल तर प्रथम विधानसभेचा राजीनामा द्यावा, असे सडेतोड प्रत्त्युत्तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी राहुल गांधी यांना दिले आहे.

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच पत्रकार परिषद घेत आशीष शेलार यांनी जोरदार प्रत्युतर दिले. आता मतदार याद्यांवर आणि मतदान प्रक्रियेवर गळे काढणाऱ्या विरोधकांनी, विशेषतः कॉन्ग्रेसने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यावर त्यावर आक्षेप घेतला नव्हता याकडेही आशीष शेलार यांनी बोट ठेवले.

ते म्हणाले की निवडणुक आयोग त्यांची बाजू मांडेल परंतु जेव्हा मतदार याद्या आक्षेपांसाठी प्रारूप याद्या जाहिर झाल्या तेव्हा विरोधकांनी काहीच केले नाही. तेव्हा केवळ ३९०० आक्षेप दाखल झाले होते त्यातील केवळ ९८ आक्षेप वैध ठरले होते अशी माहितीही माझ्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले.
#आशिषशेलार #काँग्रेस #निवडणूकआयोग #भाजपा #मतदान #राहुलगांधी #लोकसभा #विधानसभा

Homeताज्या बातम्याकाँग्रेसने महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान बंद करावा.. ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रराजक...

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी NCP ( SP) यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..
07/08/2025

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी NCP ( SP) यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..

Live 🔴| प्रदेशाध्यक्ष, श्री.हर्षवर्धनजी सपकाळ यांचा माध्यमांशी संवाद | टिळक भवन06/08/2025

ज्योतिर्लिंगांच्या जलद विकासासाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती.मुंबई, दि. ६ ऑगस्ट : -राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास...
06/08/2025

ज्योतिर्लिंगांच्या जलद विकासासाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती.

मुंबई, दि. ६ ऑगस्ट : -

राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करतील.

राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावी या करिता या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्योतिर्लिंग व त्यांच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त अधिकारी पुढीलप्रमाणे, भीमाशंकर (जि.पुणे) – सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही. राधा., घृष्णेश्र्वर (जि. छत्रपती संभाजीनगर) – उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी. त्र्यंबकेश्वर (जि.
#घृष्णेश्र्वर #ज्योतिर्लिंग #त्र्यंबकेश्वर #देवेंद्रफडणवीस #परळी #मुख्यमंत्री

Homeताज्या बातम्याज्योतिर्लिंगांच्या जलद विकासासाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती. ताज्या बातम्यामहाराष्ट्र ज्यो....

पहिलीपासून NCC च्या धर्तीवर प्रशिक्षण..मुंबई, दि. ६ ऑगस्ट  :राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्...
06/08/2025

पहिलीपासून NCC च्या धर्तीवर प्रशिक्षण..

मुंबई, दि. ६ ऑगस्ट :

राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यादृष्टीने त्यांनी एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

मुलांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण अथवा एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस मंत्री भुसे यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या या बैठकीत एनसीसीचा राज्यातील विस्तार, प्रशिक्षणाचे स्वरुप, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आदींबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, एनसीसीचे संचालक जेनिष जॉर्ज, कर्नल संतोष घाग, लेफ्टनंट कर्नल अजय भोसले आदी उपस्थित होते.
#दादाभुसे #महाराष्ट्र #शिक्षणमंत्री

Homeताज्या बातम्यापहिलीपासून NCC च्या धर्तीवर प्रशिक्षण.. ताज्या बातम्यामहाराष्ट्र पहिलीपासून NCC च्या धर्तीवर प्रशि...

शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करा..मुंबई, दि. ६ ऑगस्ट :राज्यातील शालेय शिक्षण विभागांच्या सर्व शासकीय शाळांमध्ये पाया...
06/08/2025

शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करा..

मुंबई, दि. ६ ऑगस्ट :

राज्यातील शालेय शिक्षण विभागांच्या सर्व शासकीय शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले आहेत.

मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर शासकीय शाळांच्या दर्जोन्नतीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.

शाळांमधील पायाभूत सुधारणांबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. गुणवत्तेसोबतच शाळेत सुरक्षित, आरोग्यदायी आणि प्रसन्न वातावरण राहिल्यास शासकीय शाळेत पाल्याचा प्रवेश घेण्याचा पालकांचा कल वाढेल. त्यामुळे जिल्हा परिषद, म.न.पा, नगरपालिकांच्या शाळांमध्ये आवश्यकतेनुसार पायाभूत सुविधांची उभारणी विविध संस्था आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावी.
#दादाभुसे #देवेंद्रफडणवीस #पाणी #मुख्यमंत्री #शाळा #शिक्षणमंत्री #सुविधा

Homeताज्या बातम्याशाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करा.. ताज्या बातम्यामहाराष्ट्र शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपल....

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वा-या का वाढल्या ?   #एकनाथशिंदे  #जनपथ  #नरेंद्रमोदी  #पंतप्रधान  #लोककल्याण  #शिवसेना
06/08/2025

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वा-या का वाढल्या ?
#एकनाथशिंदे #जनपथ #नरेंद्रमोदी #पंतप्रधान #लोककल्याण #शिवसेना

Homeताज्या बातम्याएकनाथ शिंदेंच्या दिल्ली वा-या का वाढल्या ? ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रराजकीय एकनाथ शिंदे...

