02/05/2025
(ऐतिहासिक महाराष्ट्र)
*आज महाराष्ट्र व कामगार दिवस*
अशोक सवाई
*नागपूरी रेशिम बाग व देशाची सर्वेसर्वा दिल्ली या दोन सख्ख्या बहिणी महाराष्ट्राला सावत्र पणाची वागणूक का देतात? याची काही ऐतीहासीक प्रमुख कारणे आहेत*
आज महाराष्ट्र दिवस त्यामुळे प्रथम महाराष्ट्र वासीयांना तसेच कामगार दिनानिमित्त अखिल कामगार वर्गाला हार्दिक शुभेच्छा! *जय महाराष्ट्र! जय भारत!!*
आज १ मे याच दिवसी म्हणजे १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचा जन्म झाला. १ मे २०२५ ला महाराष्ट्र आपल्या वयाची ६५ वर्ष पूर्ण करून ६६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. म्हणजे महाराष्ट्र आज जेष्ठ नागरिकांच्या वयाचा आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्राचा विशेष अभिमान असेल. तो अभिमान बाळगून आम्ही जेष्ठ नागरिक म्हणतो महाराष्ट्र दिन मुंबई सहित चिरायू होवो. असो!
आपल्या महाराष्ट्राला संत परंपरेचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. अगदी संत नामदेवांपासून ते संत गाडगे बाबां पर्यंत. त्यांनी आपल्या संत वाणीतून, अभंगातून ब्राह्मणी धर्म शास्त्राच्या, कर्मकांडांच्या, पाखंडाच्या विरोधात येथील मूलनिवासी बहुजनांच्या मनामध्ये विद्रोह पेरण्याचे काम केले. त्यात आघाडीवर होते संत तुकोबाराय व संत गाडगेबाबा. या संतांनी आपल्या अभंगवाणीतून व प्रबोधनातून लोकांना प्रभावित तर केले पण लोक त्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकले नाहीत. आज काळाच्या औषधाने बहुजन लोक कर्मकांडातून बरे होवून बाहेर पडू लागले. जे पूर्णपणे बाहेर पडले ते इतरांना त्यासाठी मदत करत आहेत. हे अभियान देशभर सुरू आहे. त्यामुळेच आज मूलनिवासी बहुजन विरूद्ध विदेशी ब्राह्मण असा संघर्ष उभा ठाकला आहे. तसा तो वैदिक ब्राह्मण या देशात आले तेव्हापासून चालत आलेलाच आहे. पण त्याचे स्वरूप आता तीव्र झालेले आहे. आजही ब्राह्मण भक्तीत चूर असलेले काही बहुजन भक्त आहेत. ते काळाच्या ओघात आपल्या सोबत नंतर येतील किंवा आहे तेथेच राहतील. असो...
आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक मान्यवर विचारवंत, बुद्धिवंत, लेखक, साहित्यिक व खास महाराष्ट्राची अस्मिता जपणारे महाराष्ट्र प्रेमी म्हणत आले/म्हणत आहेत की, दिल्ली महाराष्ट्राला नेहमी सापत्न पणाची वागणूक देत आली/देत आहे. पण दिल्ली तसी वागणूक का देते? याची कारणमीमांसा जाणून त्यावर खोलवर चर्चा झालेली नाही. ती आपण आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करू. पण त्याआधी स्वातंत्र्य पुर्व काळात या देशाच्या भूमिपुत्रांवर जुलूम करून व स्वातंत्र्यानंतर शासक वर्ग बनून देशाच्या जनतेवर राज करत आलेल्या विदेशी ब्राह्मणांची मानसिकता तपासून पाहू.
