Raigad MAT

Raigad MAT Raigad Mat RAIGAD MAT (MARATHI NEWS PAPER MONTHLY)

 # माजी सभापती रवींद्र नटे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती # तळा तालुक्याचे माजी सभापती मा...
02/09/2026

# माजी सभापती रवींद्र नटे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

# तळा तालुक्याचे माजी सभापती मा. श्री. रविंद्रजी नटे साहेब यांची तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

रायगड मत/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या तळा तालुका अध्यक्षपदी तळा पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र गोविंद नटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे तळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता असून, नटे यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी आगामी काळात लागणार आहे.

तळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद लक्षणीय आहे. २५ ग्रामपंचायतींसह नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने तालुक्याच्या राजकारणात पक्षाचा प्रभाव कायम राहिला आहे. त्यामुळे केवळ तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणे एवढेच नटे यांच्यासमोर आव्हान नसून, राष्ट्रवादीचा हा राजकीय गड कायम राखण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.

मात्र, यावेळी राजकीय परिस्थिती राष्ट्रवादीसाठी तितकीशी सोपी राहिलेली नाही. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे गेल्याने तळा तालुक्यातही शिवसेनेचे राजकीय आव्हान अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून शिवसेनेला जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्याची आणि स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससमोर आपली पारंपरिक ताकद टिकवून ठेवण्याबरोबरच कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्याचे आव्हान आहे. पक्षशिस्त, संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि तळागाळातील जनसंपर्क यावर नटे यांच्या नेतृत्वाची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.

सत्तेत असतानाही अंतर्गत मतभेद, स्थानिक राजकीय समीकरणे आणि बदलते सत्ताकेंद्र यांचा सामना करणे आवश्यक असते. त्यामुळे नटे यांना पक्षातील सर्व गटांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. जुन्या कार्यकर्त्यांसोबतच नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना जोडणे आणि आगामी राजकीय आव्हानांसाठी पक्षाची यंत्रणा सज्ज करणे ही त्यांच्यासाठी महत्त्वाची जबाबदारी ठरणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली सत्ता आणि राजकीय प्रभाव टिकणार की पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून शिवसेना तळा तालुक्यात नवे राजकीय समीकरण उभे करणार? याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.त्यामुळे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रवींद्र नटे या आव्हानाला कोणत्या रणनीतीने सामोरे जातात, राष्ट्रवादीचा गड कसा मजबूत करतात आणि कार्यकर्त्यांना किती प्रभावीपणे एकत्र आणतात, याकडे संपूर्ण तळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर रवींद्र नटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा.सुनिल तटकरे,महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे आभार मानले आहेत पक्षाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी ही विश्वासाने दिलेली असून, ही जबाबदारी योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचेही नटे यांनी स्पष्ट केले.

प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा, नेतृत्वगुणांचा व संघटन कौशल्याचा पक्षाला निश्चितच मोठा फायदा होईल. आपल्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तळा तालुक्यात संघटनात्मक ताकद अधिक बळकट होवो आणि पक्षाला नवी उंची मिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

01/09/2026

रायगड मत’च्या बातमीची दखल; देवघरच्या अमृतेश्वर मंदिराला पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा

Body Text
रायगड मत / प्रतिनिधी

पहिल्याच श्रावणी सोमवारी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर भरतशेठ गोगावले यांनी म्हसळा–श्रीवर्धन मतदारसंघातील विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. देवघर येथील पांडवकालीन अमृतेश्वर मंदिराला पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी ‘रायगड मत’च्या माध्यमातून करण्यात आली होती. या मागणीची पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दखल घेत देवघर येथे प्रत्यक्ष भेट देत मंदिराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
श्रावणी सोमवारच्या निमित्ताने अमृतेश्वर मंदिरात पूजा-अर्चा केल्यानंतर ‘रायगड मत’ने या ऐतिहासिक मंदिराला किमान ‘क’ दर्जाचा पर्यटन दर्जा मिळावा, अशी मागणी बातमीच्या माध्यमातून केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत पालकमंत्री गोगावले यांनी देवघर येथे भेट देऊन अमृतेश्वर मंदिराचे दर्शन घेतले आणि महादेवाच्या पिंडीचे मनोभावे पूजन केले.
“अमृतेश्वर मंदिराच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक कायदेशीर बाबी तातडीने पूर्ण करून हे ठिकाण पर्यटन तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करू.” असे आश्वासन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी यावेळी दिले.
दरवर्षी श्रावणी सोमवारच्या काळात हजारो शिवभक्त आणि पर्यटक देवघर येथील अमृतेश्वर मंदिराला भेट देतात. मात्र पर्यटनाचा अधिकृत दर्जा आणि आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविक व पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पर्यटन दर्जा मिळाल्यास रस्ते, पाणी, स्वच्छता, पार्किंग, निवास आणि इतर मूलभूत सुविधा विकसित होण्यास मदत होईल. त्याचबरोबर स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Box
Heading
रोजगार आणि स्थलांतराच्या प्रश्नावरही चर्चा

