05/02/2026
मोहा येथील जाहीर सभेत विकास कामांचा पाढा वाचत संदीप मडके यांनी विरोधकांना केले गार.
वैफल्यग्रस्त कळंब तालुक्यातील कायम भावी आमदाराला ही घेतले फैलावर विकास कामे पूर्ण करण्यासाठी मोहा जिल्हा परिषद गटातुन सौ.सुजाता गौतम मडके व पंचायत समिती उमेदवार सौ.पुजा श्याम नागटिळक यांना निवडून देण्याचे केले आवाहन.धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा जिल्हा परिषद गट हाय होल्टेज झाला आहे या जिल्हा परिषद गटातुन माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके यांच्या मातोश्री सौ.सुजाता गौतम मडके या अपक्ष उमेदवार या नात्याने निवडणूक लढवीत आहेत संदीप मडके यांच्या विरोधात भाजप,शिवसेना,उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचे जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार ,आमदार सभा घेत आहेत कारण जनमतातील नेता व या खासदार आमदार यांच्या पेक्षा अधीक कार्य करण्याची पद्धत यामुळे वैफल्यग्रस्त होवुन संदीप मडके मोठा होवु नये एक सामान्य युवकाचे नेतृत्व भविष्यात तयार होवू नये यासाठी ही मंडळी कामाला लागली आहे काल मोहा येथील जाहीर सभेत संदीप मडके यांनी केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचला मोहा शिवारात डिपी ची मंजुरी घेवून शेतकर्यांची गैरसोय दूर केली, शेतरस्ते करून शेतकरी बांधवांना दळणवळण सुविधा उपलब्ध करून दिली , प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर केले तसेच जनावरांचा दवाखाना प्रास्तावित असून गावातील दोन युवकांनी हा दवाखाना गावात मंजूर होण्यासाठी न्यायालयीन लढाई लढली असल्याचे गौरवोद्गार काढले तसेच गावातील ग्राम दैवत हजरत सय्यद अल्वी ( रहे) यांच्या दर्गाह ला राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देवून दर्गाह अंतर्गत विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवून दिला, मोहा गावात आजपर्यंतचा शेतकरी वर्गासाठी विहिरींचा सर्वात जास्त निधी खेचून आणला, तसेच गावात पावसाच्या पाण्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच डबके तयार व्हायचे व ग्रामस्थांची अडचण व्हायची या अगोदर ग्रामपंचायत चा कारभार हाकणार्या मातब्बरांना ही अडचण कधीच दुर करता आली नाही ती नाली करून मी कायमची दुर केली असल्याचे त्यांनी ग्रामस्थांच्या लक्षात आणुन दिले या व्यतिरिक्त गावातील प्रमुख रस्त्यांची कामे मंजूर झाली असून येत्या काळात ती पूर्ण होतील असे रस्त्यांची नावे सांगून त्यांनी जाहीर केले तसेच त्यांनी गावकर्यांसाठी विविध योजनेतून सर्व अडथडे दुर करीत घरकुल योजना मंजूर केल्याचे सांगितले व कळंब तालुक्यातील नेहमीच भावी असलेल्या आमदाराला फैलावर घेत ज्यांना कधीच गुलाल लागला नाही त्यांनी जनतेतुन निवडून येत विकास कामे कशी करायची हे आम्हाला शिकवु नये असे ठणकावले व या निवडणुकीत माझ्या मातोश्री सौ....
वैफल्यग्रस्त कळंब तालुक्यातील कायम भावी आमदाराला ही घेतले फैलावर विकास कामे पूर्ण करण्यासाठी मोहा जिल्हा परिषद...