इंग्रजीत कोब्रा म्हणजे नाग हा एक सरपटणारा जीव आहे. दुसरा कोब्रा म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण यालाच चित्पावन ब्राह्मण सुद्धा म्हणतात. केशव सीताराम ठाकरे उर्फ थोर प्रबोधनकार ठाकरे या ब्राह्मणांना चित्पावनी म्हणत असत. हा कपटी ब्रह्मवृंद लोकांना नागाचे गुणधर्म सांगून त्याची भीती दाखवत आला. ती म्हणजे नाग हा डुख धरणारा प्राणी आहे. त्याला डिवचले की तो डुख धरतो व नंतर संधी मिळताच डिवचणाऱ्याला विखारी डंख मारून, लंबं करतो. अशी भीती हा कोब्रा त्या कोब्र्याची दाखवत आला आहे. काही लोक अजूनही त्या दहशतीत आहेत. परंतु असा कोणताही गुणविशेष कोणत्याही प्राणीमात्रात नसतो. असता तर प्राणी तज्ञांनी त्यावर संशोधन करून त्याचा अहवाल सार्वजनिक केला असता. एक मात्र खरं जो या ब्राह्मणांच्या विरोधात जावून बोलतो, लिहतो भर भाषणातून त्यांच्या कर्मकांडावर फटकारे ओढतो त्याच्यावर हे ब्राह्मण डुख धरून असतात. व संधी मिळताच आपला विखारी डंख मारून, मारून टाकतात. उदाहरणार्थ नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, साहित्यिक कुलबर्गी व पत्रकार गौरी लंकेश. ही आत्ताआत्ताची उदाहरणे. डुख धरण्याचा व नंतर विखारी डंख मारण्याचा विषारी गुणविशेष या कोकणस्थ ब्राह्मणांत ठासून भरला आहे. परंतु तो त्यांनी बिचाऱ्या त्या सरपटणाऱ्या मुक्या जीवाला चिटकवला. बहुजनांच्या मूळावर उठणारा हा विषारी गुण कोब्रात म्हणजेच कोकणस्थ ब्राह्मणांत कसा भरला आहे हे पुढीलप्रमाणे लक्षात येईल
१) *ब्राह्मणांची पहिली सल, संत तुकाराम महाराज -* हे ब्राह्मणांच्या कर्मकांडांवर त्यांच्या पाखंडावर आपल्या अभंगवाणीतून विद्रोहाचे फटकारे ओढत असत. त्यामुळे अधिकाधिक बहुजन लोक त्याच्याकडे आकर्षित होवून त्यांचे प्रबोधनात्मक किर्तन ऐकायला जमत असत. तुकोबांच्या प्रबोधनाचा हा काव्य प्रपंच दिवसेंदिवस पश्चिम महाराष्ट्रात वाढत चालला होता. यामुळे ब्रह्मवृंद हैराण, परेशान झाला होता. तुकोबांची अभंगवाणी त्यांच्या मनात काट्यासारखी सलत होती. तेव्हापासून ते तुकोबांवर डुख धरून होते. असेच एक दिवस तुकाराम महाराज देहू गावच्या डोंगरावर विठ्ठलाचा नामजप करत अभंग रचत होते ते डोगरावर एकटे असल्याची संधी क्रूर मंबाजी व रामेश्वर या दोन भटांना मिळाली व त्यांना एकटे गाठून विखारी डंख मारून, मारून टाकले. आणि गावात येवून बोंब ठोकली की, तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. त्यावेळच्या भोळ्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. संत तुकारामांची अभंगवाणी ही ब्राह्मणांची पहिली सल होती.
२) *ब्राह्मणांची दुसरी सल, रयतेचे थोर राजे छत्रपती शिवाजी महाराज -* महाराजांनी आपल्या राज्यात अठरापगड जातींची मोट बांधली होती. ही महाराजांनी जातीपातीला दिलेली पहिली डागणी होती. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेटर पॅडवर शीर्षस्थानी *'जय भवानी जय शिवाजी'* ही घोषणा घेतली असावी. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात चित्पावनांना महाराजांच्या हाताखाली म्हणजेच त्यांच्या मनुस्मृती प्रमाणे एका शुद्राच्या हाताखाली काम करावे लागत होते. ही ब्राह्मणांची सल होतीच पुढे ब्राह्मणांच्या तीव्र विरोधाला न जुमानता छत्रपती राजेंनी काशीच्या गागाभट्टा कडून ६ जून १६७४ रोजी आपला पहिला राज्यभिषेक करून घेतला व आपल्या राजे पदावर मोहर उमटवली. परंतु ब्राह्मण गागाभट्टा कडून राज्यभिषेक करून घेण्यात छत्रपती राजे समाधानी नव्हते म्हणून त्यांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी शाक्तमुनी निश्चलपूरी गोसावी यांच्याकडून शाक्त पध्दतीने पुन्हा दुसरा राज्यभिषेक करून घेतला. शाक्तपंथ ही एक बौद्ध धम्माची शाखा आहे. यामुळे अष्टप्रधान मंडळातील चित्पावनी मंडळी महारांजावर डुख धरून होती. ५२ व्या वर्षी महाराज किरकोळ आजारी होते चित्पावनी मंडळींना ही संधी मिळाली. ब्राह्मण वैद्याकडून जडीबुटीच्या नावाने विषारी औषधी आणून या निमित्ताने महाराजांवर हळूहळू विषप्रयोग करण्यात आला व याप्रकारे त्यांना विखारी डंख मारून, मारून टाकण्यात आले. पण त्यांचे गडकिल्ले आज बहुजनांचे मानबिंदू ठरले आहेत. ही त्यांची दुहेरी सल अजून पर्यंत सलत आहे. म्हणूनच आज त्यांचे वाचाळवीर महाराजांविषयी अभद्र बोलून वेळोवेळी त्यांचा अपमान करतात.
