Mumbai express

  • Home
  • Mumbai express

Mumbai express नवीन सॅटेलाईट मराठी न्युज चॅनेल

19/06/2024

महाराष्ट्रातील शेती तज्ञ आणि अचूक हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी येत्या पंधरा दिवसातील पावसाचा हवामान अंदाज वर्तवला असून शेतकरी वर्ग आणि त्याची दखल घ्यावी.

13/06/2024

हे कार्टून कोणी बनवले आहे माहित नाही, परंतु निवडणुका पूर्वी बनवलेला कार्टून व्हिडिओ असून निकालानंतरही अगदी तंतोतंत जुळत असलेला दिसून येत आहे. भाजप सह आघाडीला सहजासहजी यश मिळवता आले नाही. सर काँग्रेसच्या इंडिया आघाडीला सत्तेच्या मॅजिक फिगर पर्यंत पोहोचता आलं नाही. सुरुवातीच्या काळात भाजपा विरोधातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन भरपूर आवाज उठवला, परंतु त्यांची एकी शेवटपर्यंत अखंड राहिलेली दिसून येत नाही.

12/06/2024

वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी पर्याय म्हणून शहरांमध्ये बहुमजली इमारतीचा सर्रास वापर केला जातो. तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे समुद्रामध्ये ब्रिज तयार करतात. हे सर्व करत असताना त्याचा पाया कशा पद्धतीने खोदला जातो हे आपणास माहित आहे का,, नसेल तर हा व्हिडिओ पहा

10/06/2024

रविवारी भाजपच्या एनडीए चे जंबो सरकार स्थापन झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सहा जणांना संधी मिळाली आहे. भाजपचे नितीन गडकरी ,पियुश गोयल ,मुरलीधर मोहोळ ,रक्षा खडसे, तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि रिपाईचे सर्वो सर्वा रामदास आठवले यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. भाजपला महाराष्ट्रात खूपच कमी जागा मिळाल्यामुळे आणि आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून या सहा जणांना मंत्रिमंडळ स्थान मिळाले आहे. तर कोणाला कोणते खाते मिळणार याची उत्सुकता लागून राहिले असून, नितीन गडकरी यांच्याकडे नॅशनल हायवेचे खाते पुन्हा मिळणार का?? याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

05/06/2024

तसं पाहिलं तर कुस्ती हा महागडा क्रिडा प्रकार आहे. पूर्वी कुस्तीला राजाश्रय होता. जसजशी संस्थाने खालसा झाली तसतसा कुस्ती हा प्रकार मागे पडले. परंतु आज ही कुस्ती हा खेळ आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळला जातो. पहिलवान आपली ताकद वाढवण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी काही सुक्यामेव्यापासून थंडाई तयार करतात. ती कशी तयार करतात या व्हिडिओमध्ये दाखवले आहे.

04/06/2024


माणूस जसा विकसित झाला तसतसे माणसाच्या कष्टाची जागा यंत्राने घेतली. पूर्वीच्या काळी शेतीची कामे किंवा इतर कष्टाच्या कामाला माणसाला खूप मेहनत करावी लागत असेल. परंतु मनुष्याच्या आचाट बुद्धीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात आता यांत्रिकीकरण झाले आहे. आजकाल तर अनेक ठिकाणी यंत्रमानव (रोबो) काम करताना पाहावयास मिळत आहे. असं जर शेतीत सुद्धा यंत्र मानव आला तर नवल वाटायला नको...

03/06/2024

पृथ्वीवर जरी ७१ टक्के पाणी असले तरी पिण्यायोग्य पाणी फक्त २९ टक्केच आहे. दुष्काळ भागात पाण्याची काय महत्त्व आहे हे इथे राहणाऱ्या लोकांनाच माहिती. राजस्थानातील एका खेड्यात जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करताना किती कष्ट करावे लागतात हे या व्हिडिओतून दिसून येते..

02/06/2024


आपण बाजारात मीळणारे पाॅपकाॅन नेहमी खातो. बर्याच ठीकानी ते मोटार सायकलवर बनवून देताना दिसतात. परंतु मोठ्या प्रमाणावर पॉपकॉर्न बनवण्याची मशीन आपण कधी पाहिले आहे का. पहा हा व्हिडिओ....

   श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यापुढे असणाऱ्या तळघरात सापडला पुरातन ठेवाजेंव्हा नव्हते चराचर.. तेंव्हा होते पंढरपूरपंढरपूर वि...
01/06/2024

श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यापुढे असणाऱ्या तळघरात सापडला पुरातन ठेवा

जेंव्हा नव्हते चराचर.. तेंव्हा होते पंढरपूर

पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभा-यासमोरील सापडलेलं तळघर उघडण्यात आलंय. पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांनी या तळघरात पाहणी केली. या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत. तर विष्णुबालाजीरुपातील 3 ते 4 फूट उंची असलेली मूर्ती सापडलीये. पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते.त्यांना भग्नमूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत.

विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला. त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याचे समजले. एक 6 बाय 6 फुटाचे चेंबर आहे. येथे एकूण 6 वस्तू आढळल्या. मातीच्या बांगड्या येथे सापडल्या. तसेच जुनी नाणी व दगडाच्या मुर्त्या सापडल्या. हे तळघर आतून बंदीस्त आहे. त्या पलिकडे काही असेल असे वाटत नाही. तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

01/06/2024

पाप्पुआ: न्यू गिनी ची राजधानी पोर्ट मेरेस्बीच्या वायव्येला ६०० किलोमीटर असलेल्या अंतरावर एन्गा प्रांतातील काओकलम गावात झालेल्या भूस्खलनामध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती सरकारने व्यक्त केली आहे. न्यू गिनी च्या उत्तरेकडील दुर्गम भागात हे गाव असून अंदाजे ११०० हून अधिक घरीही गाडली गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

31/05/2024

चोरीचा थरार: या व्हिडिओ मध्ये तिनं चोरट्याने मालवाहक ट्रकचा मोटरसायकल वर पाठलाग करत चोरी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. चोराने आपला जीव धोक्यात घालून प्रथम दोघे मोटरसायकल वरून पाठलाग करत प्रकारावर चढले आणि ताकातील एक गाठोडे खाली टाकून भरधाव टाका वरून मोटरसायकलवर बसत असल्याचे घटना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अत्यंत धोकादायक चोरी म्हणून या व्हिडिओकडे लाखो लोकांचा बघण्याचा कल सोशल मीडियावर वाढला आहे

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mumbai express:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share