राजकिय कट्टा-Rajkiya Katta

राजकिय कट्टा-Rajkiya Katta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राजकिय कट्टा-Rajkiya Katta, News & Media Website, Osmanabad.
(1)

• राजकीय कट्टा हे राजकारणातील गल्ली ते दिल्ली पर्यंतची राजकीय माहिती देणारे सोशल मीडिया माध्यम आहे.
• आमचे हे सोशल मीडिया माध्यम कोणत्याही पक्षाशी किंवा व्यक्तीशी संबंधित नाही.
• निष्पक्ष जसं आहे तसं दाखवणारे हे माध्यम आपल्या हक्काचे आहे.

13/09/2025

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजस्विनी जगताप यांचे एमपीएससीत यश!

#तेजस्विनी_जगताप #कन्हेरवाडीचा_अभिमान #प्रतिकूलतेवर_मात #यशोगाथा #ग्रामीणयुवतीचा_विजय

12/09/2025

अखेर प्रतीक्षा संपली! जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, कोणत्या जिल्ह्याची कमान कोणाकडे?

पुणे, ठाणे, पालघरसह राज्यातील ३४ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी बहुप्रतिक्षित अध्यक्षपदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानंतर आता गावागावांत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

काय आहे नवीन आरक्षण?

राज्य सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषदा नियम, १९६२ नुसार हे आरक्षण जाहीर केले आहे. यानुसार, पुढील अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापतींच्या पदांचे वाटप निश्चित झाले आहे. या वाटपामध्ये विविध सामाजिक गट आणि महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

प्रमुख जिल्ह्यांसाठी आरक्षण असे आहे:

सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग: ठाणे, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली.

सर्वसाधारण प्रवर्ग: रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ.

अनुसूचित जमाती प्रवर्ग: पालघर आणि नंदुरबार.

अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्ग: अहमदनगर
(अहिल्यानगर), अकोला आणि वाशिम.

अनुसूचित जाती प्रवर्ग: परभणी आणि वर्धा.

अनुसूचित जाती (महिला) प्रवर्ग: बीड आणि चंद्रपूर.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): सोलापूर, हिंगोली, नागपूर आणि भंडारा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना आणि नांदेड.

या आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद महिला किंवा राखीव प्रवर्गासाठी गेले आहे, तिथे स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे. हे आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









12/09/2025

तुमच्या जिल्हा परिषदेत कोण अध्यक्ष होणार संभाव्य नाव कोणती?

12/09/2025

आपला जिल्हा कोणता आणि आपल्या जिल्हा परिषदेचे आरक्षण कशाला सुटले आहे......

राजकीय कटुता विसरून दोन दादांची ॲम्बुलन्स सफर
12/09/2025

राजकीय कटुता विसरून दोन दादांची ॲम्बुलन्स सफर

कळंब येथे हजरत पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठानतर्फे आयोजित ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळ्यात एक हृदय.....

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजस्विनीची चमकदार झेप;वर्ग 2 अधिकारीपदाला घातलेली गवसणी ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी👇👇👇👇...
12/09/2025

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजस्विनीची चमकदार झेप;वर्ग 2 अधिकारीपदाला घातलेली गवसणी ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी

👇👇👇👇👇👇

अंधारातून उजेडाकडे प्रवास-कन्हेरवाडीच्या तेजस्विनी जगतापची यशोगाथा. कळंब तालुक्यातील कन्हेरवाडीची मुलगी तेजस...

11/09/2025

ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले कळंब ढोकी रोडवर संभाजीनगर येथे एर्तिगा गाडीचा अपघात, सीसीटीव्ही फुटेजही समोर

मराठा आंदोलनानंतर ओबीसीचा प्रचंड मोर्चा मुंबईकडे!मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा मोठा मोर्चा मुंबईत निघणार आह...
11/09/2025

मराठा आंदोलनानंतर ओबीसीचा प्रचंड मोर्चा मुंबईकडे!
मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा मोठा मोर्चा मुंबईत निघणार आहे. दसर्‍यानंतर या मोर्चासाठी मुहूर्त ठरला असून राज्याच्या राजकीय वातावरणात यामुळे नवी घडामोड घडण्याची शक्यता आहे.

आपले मत काय? 🗣️
👉 कमेंटमध्ये आपले विचार नक्की सांगा!

#ओबीसी #मराठा_आंदोलन #मुंबईमोर्चा #राजकीयकट्टा

11/09/2025

✅ धाराशिव जिल्ह्यातील खरीप 20 व 21 संदर्भातील उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण.

✅ खरीप 2020 मधील 225 कोटी तसेच खरीप 2021 मधील 374 कोटी रुपये येणे बाकी.

✅ न्यायालयाचा निकाल बळीराजाच्या बाजूने लागल्यास दोन्ही रकमा एकत्रित मिळून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जवळपास दहा ते बारा हजार रुपये मिळू शकतात.

11 सप्टेंबर 2025

Supriya Sule
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

11/09/2025

शिवसेना UBT-मनसे युती होणार? बाळा नांदगावकर यांनी दिली माध्यमांना माहिती

� New to streaming or looking to level up? Check out StreamYard and get ₹740 discount! �

11/09/2025

मराठा आरक्षणाबद्दल संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांची तातडीची पत्रकार परिषद

� New to streaming or looking to level up? Check out StreamYard and get ₹740 discount! �

11/09/2025

तृतीयपंथी अर्थात पारलिंगी यांचा तारणहार – सचिन वायकुळे!

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलेल्या तृतीयपंथीयांना सन्मान, हक्क आणि संधी मिळवून देण्यासाठी सचिन वायकुळे यांनी उभा केलेला लढा प्रेरणादायी आहे. 🙌
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांचे जीवन बदलत आहे, आणि समाजाला समानतेचा खरा अर्थ कळतो आहे. ✨

👉 हा व्हिडिओ नक्की पाहा आणि इतरांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून हा सकारात्मक बदल अधिक लोकांपर्यंत जाईल. 🌟

Address

Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजकिय कट्टा-Rajkiya Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to राजकिय कट्टा-Rajkiya Katta:

Share