३) *ब्राह्मणांची तिसरी सल, छत्रपती संभाजी राजे -* आपल्या राज्याशी आपल्याच अष्टप्रधान मंडळातील ब्राह्मणांनी राजद्रोह केला म्हणून छत्रपती संभाजी राजांनी त्या ब्राह्मणांना हत्तीच्या पायी तुडवले होते. म्हणून कोब्रा संभाजी राजेंवर भयंकर डुख धरून होते. व संधी मिळताच त्यांना पकडून देवून औरंगजेबाच्या हवाली केले. व औरंगजेबाला संभाजी राजांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यास भाग पाडले. ब्राह्मणांनी अशा प्रकारे संभाजी राजांना विखारी डंख मारला.
४) *ब्राह्मणांची चौथी सल, सन १ जानेवारी १८१८ रोजी पेशवाई बुडाली -* ५०० महार सैनिक विरूद्ध पेशव्यांचे २८००० सैनिक असे हे युध्द भीमा कोरेगावला झाले होते. उपाशी पोटी सतत बारा तास लढून महारांनी पेशवे सैनिकांचा खुर्दा करून टाकला. गणिती हिशोबाने एका महाराने पेशव्यांचे ५६ सैनिक कापून काढले. आणि ब्राह्मणांची लाडकी पेशवाई बुडवली. पेशवाई बुडवून महारांनी शिवशाही नष्ट करणाऱ्यांचा बदला घेतला होता. विष्णू शास्त्री चिपळूणकर व बाळ गंगाधर टिळक हे दोघे खाजगीत त्यांची लाडकी पेशवाई बुडाली म्हणून दु:खाचे अश्रू ढाळत असत. ही त्यांची सल आजही कायम आहे. आज ब्राह्मण शासक वर्ग पेशवाई पुन्हा स्थापित करण्याचे दिव्य स्वप्न पहात आहे. म्हणूनच ते संविधान बदलण्याची भाषा वापरत आहेत. किंवा संविधानातील कलमांशी छेडछाड करत आहेत.
५) *ब्राह्मणांची पाचवी सल, १ जानेवारी १८४८ रोजी महात्मा फुलेंनी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली -* महात्मा फुलेंनी भिडे वाड्यात शिक्षणाचे रोपटे लावले आज त्याचे रूपांतर विशाल वृक्षात होवून त्याच्या शाखा साऱ्या देशभर पसरल्या. महात्मा फुलेंनी बहुजनांसाठी शिक्षणाची दारे उघडली म्हणून *'धर्म बुडाला धर्म बुडाला* अशी भटमंडळी गावभर बोंबलत सुटली होती. आणि षडयंत्र करून महात्मा फुलेंवर मारेकरी पाठवले होते. शिक्षणामुळे बहुजन वर्ग शिक्षित/उच्च शिक्षित झाला. आणि तो आता ब्राह्मणी कर्मकांडावर त्यांच्या पाखंडावर, पापकर्मावर त्यांच्या नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारू लागला. लिहू लागला, बोलू लागला, वाचू लागला, आपला खरा इतिहास शोधून काढू लागला. याच कारणाने आजही महात्मा फुले व त्यांचे शिक्षण कार्य चित्पावनांच्या डोळ्यात कुसळा सारखे सलत आहे. म्हणूनच त्यांच्या ऐतिहासिक चित्रपटाला ब्राह्मणांकडून तीव्र विरोध होत असताना दिसतो. ते आज मूलनिवासी बहुजन मुलामुलींचे शिक्षण बंद करू पाहात आहेत. पण ते त्यांना शक्य आहे का? कारण शिक्षणाची एक्सप्रेस कोसो दूर पुढे निघून गेली आहे.