Text
दरम्यान, ‘रायगड मत’चे संपादक तथा पत्रकार जितेंद्र नटे यांनी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट घेऊन मतदारसंघातील रोजगार आणि स्थलांतराच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेत लघुउद्योग, औद्योगिक विकास आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊन स्थलांतर कसे थांबवता येईल, याबाबत विविध मुद्दे मांडण्यात आले.

“गावातील तरुणांना रोजगारासाठी मुंबई-पुण्याकडे स्थलांतर करावे लागू नये. स्थानिक पातळीवर लघुउद्योग, स्वयंरोजगार आणि औद्योगिक संधी निर्माण झाल्या पाहिजेत,” अशी भूमिका जितेंद्र नटे यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली.

Box
Heading
‘पालकसभा’ घेण्याची मागणी; १५ दिवसांत सभा घेण्याचे आश्वासन
Text
मतदारसंघात अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित असून त्यावर नागरिकांशी थेट संवाद होणे आवश्यक आहे. नियमित आमसभा होत नसल्यास किमान ‘पालकसभा’ घेऊन नागरिकांच्या समस्या, मागण्या आणि विकासकामांचा आढावा घ्यावा, अशी मागणीही जितेंद्र नटे यांनी पालकमंत्री गोगावले यांच्याकडे केली.
या मागणीची तातडीने दखल घेत “येत्या १५ दिवसांच्या आत पालकसभा घेऊ,” असे आश्वासन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले.
‘रायगड मत’च्या बातमीची पालकमंत्र्यांनी घेतली दखल
यावेळी बोलताना पालकमंत्री गोगावले यांनी ‘रायगड मत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अमृतेश्वर मंदिराच्या मागणीच्या बातमीचा संदर्भ देत, “रायगड मतने बातमी लावली, आम्ही ती उचलली आणि आता हे पर्यटन केंद्र व तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी पुढाकार घेणार,” अशी भूमिका मांडली.
त्यामुळे देवघरच्या अमृतेश्वर मंदिराच्या विकासाच्या मागणीला आता प्रशासकीय पातळीवर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच म्हसळा–श्रीवर्धन मतदारसंघातील रोजगार, लघुउद्योग, पर्यटन आणि स्थलांतराच्या प्रश्नांवर पालकमंत्री गोगावले यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले

Short Film... Jitendra Nate चला... पुन्हा गावाकडे वळू या..... कोकणात बदलाची सुरुवात करू या... अशी वेळ आणू या... कि प्रत्...
24/07/2026

Short Film... Jitendra Nate
चला... पुन्हा गावाकडे वळू या.....
कोकणात बदलाची सुरुवात करू या...
अशी वेळ आणू या... कि प्रत्येक तरुण अभिमानाने म्हणेल...
"माझं भविष्य... माझ्याच हातात आहे."
आणि प्रत्येक आईच्या डोळ्यांत पुन्हा एकदा आनंद दिसेल...
कारण तिचा मुलगा.... रोजगारासाठी घर सोडणार नाही....
तर आपल्या मातीतच... स्वतःचं भविष्य घडवेल..."
चला गावाकडे वळू या...!
लघु उद्योग, पर्यटन व्यवसायातून रोजगार निर्माण करू या...
आणि स्थलांतर थांबवू या...
- श्री. जितेंद्र नटे (पत्रकार व कलाकार)
# अध्यक्ष - कोकण तालुका विकास संघटना
# संपादक - रायगड मत
# Artist Open Theater

