Dnyanpravahnews

  • Home
  • Dnyanpravahnews

Dnyanpravahnews News Paper and News Blog

विश्व योग दिवस : संयुक्त अभिभावक संघ ने कहा शिक्षा की तरह योग का भी हो रहा है व्यवसायीकरण योग के व्यवसाय पर लगे रोक, शिक...
21/06/2025

विश्व योग दिवस : संयुक्त अभिभावक संघ ने कहा शिक्षा की तरह योग का भी हो रहा है व्यवसायीकरण योग के व्यवसाय पर लगे रोक, शिक्षा की तरह जन जन तक पहुँचाया जाये योग - अभिषेक जैन बिट्टू जयपुर /ज्ञानप्रवाह न्युज, दि. 21 जून 2025 । शनिवार को विश्व योग दिवस के अवसर पर संयुक्त अभिभावक संघ ने कहा की *योगा देश की ना केवल संस्कृति है बल्कि यह देश की संभ्यता, संस्कार है जो पुरे देश को एक - दुसरे से जोड़ते है अपने - अपने स्वास्थ्य के प्रति जागरूक करती है और सभी को निरोगी रहने का मार्गदर्शन देती है, योग आज की संस्कृति नहीं है बल्कि यह प्राचीन काल से चली आ रही एक परम्परा है जिसे कुछ स्वार्थी और अधर्मी लोगों ने अपने निजी अहंकार के चलते इसे विलुप्त कर दिया था किन्तु कोरोना काल में इस परम्परा को संजीवनी मिली और अब यह जन - जन जननी का आधार बन चुकी है, अब जब योगा को संजीवनी मिली है तो इसका व्यवसायीकरण होना भी प्रारम्भ हो गया है जिसपर केंद्र सरकार सहित सभी राज्यों की सरकारों को अपना ध्यान आकर्षित करना चाहिए, जेसे पूर्व में योग की संस्कृति से पूरा देश विलुप्त हो गया था ठीक ऐसे ही अब इसके व्यवसायीकरण से यह विलुप्त ना हो जायेगा क्योकि देश की आबादी का 75 फीसदी तबका रोजमरा की जिन्दगी में इतना व्यवस्त है की व्यवसायीकरण के चलते वह इससे दूर हो जायेगा।...

विश्व योग दिवस : संयुक्त अभिभावक संघ ने कहा शिक्षा की तरह योग का भी हो रहा है व्यवसायीकरण योग के व्यवसाय पर लगे रोक, श...

21/06/2025

मानवाच्या सदृढ आरोग्यासाठी दैनंदिन योगा करणे आवश्यक - प्रणव परिचारक पंढरपूर शहरात 11 वा आंतरराष्ट्रीय योग महोत्सव उत्साहात साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२५- पंढरपूर शहरामध्ये पतंजलि योगपीठ हरिद्वार शाखा पंढरपूर व पंढरपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय व उमा महाविद्यालय पंढरपूर व युवा नेते प्रणव परिचारक यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरातील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे सकाळी 6.30 ते 8.00 या कालावधीमध्ये उत्साहाने 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला....

21/06/2025

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगवल्ली- योगिनी समवेत योग बायोस्फिअर्स संस्थेचा सिद्धबेट आळंदी येथे अनोखा उपक्रम पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि. २१/०६/२०२५- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माऊली हरित अभियाना अंतर्गत बायोस्फिअर्स संस्थेच्या संकल्पनेतून या वर्षी शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी सिद्धबेट-आळंदी येथे योगवल्ली-योगिनी समवेत योग असा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. योगसाधना, योगिक मुद्रा, योगाचे मानवी जीवनातील महत्व, शंखनाद, अजानवृक्ष पूजन, सामुदायिक पसायदान, पर्यावरणाचा जागर आणि औषधी वनस्पतींचे रोपण अशा विविध विषयांची सांगड घालत योगदिन मोठ्या उत्साहात योग-साधक, पर्यावरण अभ्यासक, वारकरी, विद्यार्थीवर्ग, जनसामान्य यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला....

21/06/2025

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केरळच्या मलप्पपुरम मध्ये साजरा आंतरराष्ट्रीय योग दिन मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त केरळ मधील मलप्पपुरम मधील वैद्यरत्न पी एस वारीयर आर्युवेद महाविद्यालय येथे योगासनाचा सराव केला.राष्ट्रीय आयुष मिशन द्वारे मलप्पुरम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात ना.रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहिले....