६) *ब्राह्मणांची सहावी सल, राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांना दिलेले आरक्षण -* महात्मा फुलेंच्या शैक्षणिक पायावर राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक आरक्षणाची इमारत उभी केली. त्यांनी सन १९०२ मध्ये आपल्या करवीर संस्थानातर्फे बहुजनांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये घवघवीत ५० टक्के आरक्षण लागू केले. म्हणून त्यांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते. तेव्हा ते टिळकांच्या डोळ्यात सलत होते. त्यामुळे शाहू महाराज व टिळकां मध्ये अघोषित संघर्ष सुरू झाला. छत्रपती शाहू महाराज जसे करवीर संस्थानाचे राजे होते तसेच ते पट्टीचे पहिलवान सुद्धा होते. म्हणून टिळक त्यांना टरकून होते. आज बहुजनांचे आरक्षण ब्राह्मणांच्या मनात सलत आहे त्यामुळेच ते आजही आरक्षणा विरोधात बोंबा मारताना दिसताहेत. संविधानिक आरक्षण संपवता येत नाही म्हणून त्यांनी शासकीय संस्थांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. बहुजनांच्या हिताचे काम होवू नये म्हणून षडयंत्री ब्राह्मणांनी राजर्षी शाहू महाराजांच्या बग्गी समोर हातबाॅम्ब फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून ते बालबाल बचावले.
७) *ब्राह्मणांची सातवी अत्यंत जळजळीत सल, मनुस्मृतीचे दहन -* मनुस्मृती मध्ये बहुजनांसाठी विशेषतः महिलांसाठी असलेल्या अत्यंत अघोरी/क्रूर कायद्यामुळे रायगडाच्या पायथ्याशी दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांची अत्यंत प्यारी असलेल्या मनुस्मृतीचे जाहीररित्या दहन केले. आणि ब्राह्मणांमध्ये हाहाकार उडाला जशीजशी मनुस्मृती तिकडे जळत होती तसतसे तिचे चटके इकडे ब्राह्मणांच्या अंगाला झोंबत होते. पण देशात इंग्रजांचे सरकार असल्याने व बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढ ते इंग्रज सरकारच्या कोर्टातही जावू शकले नाहीत. नुसते हात चोळत बसले. याच कारणाने ते बाबासाहेबांचा राग राग करून त्यांच्यावर भयंकर डुख धरून होते. त्यांच्या याच मनुस्मृतीने छत्रपती शिवराय व महात्मा जोतिबा फुलेंना शुद्र ठरवले होते. तिला जाळून डॉ. बाबासाहेबांनी छत्रपती शिवराय व महात्मा फुलेंच्या अपमानाचा बदला तर घेतलाच घेतला शिवाय आपले गुरू महात्मा फुले यांची मनुस्मृती जाळण्याची इच्छा देखील पूर्ण केली. म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या एका कृतीने दोन्हीही महापुरुषांच्या अपमानाचा बदला घेतला. हा इतिहास आमच्या तमाम बहुजनांनी लक्षात घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे मी नेहमी सांगत आलो त्याप्रमाणे आजच्या तरूणाईने लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. व तरूणाईने इतिहासाचे/महापुरुषांचे वाचन करणे म्हणजे आपल्या भविष्याची वाट उज्वल करणे होय. हे आजच्या तरूणाईनेही लक्षात घेतले पाहिजे. असो! ब्राह्मणांची अतिशय प्यारी असलेली मनुस्मृती जाळल्याची जळजळीत सल आजही वैदिक ब्राह्मणांच्या मनात सलत आहे. म्हणूनच की काय नयी शिक्षा नीतीच्या बहाण्याने शिक्षण व्यवस्थेत मनुस्मृतीचे काही श्लोक घुसडण्याचा घाट घालून मनुस्मृतीला पुनर्जीवित करण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला आहे. हे देशासाठी अत्यंत घातक आहे. त्यांच्या खोट्या इतिहासाने बहुजनांच्या भूतकाळाला आंधळे व भविष्याला लंगडे करून ठेवले होते. पुन्हा तिच पाळी बहुजनांवर आणण्यासाठी मनुवादी पाण्याचा बाहेर असलेल्या मछली सारखे तडफडत आहे.