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

24/07/2026

# म्हसळा येथे डॉ. मोईज शेख यांची तोफ धडाडली... पहा हे व्हिडीओ...

# कार्यकर्त्यांमध्ये जोश.... आणि जल्लोष

# दिल्लीला जाणार

म्हसळा / प्रतिनिधी

म्हसळा तालूक्यातील काँग्रेस आता पेटून उठली असून काँग्रेस चे जेष्ठ नेते मा. श्री. डॉ. मोईज शेख यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. गेल्या अनेक दिवसापासून सुस्त झालेली काँग्रेसलां आता नव्या जोमाने कामाला लागली आहे. देशाला तरुणांची गरज आहे. देशाला काँग्रेसची गरज आहे. ज्या देशाने 70 वर्ष देश सांभाळला तेच देश सुरक्षित सांभाळू शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा एकत्र येण्याची हाक डॉ. मोईज शेख यांनी म्हसळा वासियांना घातली आहे. सत्ताधाऱ्यावर सडकून टीका करत असताना. म्हसल्याचा विकास फक्त काँग्रेसच करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

. Moiz Shaikh

 # म्हसळा येथे काँग्रेसच 1 नं., # 6 महिन्यानंतर येणारी म्हसळा नगर पंचायत काँग्रेस एक हाती जिंकणार... # म्हसळा येथे डॉ. म...
24/07/2026

# म्हसळा येथे काँग्रेसच 1 नं.,
# 6 महिन्यानंतर येणारी म्हसळा नगर पंचायत काँग्रेस एक हाती जिंकणार...
# म्हसळा येथे डॉ. मोईज शेख यांची तोफ धडाडली...

म्हसळा / प्रतिनिधी

म्हसळा तालूक्यातील काँग्रेस आता पेटून उठली असून काँग्रेस चे जेष्ठ नेते मा. श्री. डॉ. मोईज शेख यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. गेल्या अनेक दिवसापासून सुस्त झालेली काँग्रेसलां आता नव्या जोमाने कामाला लागली आहे. देशाला तरुणांची गरज आहे. देशाला काँग्रेसची गरज आहे. ज्या देशाने 70 वर्ष देश सांभाळला तेच देश सुरक्षित सांभाळू शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा एकत्र येण्याची हाक डॉ. मोईज शेख यांनी म्हसळा वासियांना घातली आहे. सत्ताधाऱ्यावर सडकून टीका करत असताना. म्हसल्याचा विकास फक्त काँग्रेसच करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेकडो कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्मान झाला असून येणाऱ्या नगरपंचायत मध्ये काँग्रेसच जिंकणार. म्हसल्याचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसा होताना दिसत नाही. असे म्हणत पक्षाचा अंतुले साहेबांचा सर्व इतिहासाच सांगितलां. देशात पुन्हा काँग्रेस येईल त्यासाठी ते स्थानिकांना दिल्लीला घेऊन जाणार आहेत. पुन्हा म्हसलळ्याला चांगले दिवस आणायचे आहेत असे सांगत चला कामाला लागा असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
पक्षातील अंतर्गत वादविवाद बाजूला ठेवुनं आपण आपली ताकद दाखवू या.... असेही त्यांनी सांगितले.

23/07/2026

# म्हसळा येथे काँग्रेसच 1 नं.,
# 6 महिन्यानंतर येणारी म्हसळा नगर पंचायत काँग्रेस एक हाती जिंकणार...
# म्हसळा येथे डॉ. मोईज शेख यांची तोफ धडाडली...

महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री व श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार सन्माननीय आदितीजीं वरदा सुनिल तटकरे  यांना वाढदिवसाच्या...
16/03/2026

महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री व श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार सन्माननीय आदितीजीं वरदा सुनिल तटकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा - जितेंद्र नटे
https://www.instagram.com/reel/DV7qYKWDOf_/?igsh=aDR6MWFmenZ4cnJh

Address

Raigad Mumbai Mahrastra
Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raigad MAT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Raigad MAT:

Shortcuts

Share