लोढा व अदानींच्या बिल्डिंगमध्ये आदर्श कबुतरखाना उभारा!मुंबई, दि. ६ ऑगस्ट २०२५:मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद स...
06/08/2025

लोढा व अदानींच्या बिल्डिंगमध्ये आदर्श कबुतरखाना उभारा!

मुंबई, दि. ६ ऑगस्ट २०२५:
मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा आदर्श घालून द्यावा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

कबूतरांच्या मुद्द्यावरून भाजपा युती सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कबुतरांमुळे फुप्फुसाचे गंभीर आजार होत असल्याचे निदर्शनास आल्यावरून न्यायालयाने ते हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. पण हे कबुतरखाने हटवू नका अशी मागणी जैन समाजातून होत आहे. नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पण सरकार जाणीवपूर्वक अशा वादाला खतपाणी घालत आहे. भाजपा युती सरकारचे काम म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असे आहे.
#अदानी #कबूतरखाना #काँग्रेस #जैन #दादर #लोढा

Homeताज्या बातम्यालोढा व अदानींच्या बिल्डिंगमध्ये आदर्श कबुतरखाना उभारा! ताज्या बातम्यामुंबईराजकीय लोढा व अदानी....

भाजपाच्या पदाधिका-याची न्यायाधीशपदी नियुक्ती ! #काँग्रेस  #न्यायाधीश  #भाजपा  #लोकशाही  #संविधान  #हर्षवर्धनसपकाळ
05/08/2025

भाजपाच्या पदाधिका-याची न्यायाधीशपदी नियुक्ती !
#काँग्रेस #न्यायाधीश #भाजपा #लोकशाही #संविधान #हर्षवर्धनसपकाळ

Homeताज्या बातम्याभाजपाच्या पदाधिका-याची न्यायाधीशपदी नियुक्ती ! ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रराजकीय भाजपा...

माधुरीला परत आणण्यासाठी सरकारचा पुढाकार..मुंबई, दि. ५ ऑगस्ट २५ ;नांदणी मठात गेल्या 34 वर्षांपासून महादेवी हत्तीण आहे. मह...
05/08/2025

माधुरीला परत आणण्यासाठी सरकारचा पुढाकार..
मुंबई, दि. ५ ऑगस्ट २५ ;
नांदणी मठात गेल्या 34 वर्षांपासून महादेवी हत्तीण आहे. महादेवी हत्तीण पुन्हा मठात यावी ही जनभावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन, राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल. मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य सरकारचा पक्षकार म्हणून समावेश करावा. तसेच वन विभागाच्या वतीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात बैठक संपन्न झाली.
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,यामध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्च स्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्यांचे निराकरण करण्यात येईल. महादेवी हत्तीणीची योग्य निगा राखण्यासाठी राज्य सरकार डॉक्टरांच्या उपलब्धतेसह एक पथक तयार करून, आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यकता वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
#कोल्हापूर #देवेंद्रफडणवीस #नांदणीमठ #महादेवी #माधुरी #मुख्यमंत्री #वनतारा #हत्तीण

Homeताज्या बातम्यामाधुरीला परत आणण्यासाठी सरकारचा पुढाकार.. ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्र माधुरीला परत आणण्....

कावड यात्रा सनातनी हिंदू धर्माचे प्रतीक.हिंगोली, दि. ५ ऑगस्ट २५ :-कावड यात्रा ही फक्त हिंदू धर्माची परंपरा नाही, तर ती आ...
05/08/2025

कावड यात्रा सनातनी हिंदू धर्माचे प्रतीक.

हिंगोली, दि. ५ ऑगस्ट २५ :-

कावड यात्रा ही फक्त हिंदू धर्माची परंपरा नाही, तर ती आपल्या सनातनी हिंदू धर्माचे प्रतीक आहे. म्हणून तर दरवर्षी शिवभक्त हजारो किलोमीटर चालून पवित्र गंगाजल आणून शिवशंकरावर अर्पण करतात. यात त्याग, समर्पण आणि एकजुटीची भावना आहे. भगवान शंकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत होते. त्यामुळे शिवसेनेच्या नावातच 'शिव' आहे आणि ही संघटना दिवसरात्र सर्वसामान्य माणसासाठी झटणारी संघटना आहे. काँग्रेसच्या जोखडाला बांधलेली ही संघटना सोडविण्याचे काम आम्ही सर्वांनी मिळून केले त्यांचा मला सार्थ अभिमान असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

हिंगोली येथे आयोजित केलेल्या भव्य कावड यात्रेच्या समारोपप्रसंगी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

या समारोप सोहळ्याला कावड यात्रेचे मुख्य आयोजक हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, आमदार हेमंत पाटील, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार हिकमत उढाण, बालाजी पाटील खतगावकर आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#एकनाथशिंदे #कावडयात्रा #शिवसेना #हिंगोली

Homeताज्या बातम्याकावड यात्रा सनातनी हिंदू धर्माचे प्रतीक. ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय कावड यात्रा सनातनी हि....

Address

NJ

Alerts

Be the first to know and let us send you an email when Xtralarge News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Xtralarge News:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share