८) *ब्राह्मणांची आठवी सल, संविधान लिहून पूर्ण -* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्यघटना म्हणजेच भारताचे संविधान लिहून पूर्ण केले. या घटनेप्रमाणे देश सार्वभौम होणार होता. सर्व भारतीय स्त्री-पुरुषांना त्यांनी न मागता किंवा कोणताही संघर्ष न करता मूलभूत मताधिकाराचा हक्क मिळणार होता. राजा व रंक यांच्या मतांचे मुल्य समान होणार होते. मानवी मुल्यांचे, मानवी स्वातंत्र्याचे जपणूक होणार होते. भारतीय नागरिकांना त्यांच्या हिताचे तमाम हक्क अधिकार मिळणार होते. स्वातंत्र्य पूर्व काळात ब्राह्मणांनी कोणताही गंभीरातील गंभीर गुन्हा केला तरी त्यांना शिक्षा होत नव्हती. आता जसा गुन्हा तशी सजा ब्राह्मणानांही लागू होणार होती. त्यांचे वर्चस्वाचे वस्त्रे खाली उतरणार होते. त्यामुळे ब्रह्मवृंद चांगलाच हादरला होता. आपण ज्यांच्या गळ्यात गाडगे अडकवले कमरेला झाडू लटकवला त्यांच्याच एका पोराने देशाची राज्यघटना लिहिली आणि त्या अंतर्गत आता आपल्याला नाक घासत जगावे लागणार या नुसत्या कल्पनेनेच ब्राह्मणांची पाचावर धारण बसली होती. सुरवातीला या संविधानाला त्यांनी जोरदार विरोध ही केला होता. परंतु त्यांचा तो विरोध सरड्याची धाव कुंपणापर्यंतच ठरली. ही संविधाना विषयीची सल संविधान लिहून पूर्ण झाल्यापासून ते आजतागायत ब्राह्मणांच्या मनी काट्यासारखी सल सल सलत आहे. म्हणून अधूनमधून संविधान बदलण्याची कळ त्यांच्या पोटात उठत असते. गेल्या दहा वर्षांपासून जरा जास्तच. ते शक्य होत नसल्यामुळे त्यांनी संविधानालाच आतून पोखरण्याचे काम सुरू केले आहे.
९) *वैदिक ब्राह्मणांची नववी सल, देशभरात संविधान लागू झाले -* दि. २६ जानेवारी १९५० पासून संविधान साऱ्या देशभरात लागू झाले. आणि घटनेप्रमाणे देशाचा कारभार सुरू झाला. या घटनेत मनुस्मृतीतील एकही कायदा समाविष्ट केला नाही म्हणून ते गळा काढत होते. देशातील विद्वानांनी जेव्हा त्यांना ठणकावून सांगितले की देश केवळ घटनेप्रमाणेच चालेल तेव्हा त्यांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. पण ते त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे देश विघातक कारवाया करू लागले. उदा० कर्नल पुरोहित, उपाध्याय यांनी देशात बाॅम्बस्फोट घडवून आणले. (संदर्भ: १ जानेवारी १८१८ स्वातंत्र्य्याचे बंड, लेखक: प्रा. विलास खरात, आणि वाचा माजी पोलीस कमिशनर एस. एम. मुश्रीफ यांचे पुस्तक हेमंत करकरे यांना कोणी मारले?) दुसरे उदाहरण सर्वांना माहितच आहे. प्रदिप कुरूळकर याने आपल्या ऐयाशीपायी देशाचा गोपनिय लष्करी डाटा आपल्या दुश्मन देशाला पुरवला किंवा विकला. अशा तऱ्हेने ते देशाला कमजोर करू पाहात आहेत व देशात अराजक माजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. यावरूनही सिद्ध होते ते या देशाचे नागरिक नाहीत विदेशी आहेत. ते जर खरोखर या देशाचे नागरिक असते तर त्यांनी आपल्याच देशविरूध्द अशा देशद्रोही कारवाया केल्या नसत्या. कारण या देशाचे सच्चे नागरिक असलेल्या देशप्रेमींसाठी देशप्रेम हे त्यांच्या बेंबीच्या देठापासून येत असते. हे लक्षात घेतले पाहिजे.
