
10/10/2023
पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीची काँग्रेसच्या दिशेने वाटचाल
एकेकाळी भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असणाऱ्या पक्षाला आज भाजपाच्या मुशीत तयार झालेला एकही जिल्हाध्यक्ष मिळू नये ही आज शोकांतिका आहे.
श्रद्धये खासदार चिंतामनजी वनगा, कै विष्णुजी सवरा,कै राम कापसेजी, श्री राम नाईकजी अश्या दिग्गजांनी भाजप पालघर जिल्हात रुजवला आणि वाढवला पण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून आलेल्या लोकांना जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष ,सरचिटणीस, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अशी महत्वाची पदे मिळतात आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणी हृदयात घेऊन पक्षात आहेत त्यांना हेतुपुरस्सर बाजूला ठेवलं जातं आहे.
खरंच घडत असतांना भाजपचे कर्मठ कार्यकर्त्यांची दया येते आणि मनात विचार येतो की सर्व उपरे येऊन पालघर जिल्हात भाजपा पुढे कसे नेणार?? हा विचार मनात येतो..