21/06/2025

जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे जागतिक योग दिन कार्यक्रम संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज -पंढरपूर तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, यांचे निर्देशानुसार शनिवार दि.21 जून 2025 रोजी जिल्हा न्यायालय पंढरपूर आवारामध्ये एस.बी. देसाई, प्रभारी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली व श्रीमती एस एस पाखले दिवाणी न्यायाधीश व स्तर पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते....

21/06/2025

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी माधवानंद महाराज गुरु वामनानंद स्वामी चिन्मयमूर्ती संस्थान, यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17 लाख 68 हजार किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने देणगीदार भाविकाचा मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन येथोचित सन्मान केला. सदर सोन्याचा तुळशीहार 232.990 ग्रॅम वजनाचा असून, त्याची अंदाजे किंमत 17 लाख 68 हजार रुपये इतकी होत आहे.

21/06/2025

भाविकांच्या मागणीमुळे टोकन दर्शन संख्येत वाढकार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली माहिती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने भाविकांच्या मागणीनुसार आणि सद्यस्थिती विचार करून टोकन आधारित दर्शन संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या टोकन दर्शन व्यवस्थेला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून दर्शनासाठी व्यवस्थित रांगा, वेगवान गतीने होत असलेले संचलन आणि सुरळीत यंत्रणेमुळे अधिक भाविकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता जाणवत होती....

21/06/2025

शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक,हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ जून २०२५ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बनावट खत विक्री प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कृषी विभागाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बोगस खत विक्री हे केवळ आर्थिक फसवणूक नसून शेतकऱ्यांच्या श्रमांवर आणि उत्पादनावर थेट घाला आहे....

21/06/2025

कृष्णा,भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदारसंघातील तलाव,नाले ओढे भरून देण्यास आमदार समाधान आवताडे यांच्या सूचना मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/ २०२५- कृष्णा,भीमा व निरा नद्यांमधून वाहून जाणारे पाणी मतदार संघातील तलाव,नाले ओढे भरून देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामातील आपल्या पेरणीचे काम पूर्ण केले आहे. तुरळक काही भागांमध्ये पेरणी करण्याचे काम सुरू आहे....

21/06/2025

पालखी मार्ग,तळांवरील सर्व कामे २५ जून पर्यंत पूर्ण करावीत -जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज/उमाका,दि.२०:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पायी चालत येतात. सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा व पालखी तळांवर तसेच र्रिगण सोहळ्याच्या ठिकाणची सर्व कामे संबधित विभागाने समन्वय साधून 25 जून पर्यत पुर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिल्या....

21/06/2025

पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ - पतंजली योगपीठ व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने दि २१ जून रोजी एक पृथ्वी,एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित योग सत्राचे आयोजन तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध स्तरांतील नागरिकांनी सहभाग घेऊन योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे,तहसीलदार सचिन लंगुटे प्रमुख उपस्थिती होती....

21/06/2025

वारकरी भाविकांसाठी पश्चिमद्वार ते चौफळा एकेरी मार्ग , जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केला आदेश पश्चिमद्वार ते चौफाळा एकेरी मार्ग रहदारीस खुला ठेवण्याबाबतचा आदेश जारी दि.०५ जुलै रोजी सकाळी ०६.०० ते दि.०६ जुलै २०२५ रोजीचे सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत एकेरी मार्ग रहदारीस खुला पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२५ :- आषाढी यात्रा सोहळा रविवार दि.०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत असून आषाढी यात्रा सोहळा कालावधीत दि.२६ जून ते १० जुलै २०२५ असा आहे.या सोहळ्यास सुमारे १४ ते १५ लाख भाविक शहरात येतात.विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग एकच असलेने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते.अशावेळी चेंगराचेंगरी होवून जीवित हानी होण्याची दाट शक्यता असल्याने दि.०५ जुलै रोजी सकाळी ०६.०० ते दि.०६ जुलै २०२५ रोजीचे सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी,भाविक यांच्याकरीता बाहेर पडण्यासाठी एकेरी रहदारीस खुला ठेवण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत....

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyanpravahnews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dnyanpravahnews:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share