१०) *ब्रह्मणांची दहावी सल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ५ लाख अनुयायां सहित बौद्ध धम्माची दिक्षा घेतली -* डाॅ. बाबासाहेबांनी नागपूर या ऐतिहासिक शहरात दि. १४ आक्टोबर १९५६ रोजी आपल्या ५ लाख अनुयाया सोबत धम्माची दिक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी घोषणा केली की *'मी येत्या पाच वर्षांत सारा भारत बौध्दमय करेल'* या घोषणेने वैदिक ब्राह्मण पुन्हा हादरले. त्यानंतर उणेपूरे पावणे दोन महिन्यातच बाबासाहेबांचे एकाएकी म्हणजे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. परंतु हा त्यांचा नैसर्गिक मृत्यू नसून त्यांना विखारी डंख मारून त्यांची हत्या करण्यात आली. हे प्रा. विलास खरात लिखित *डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची हत्या कोणी, का व कशी केली?* या त्यांच्या तीन खंडातील ग्रंथांनी सिद्ध केले. हे खंड २०१६ साली प्रकाशित झाले. परंतु याला वैदिक ब्राह्मण आजपर्यंत आव्हान देवू शकले नाही. तसेच डिआयजी सक्सेना या एक सदस्यीय समितीने जो डॉ. बाबासाहेबांचा मृत्यू अहवाल तयार केला होता तो अहवाल आजपर्यंत संसदीय पटलावर ठेवण्यात आला नाही व सार्वजनिक होवू दिला नाही. डाॅ. बाबासाहेब हे आपले महापुरुष, त्यांच्यासाठी अत्यंत ठसठसणारी सल ठरली. म्हणून वैदिक ब्राह्मण लोक बाबासाहेब व त्यांच्या संविधानाला पाण्यात पहात आले/पहात आहेत. त्यांचा राग राग करत आले/ करत आहेत. हे आजही त्यांच्या हस्तकांकरवी बाबासाहेबांच्या मुर्तीच्या/प्रतिमेच्या विटंबनेतून व विषारी वक्तव्यातून दिसून येते. आठवून बघा १७ डिसेंबर २०२४ रोजी देशाच्या एका संविधानिक पदावर असलेल्या गृहमंत्र्यांनी भर संसद सभागृहात अतिशय तुच्छतेने 'आंबेडकर... आंबेडकर... आंबेडकर'... असा सहा वेळा उल्लेख केला. पुढे ते म्हणाले होते 'अगर इतनी बार भगवान का नाम लेते तो स्वर्ग प्राप्ती होती' वाचलं? अशी यांची बहुजन महापुरुषां विषयी नीच मनोवृत्ती आहे.
११) *ब्राह्मणांची अकरावी सल, मुंबई महाराष्ट्राला जोडून घेतली -* स्वतंत्र देशात १९५२ साली पहिली सार्वत्रिक निवडणुक पार पडली व केंद्रीय सरकार स्थापन झाले. त्यानंतर स्थानिक भाषांवर आधारित राज्य निर्मितीसाठी हालचाली सुरू झाल्या. जशा हालचाली सुरू झाल्या तसा आंध्र प्रदेशाने १९५३ सालीच प्रथम राज्य मिळवण्याचा मान पटकावला. इकडे महाराष्ट्र व गुजराती बांधवांनी मुंबई आपल्या राज्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले. तेव्हा मुंबई प्रांताचे प्रमुख मोरारजी देसाई होते. या प्रांतात महाराष्ट्र व गुजरातचा समावेश होता. मोरारजी देसाई हे गुजराती असल्याने ते मुंबई गुजरातला मिळावी या बाजूने होते. ते त्या बाजूने होते म्हणून प्रधानमंत्री नेहरू सुद्धा त्याच बाजूने होते. नागपूरी रेशीम बागेने ही नेहरूंना तसे संकेत दिले असावे. बघा गुजराती व्यापारी व महाराष्ट्रातील ब्राह्मण एकमेकांसाठी कशी पूरक भूमिका घेत होते. आजही ते तसीच भूमिका घेतात हे त्यांच्या कृत्यातून दिसून येते. *म्हणूनच महात्मा फुले याला 'भटाशेठांचे साटेलोटे म्हणत असत'* डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्पष्ट व पुराव्यासह ठासून सांगितले होते की, नैसर्गिक व भौगोलिक दृष्ट्या मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे.
कारण तेव्हा मुंबईतील मराठी लोकांची संख्या ५५% होती तर गुजराती लोकसंख्या २१% होती. बाकीचे लोक मिश्रित होते. तसेच मुंबई हे नैसर्गिक बंदर असल्याने मुंबई व आजूबाजूच्या उपनगरातील मासेमारी करणाऱ्या मराठी लोकांना मासेमारी करणाऱ्यांसाठी सोयीचे होते. तसेच इथला गिरणी कामगार हा मराठी होता. या व अशा अनेक कारणांचे उदाहरणे देऊन मुंबई ही नैसर्गिक व भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राचीच आहे हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते. परंतु तरीही इकडचे मोरारजी देसाई व तिकडचे प्रधानमंत्री नेहरू बधायला तयार नव्हते. जेव्हा बाबासाहेबांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले तेव्हा सारा देश शोकाकुल झाला, स्तब्ध झाला. बाबासाहेबांचे लेकरं ढसाढसा रडत होते. त्यातून देश सावरायला १९५८ साल उजाडले.
