
07/08/2025
सामूहिक आत्महत्याचे मूळ कारण शोध दौरा! (Case Study):
वर्तमानपत्रात एक छोटी बातमी आली होती की भरोसा, तालुका चिखली, बुलढाणा गावातील गणेश थुट्टे व त्यांची पत्नी यांनी हुमणी अळीचा उच्छाद, दुबार पेरणी, बँकेचे थकलेले कर्ज या आर्थिक विवंचनेतून सामूहिक आत्महत्या केली.
त्या ठिकाणी जाऊन आम्ही तेथील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन, त्यांच्या आत्महत्येचे मूळ कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
माझ्याबरोबर डॉ. दीपक गायकवाड (कृषी अर्थतज्ञ), श्री बाबुलाल उदावंत, डॉ. अखिलेश कुलकर्णी (कृषी, अर्थ, आयटी, एआय तज्ञ), श्री रवींद्र जाधव होते.
या अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही सर्व कुटुंबीयांची भेट घेऊन सखोल चर्चा केली.
गावातील व्यसनाचे प्रमाण, निरीक्षरता, घरांची दुरावस्था जे आर्थिक स्थितीचे निदर्शक असते, वारसा हक्काने मिळणाऱ्या जमिनीची नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी वगैरे बघितले. तसेच शेतावर जाऊन तेथील सिंचनाची सोय काय, पशुधन किती, पिके, घटना झाली ते स्थळ यांची प्रत्यक्ष पाहणी केली. कृषी पर्यवेक्षक सौ. गीता खेडेकर तसेच तलाठी मॅडम ज्या गावांमध्ये हुमणी प्रादुर्भावाचे सर्वेक्षण करीत होते, त्यांच्याबरोबर ही चर्चा केली.
आम्ही आमच्या शोध निबंधाप्रमाणे एक तपशीलवार अहवाल तयार करीत आहोत. लवकरच पाठवू.
सोबत: बातमी आणि फोटो
सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे
अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518
एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!