Navprabha

Navprabha 'दैनिक नवप्रभा'चे अधिकृत फेसबुक पेज

07/11/2025

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठात श्रीराममूर्ती व शिखर प्रतिष्ठा सोहळा भक्तिभावाने साजरा झाला

07/11/2025

डॉ. के. ब. हेडगेवार स्कूल, कुजिरा बांबोळी येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी वंदे मातरमच्या १५० व्या वर्षानिमित्त वंदे मातरम सादर केले.
#वंदेमातरम #गोवा #हेडगेवारहायस्कूल Dr K B Hedgewar School, Cujira, Bamboli

               #नवप्रभा
07/11/2025

#नवप्रभा

गोव्यातील सुमारे ६०० पेक्षा अधिक पोलीस बिहार येथील निवडणुकीसाठी आपली सेवा बजावत आहेत
06/11/2025

गोव्यातील सुमारे ६०० पेक्षा अधिक पोलीस बिहार येथील निवडणुकीसाठी आपली सेवा बजावत आहेत

06/11/2025

हात हातात घालून स्टेजवर उभे राहून सरकार होत नाही. केंद्रात ज्याचे सरकार तोच गोव्यात सत्तेवर. मालभाट मडगाव येथे शहरी आयुष्मान आरोग्य मंदिरच्या उद्घाटन सोहळ्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणेंची विरोधकांवर टीका

05/11/2025

05/11/2025

गोव्यात मंगळवारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. किनारी भागातील बागा व हडफडे येथे दुकानांवर चक्क पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिलेले फलक झळकले. कारवाई केल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण.

05/11/2025

रावणफोंड येथील मुरुगन मंदिरात कार्तिक पौर्णिमा साजरी करण्यात येत आहे. या दिवशी भाविक उपवास करतात आणि कार्तिक स्वामीचे दर्शन घेऊन , पूजा अभिषेक करतात . यादिवशी शेजारच्या राज्यांतील भाविक मोठया संख्येने उपस्थित राहतात.

कोकण रेल्वे आणि श्री मल्लिकार्जुन व श्री चेतन मंजू देसाई कॉलेज यांच्यात सामंजस्य करारकोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड आणि ज्ञ...
04/11/2025

कोकण रेल्वे आणि श्री मल्लिकार्जुन व श्री चेतन मंजू देसाई कॉलेज यांच्यात सामंजस्य करार

कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड आणि ज्ञान प्रबोधिनी मंडळाच्या श्री मल्लिकार्जुन व श्री चेतन मंजू देसाई कॉलेज, काणकोण, गोवा यांच्यात ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सामंजस्य करार करण्यात आला.

हा करार कोंकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष श्री चेतन मंजू देसाई, हिंदी विभागप्रमुख डॉ. रूपा चारी, प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक (कारवार) आशा शेट्टी, सहाय्यक उपमहाव्यवस्थापक (राजभाषा) सदानंद चितळे तसेच कोंकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

04/11/2025
बांबोळी महामार्गावर रात्री  १ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. एका टँकरने उतारावर न...
04/11/2025

बांबोळी महामार्गावर रात्री १ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. एका टँकरने उतारावर नियंत्रण गमावून दुभाजक ओलांडत समोरून येणाऱ्या रेंट अ कारला जोरदार धडक दिल्याची माहिती आहे. या भीषण धडकेत कारचा चक्काचूर झाला असून, चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सेपक टॅकरो महासंघाचे अध्यक्ष असलेले दिल्लीतील ५२ वर्षीय योगेंद्र सिंग व सेपक टॅकरोचे वरिष्ठ खेळाडू अंकित कुमार बलियान यांचा समावेश आहे.

घटनेनंतर पोलिस व आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेहांना शवविच्छेदनासाठीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) बांबोळी येथे हलविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, वाहनाचा वेग आणि नियंत्रण सुटणे ही अपघाताची मुख्य कारणे असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

03/11/2025

मडगाव दिंडी हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी सरकारतर्फे संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, हरिमंदिर, विठ्ठल रखुमाई देवस्थान व अन्य संघटनांना संपूर्ण सहकार्य देण्यात येणार. : मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत

Address

Panjim

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navprabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Navprabha:

Share