तिकडे मुंबई महाराष्ट्रासाठी सोडायला गुजराती बांधव विशेषतः व्यापारी लोक तयार नव्हते. त्यालाही कारणे होती. देश सोडण्यापूर्वी इंग्रज परकीय जरी असले तरी ते सहिष्णुतावादी होते. जनतेच्या मूलभूत सुविधा बंद करणारे इथल्या शोषक वर्गासारखे कर्मठ नव्हते. इंग्रज सरकारने मुंबईत बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या होत्या. त्यात प्रामुख्याने १६ एप्रिल १८५३ रोजी प्रवासी रेल्वे सुरू करणे, शाळा/काॅलेज/ हॉस्पिटलांची उभारणी करणे, कापड गिरण्या सुरू करणे, बी आय टी (बाॅम्बे इंप्रूव्हमेंट ट्रस्ट) मार्फत गिरणी कामगारांसठी वसाहती उभारणे अशा एक ना अनेक सोयी सुविधा भारतीयांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. या आयत्या सोयी सुविधां व स्थाई मालमत्तेवर डल्ला मारण्याचा इरादा ह्या षडयंत्री भटाशेठांचा होता. तसेच मोठमोठे उद्योगपती, कारखानदार, व्यापारी शिपिंग कार्पोरेशनवाले हे गुजराती असल्याने त्यांचा परदेशात व्यापार मुंबई बंदरातून चालत असे. मुंबई बंदर हे नैसर्गिक बंदर असल्याने त्यांचे मालवाहू व प्रवाशी जहाजे थेट बंदराच्या किनाऱ्याजवळ येत असत. (मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावरून पहा मालवाहू व प्रवासी जहाजे मुंबई बंदराच्या सागर किनाऱ्यावर नांगर टाकून उभे असलेले दिसतात) त्यामुळे या उद्योगपती व व्यापाऱ्यांचा अतिरिक्त मोठा खर्च वाचत असे व त्यातून ते भरपूर नफा कमावत असत म्हणून ते मुंबईला सोडायला तयार नव्हते.
इकडे मराठी लोकांनीही मुंबई न सोडण्याचा ठाम निर्धार केला. त्यासाठी तीव्र संघर्ष सुरू झाला. शेवटी गोळीबार होवून महाराष्ट्राचे १०५ वीर सैनिक शहीद झाले अन् दिल्लीतील नेहरू सरकार हादरले. व दिल्लीत मुंबई महाराष्ट्राला देण्याचा निर्णय झाला. तर अशा प्रकारे १०५ वीर सैनिकांचे बलीदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळाली. हा बलिदानाचा इतिहास आहे मुंबई महाराष्ट्राला जोडण्यासाठीचा. आपल्याला मुंबई मिळाली नाही म्हणून ती सल अजूनही गुजराती लोकांच्या व महाराष्ट्रातील चित्पावनी ब्राह्मणांच्या मनात सलत आहे. त्यामुळेच आज दिल्लीत बसलेल्या गुजरात लाॅबीने महाराष्ट्रातील आयते उद्योगधंदे, कारखाने, हिरे व्यापार व मोठमोठे केंद्रीय कार्यालये गुजरातला पळवून नेले/नेत आहेत. आणि नागपूरी रेशिम बागेच्या तालमीत तयार झालेले आधी नावापुरते उपमुख्यमंत्री (खरे मुख्यमंत्री तेच होते) आणि आताचे तेच विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यासाठी वाट्टेल ते सहकार्य करीत आहेत. या कारणाने आर एस एस महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र द्वेषी व महाराष्ट्राचे दोषी ठरत नाहीत का? हा त्यांचा महाराष्ट्र द्रोह नाही का? असे सवाल उठल्या वाचून राहत नहीत. ते व गुजराती लोक अजूनही मुंबई गुजरातला मिळावी यासाठी प्रयत्नात आहेत. निदान ती केंद्र शासीत प्रदेश व्हावी अशी त्यांची तगडी इच्छा आहे. पण अजून पर्यंत तरी त्यांचे प्रयत्न फलद्रूप झाले नाहीत. आणि म्हणूनच गुजराती व्यापारी व महाराष्ट्रातील चित्पावनी ब्राह्मण महाराष्ट्रावर डुख धरून आहेत, खार खाऊन आहेत.
