Dharashiv Live

Dharashiv Live The first digital channel in Dharashiv district. Operational for the past 14 years, providing fearless, unbiased, and hard-hitting news.

Always at the forefront of digital media. दैनिक 'धाराशिव लाइव्ह' या वृत्तपत्राची https://dharashivlive.com ही अधिकृत वेबसाईट आहे.या वेबसाईटची कॉपी करणे किंवा साधर्म्य असलेली वेबसाईट चालवणे,हा कायदेशीर गुन्हा आहे. Title Code - MAHMAR45574
RNI No - MAHMAR/2015/61537

बापाची ४० वर्षांची 'पाणीदार' स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा 'तो' कोणता डिसेंबर?
10/09/2026

बापाची ४० वर्षांची 'पाणीदार' स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा 'तो' कोणता डिसेंबर?

10/09/2026

“कलेक्टर म्हणून लाल दिव्यात येणारा मुलगा… ॲम्बुलन्सच्या लाल दिव्यात आला!” — आईचं काळीज पिळवटून टाकणारं वक्तव्य

एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी परंडा तालुक्यातील खासापुरी येथे भेट घेऊन सांत्वन केले.

“मराठा आरक्षण मिळाले असते, तर मागील एमपीएससी परीक्षेत प्रथमेशची निवड झाली असती,” असा दावा करत प्रथमेश यांच्या बहिणीनेही या घटनेवर भाष्य केले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांवरील ताण आणि शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

#प्रथमेशदेशमुख #स्पर्धापरीक्षा #परंडा #खासापुरी #धाराशिव #मराठाआरक्षण #अभिजीतदिपके

10/09/2026

आमदार कैलास पाटील यांच्याकडून देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन; आर्थिक मदतीचा हात

'जशास तसे': राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला 'करेक्ट कार्यक्रम'!
10/09/2026

'जशास तसे': राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला 'करेक्ट कार्यक्रम'!

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
10/09/2026

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

09/09/2026

🚩 येळकोट येळकोट जय मल्हार! 🚩

🙏 बानूच्या भेटीला निघाला मल्हारी…
💛 मनात भरलीया बानू, निघाला चंदनपुरीला!

🎵 नवीन खंडोबा भक्तिगीत
✨ लवकरच रिलीज होत आहे मुक्तरंग म्युझिक चॅनलवर!

🐎 टाच मारुनी घोड्याला…
🚩 निघाला मल्हारी बानूच्या भेटीला!

जय मल्हार! 🙏🚩

#बानूबाई #खंडोबा #खंडोबामहाराज #मल्हारी #मार्तंडमल्हारी जयमल्हार यळकोटयळकोट चंदनपुरी जेजुरी खंडोबाभक्तिगीत मराठीभक्तिगीत NewKhandobaSong MarathiBhaktigeet MuktrangMusic

09/09/2026

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

09/09/2026

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

09/09/2026

परंडा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण, तीन जणांवर गुन्हा दाखल

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचे धाराशिवमध्ये पडसाद; उमरग्यात तहसीलदारांची खुर्ची पेटवलीउमरगा : मराठा आरक्षणाच्या मागणीसा...
09/09/2026

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचे धाराशिवमध्ये पडसाद; उमरग्यात तहसीलदारांची खुर्ची पेटवली

उमरगा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. याचे पडसाद आता धाराशिव जिल्ह्यातही उमटू लागले आहेत.

उमरगा येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या काही मराठा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातून तहसीलदारांची रिकामी खुर्ची बाहेर खेचून आणली. त्यानंतर या खुर्चीवर पेट्रोल टाकून ती पेटवून देण्यात आली.

या प्रकारामुळे उमरगा शहरात एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, तहसील कार्यालयासमोर घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनाचीही धावपळ उडाली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या घटनेप्रकरणी प्रशासन आणि पोलिसांकडून पुढील कारवाई काय केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Address

Samta Nagar, Dharashiv
Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dharashiv Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dharashiv Live:

Shortcuts

Share