
30/04/2025
*सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर मार्ग अजिंठा नगर धाराशिव येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने समाज प्रबोधनपर भिमगीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न*...
दिनांक २९/०४/२०२५ रोजी अजिंठा नगर धाराशिव येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त समाज प्रबोधनपर भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते विकास बनसोडे, बी.आर आंबेडकर प्रतिष्ठानचे प्रमुख आयु.रोहित (बंटी)शिंगाडे,आयु.संतोष वाघमारे, सम्राट अशोक धम्मचक्र ब.प्रतिष्ठानचे प्रमुख आयु.प्रशांत बनसोडे तसेच अजिंठा प्रतिष्ठानचे आयु.अलंकार बनसोडे,आयु.लालासाहेब सुकाळे,आयु.सुजित माळाळे, व्हाईस ऑफ मिडिया जिल्हाध्यक्ष आयु.हुंकार बनसोडे,सम्यक विद्यार्थी आंदोलनचे आयु.विकास गंगावणे,आयु.अक्षय बनसोडे,आयु.नंदकुमार हावळे,इत्यादी मान्यवरांच्या हास्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सादरकर्ते सुप्रसिद्ध गायक अतुल गंगावणे व संच यांनी विविध समाज प्रबोधनपर भिमगीते सादर केली यावेळी जनतेने त्यांना दाद देत अनेक गीतांची फर्माईश केली,जनतेच्या मागणीला दाद देत भिमगीते सादर केली.यावेळी या कार्यक्रमास आयु.विक्की नायकवाडी,आयु.प्रमोद ठवळे,आयु.रोहित बनसोडे,आयु.शुभम सुकाळे,आयु.परमेश्वर माने,आयु.रंणजीत कांबळे,आयु.सचिन गायकवाड,आयु.विनोद बनसोडे,आयु.महादेव जोगदंड,आयु.सचिन दीपक,आयु.संतोष बनसोडे,आयु.नितीन कांबळे,आयु.सिद्धार्थ बनसोडे उपस्थित होते.