02/09/2025
आजचा एक ऐतिहासिक क्षण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या आणि गणपती बाप्पाच्या साक्षीने जे श्री.मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणा विरुद्ध आमरण उपोषण बरेचदा केले आणि शेवटी मुंबईत येऊन त्यांचे वादळ धडकले व आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू केले .त्यामुळे जो एक हल्लकल्लोळ माजला आणि आमचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ व पूर्ण मंत्रिमंडळावर निर्णय घेण्याचा,आर या पार असा प्रसंग उद्भवला पण त्यातून त्यांनी अभिमन्यूची भूमिका निभावून आमच्या मराठा समाजाला आरक्षण देऊ केले व सर्व मागण्या मान्य केल्या ज्या दोन राहिलेल्या त्या थोडे दिवसांनी का होईना पण जीआर निघेल आणि जरांगेंनी उपोषण सोडले व सर्व मराठा समाजाला खुश केले. आज त्यांनी सर्व आंदोलनास आलेल्या मराठा बांधवांनी मुंबईमध्ये दिवाळी साजरी केली व प्रत्येक जण आपापल्या घरी गुलाल उधळत माघारी फिरले. याचे सर्व श्रेय देवाभाऊ हे सर्व जे कुशलतापूर्वक हाताळले, त्यांच्या स्थापन केलेल्या शिंदे समितीने योग्य तो निर्णय घेऊन आमच्या मराठा समाजाला न्याय दिला. याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा आभार आणि ह्याचा परिणाम, फायदा ह्या पिढीलाच नाही तर पुढच्या येणाऱ्या सर्व पिढींना या ऐतिहासिक निर्णयाचा लाभ पूर्ण मराठा समाजाला मिळणार आहे, तरुणांना नोकरीचा प्रश्न, आरक्षणामुळे हक्काची नोकरी, तिथली मराठवाड्याची भौगोलिक परिस्थिती पाहता कुटुंबावर असलेली जबाबदारी ,पाऊस व शेतीची असलेली वणवा, उत्पन्नाचे साधन या सगळ्या परिस्थितीचा विचार करता या आंदोलनामधून तरुण वर्गाला नोकरीची हमी, हक्काचे उत्पन्न त्यासाठी करावे लागणारे काबडकष्ट याची कल्पना असल्यामुळे ह्या निर्णयामधून तरुणांना पक्की नोकरीची व कौटुंब चालवण्याची जबाबदारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज संपूर्ण मराठा समाज आनंदीत होऊन आपल्या घरी परतला. आजचा हा सोनेरी ऐतिहासिक क्षण म्हणून नोंदवला गेला. साभार मुख्यमंत्री देवाभाऊ #देवाभाऊ यांना संपूर्ण मराठा समाजाकडून वंदन
मराठा बांधवांच्या आशा-आकांक्षांना न्याय!
देवाभाऊंनी आज इतिहास रचला
जिथं कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्याला जमलं नाही, तिथं देवाभाऊंनी संविधानाच्या चौकटीत बसवून मराठा समाजाला न्याय दिला, आरक्षण दिलं. हे शक्य झालं ते माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ठाम, सकारात्मक भूमिकेमुळे.
मराठा आरक्षणाचा पहिला निर्णय देखील देवभाऊंनीच घेतला आणि शेवटचाही निर्णय त्यांनीच दिला.मराठा समाजाच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे उभा राहणारा नेता म्हणजे "देवाभाऊ"
मराठा समाजाला न्याय देण्याची ताकद आणि प्रामाणिक इच्छाशक्ती जर कोणाकडे असेल तर ती फक्त देवाभाऊंकडेच आहे. महाराष्ट्र सरकारने दिलेला हा विश्वास म्हणजे मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी नवा अध्याय आहे!
जय हिंद, जय महाराष्ट्र!
Devendra Fadnavis