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली संत परंपरा, महापुरुष/महामाता, समाज सुधारक/सुधारिका या सर्वांमुळे आमच्या वर्चस्ववादाचे वस्त्रहरण झाले, आमच्या कर्मकांडाची ऐसीतैसी झाली. आमचे पंडित पद जमीनीवर गळून पडले. एवढेच नाही तर बहुजन आम्हाला आता कोणताच मानपान देण्यास तयार नाही, त्यामुळे पुरोहित शाहीतून मिळणारे उत्पन्न कमी झाले. आमचे पेशवाई सारखे वैभव लयाला गेले. ह्याला कारणीभूत महाराष्ट्र व महाराष्ट्रातील बहुजन सुधारक आहेत. अशी त्यांची तीव्र स्वरूपाची भावना झली आहे. आणि ते महाराष्ट्रावर एक प्रकारे डुख धरून आहेत. म्हणून रेशिम बाग आपली बहिण दिल्लीश्वरी हिच्याजवळ चहाडी, चुगली लावून किंबहुना आदेश देवून महाराष्ट्राला फारशा सोयी सवलती मिळू देत नाही. नैसर्गिक आपत्तीत सुद्धा दिल्लीकडून येणाऱ्या मदतीत दुजाभाव केला जातो. फुले दांपत्यांना भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा अशी महाराष्ट्राची कित्येक वर्षाची मागणी आहे, पण त्यावर आतापर्यंतचे कोणतेही दिल्ली सरकार ढिम्मच राहिले. त्यांच्या ऐऱ्यागैऱ्यांना ते केंद्राच्या अखत्यारीत असलेले पुरस्कार देतात. पण फुले दांपत्यास नाही. जे महात्मा फुलेंच्या ऐतिहासिक चित्रपटाला विरोध करतात, त्यांच्या शिक्षण कार्यामुळे भारताच्या सर्व बहुजनांमध्ये शिक्षण पोहचले, त्याच शिक्षणाने त्यांच्या वर्चस्ववादाची गोची केली त्यासाठी फुले दांपत्यास भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार ते मिळू देतील? नियमात बदल करून सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न' दिला जातो परंतु फुले दांपत्याच्या महान शिक्षण कार्यामुळे सारा देश शिक्षित झाला. परंतु फुले दांपत्याना 'भारतरत्न' देण्यासाठी मात्र टाळाटाळ केली जाते. यात आहे की नाही दुजाभावपणा? भयंकर दबाव आल्यावर लाजेकाजेस्तव केंद्र सरकारने आता आता जिवावर आल्यासारखे कां कू करत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तेही त्यावेळी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच. ज्ञानपीठ पुरस्कारांसाठी, फुले दांपत्याच्या नावाने शिक्षक व शिक्षिका दिन घोषित करण्यासाठी किंवा कोणत्याही केंद्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील बहुजनांविषयी दुजाभाव करण्यात येतो. अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व कशामुळे? तर वरील ऐतिहासिक कारणांमुळे वैदिक कर्मठ ब्राह्मणांचा महाराष्ट्रावर राग असल्यमुळेच महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देण्यात येते. एवढे मात्र नक्की.
तर नागपूरी रेशिम बाग व दिल्ली महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देण्यासाठी वरील ही ऐतिहासिक प्रमुख कारणे आहेत. आणि ती त्यांनी जीवंत ठेवली आहेत. म्हणजे ते वरील ऐतिहासिक कारणे विसरले नहीत. देशाला स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सव वर्ष पार पडले तरी सुद्धा या ब्रह्मवृदांत घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये रूजली नाहीत. किंवा आपल्या श्रेष्ठतेच्या अहंकारापायी रुजवून घेतली नाहीत. ती मूल्ये रूजली असती तर महाराष्ट्र आज शांततेत सुखासमाधानाने जगला असता. परंतु म्हणतात ना 'जीत्याची खोड मेल्याशिवाय जात नाही' ही म्हण यांना तंतोतंत लागू पडते. महाराष्ट्रात निरंतर ठराविक अंतराने खोडसाळपणाने अभद्र घटना घडवल्या शिवाय त्यांना शांत झोप लागत नाही. आणि महाराष्ट्रालाही शांतपणे झोपू देत नाहीत. यापुढे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास/उत्कर्ष वाव्हा, व महाराष्ट्रात शांतता नांदावी असे वाटत असेल, तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख अबाधित राहावी व ती वृध्दीगंत व्हावी यासाठी केंद्रात व महाराष्ट्रात मूलनिवासी बहुजनांचे सरकार स्थापन होणे अत्यंत अगत्याचे आहे.
*-* अशोक सवाई.