
17/06/2025
( सिद्धेश पवार - मी 24 तास प्रतिनिधी )आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान* संघटने कडून
दुर्गराज किल्ले रायगड दर्शन आणि स्वच्छता अभियान रविवार दि.१५/०६/२०२५ रोजी राबविण्यात आले .
या अभियानात ८५ शिवसेवक, शिवसेविका, आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला
सर्व शिवसेवकांनी सकाळी ७ वाजल्या पासुन गड चढ़ाई करण्यास सुरवात केली आणि साधारण साढे आठ वाजता किल्ले रायगडची गड देवता आई शिरकाई देवीचे दर्शन घेवून जगदीश्वराला साकडे घालून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले
होळीच्या माळा वरील महाराजांचे दर्शन घेवून राजसदरेवर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होवून किल्ले स्वच्छता अभियानला सुरवात केली
किल्यावरील स्वच्छता करून शिवसेवकांचे दोन गट करून पायरी मार्गावरील आजूबाजूला असलेला सर्व प्रकारचा कचरा रिकाम्या पाणी बाटल्या जमा करून किल्याच्या खाली आणून ठेवल्या आणि स्वच्छता अभियानाची सांगता केली
हे अभियान संपन्न करण्यासाठी महाडचे प्रांत अधिकारी श्री. पोपट ओमासे साहेब आणि पोलादपुर चे तहसीलदार कपिल घोरपडे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अध्यक्ष श्री मंगेश मोरे यांनी सर्व शिवसेवकांचे आभार मानले.