Newsletter

Newsletter News, Photo & Article निःपक्षपाती

नांदेड ते प्रयागराज महाकुंभमेळ्याकरिता विशेष रेल्वेपरभणी/प्रतिनिधीप्रयागराज, उत्तर प्रदेश येथील महाकुंभमेळ्याला जाण्याकर...
25/01/2025

नांदेड ते प्रयागराज महाकुंभमेळ्याकरिता विशेष रेल्वे

परभणी/प्रतिनिधी

प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील महाकुंभमेळ्याला जाण्याकरिता नांदेड-पटना-नांदेड, औरंगाबाद-पटना-औरंगाबाद , काचीगुड-पटना-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटना-सिकंदराबाद विशेष रेल्वे प्रयागराज चौकीमार्गे चालविण्यात येत आहेत.
गाडी क्रमांक 07721 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून बुधवारी (दि.22) रात्री 11 वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07722 पटना ते नांदेड विशेष गाडी पटना येथून दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी रोजी पहाटे 4.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.
गाडी क्रमांक 07725 काचीगुडा ते पटनामार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी 4:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07726 पटना ते काचीगुडामार्गे नांदेड ही विशेष गाडी पटना येथून दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे सकाळी 7 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07099 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07100 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.
गाडी क्रमांक 07101 औरंगाबाद- पटना ही विशेष गाडी औरंगाबाद येथून दिनांक 19 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता सुटेल आणि जालना, सेलू ,परभणी,पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07102 पटणा ते औरंगाबाद विशेष गाडी पटना येथून दिनांक 21 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच औरंगाबाद येथे अनुक्रमे दिनांक 23 फेब्रुवारी आणि दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.45 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.
गाडी क्रमांक 07103 काचीगुडा ते पटना मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून बुधवारी (दि.22)दुपारी 4:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, , इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07104 पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे दिनांक 26 फेब्रुवारी सकाळी 7 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.
गाडी क्रमांक 07105 सिकंदराबाद ते पटना मार्गे नांदेड ही विशेष गाडी सिकंदराबाद येथून दिनांक 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, , इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07106 पटना ते सिकंदराबाद मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटना येथून दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच सिकंदराबाद येथे दिनांक 11 फेब्रुवारी सकाळी 11.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 20 डब्बे असतील.
प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील महाकुंभ मेळ्याला जाण्याकरिता नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद , काचीगुड-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद विशेष रेल्वे प्रयागराज चौकीमार्गे चालविण्यात येत आहेत

आर्थिक आपत्ती म्हणजे भारताच्या उभारणीची संधी म्हणूनच त्याकडे बघितले पाहिजे. सध्याची देशाची चालू खात्यातील तूट भरून काढण्...
27/12/2024

आर्थिक आपत्ती म्हणजे भारताच्या उभारणीची संधी म्हणूनच त्याकडे बघितले पाहिजे. सध्याची देशाची चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी एकही विदेशी कर्जदार भारताला कर्ज देण्यास तयार नाही. विदेशी चलन गंगाजळीही आटलेली. भारतीय अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे; पण नवीन भारताच्या निर्मितीसाठी आपत्तीचे आपण संधीत रूपांतर केले पाहिजे,’ असे म्हणत ज्या काळात भारताची गंगाजळी पूर्णतः आटली होती, जेव्हा भारताला कर्ज देण्यास कोणीही तयार नव्हते. तेव्हा भारताला सक्षम अर्थव्यवस्था प्रदान करून देणारे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ डाॅ. मनमोहन सिंह यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने फक्त भारतानेच नव्हे तर जगाने एक विद्वान गमाविला आहे.
आपल्या १९९१ ते १९९६ या कार्यकाळात देशाचे अर्थमंत्रिपद भूषवणारे अर्थतज्ज्ञ, शिक्षणकार, राजकारणी डॉ. मनमोहन सिंग हे भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून इतिहासात ओळखले जातील. देशाच्या अर्थव्यवस्थेची खडतर मार्गाने सुरू असलेली वाटचाल बघता आधी अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधानपद या नात्याने त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीवरच आजचा भारत उभा आहे. एक अनुभवी आणि अत्यंत कसलेले नोकरशहा म्हणून ओळखले जाणारे डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत अनोख्या कल्पना मांडून धाडसी निर्णय घेत भारतीय अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने आकार दिला.
आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातही सिंग यांनी भारतीय बाजारपेठेच्या विस्तारीकरणाला बळ दिले; पण त्यात यशही मिळवून दिले. पंतप्रधानपदाच्या याच कार्यकाळात पी. चिदंबरम यांच्यासोबत अर्थमंत्रालयाच्या मदतीने भारतीय अर्थव्यवस्था आठ ते नऊ टक्के विकास दर गाठू शकली. इतकेच नाही, तर २००७ मध्ये सर्वाधिक ९ टक्के विकासदराची नोंद करीत भारताने जगातील दुसरी सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली. अमेरिकेबरारोबरचे नातेसंबंध आणखी दृढ करणे; तसेच २००५ मध्ये भारत-अमेरिका नागरी आण्विक कराराच्या वाटाघाटीही त्यांच्याच सरकारच्या कार्यकाळात सुरू झाल्या. त्यानंतर झालेल्या अणुकराराच्या घोषणेमुळे भारताचा अमेरिकेच्या आण्विक इंधन आणि तंत्रज्ञानातील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या मौनाबद्दल त्यांच्या राजकीय विरोधकांनी घाणेरडी टीका केली. पण, देशहितासाठी या अवलिया त्या टीकेकडे दुर्लक्ष करून आपले काम सुरूच ठेवले. आपल्या सचोटीच्या स्वभावाला त्यांनी कधीच तडा जाऊ दिला नाही आणि नेहमीच विनम्र भूमिकेत ते वावरले अन् आपल्यातील भक्कम असा अर्थशास्त्रातील जिब्राल्टर फक्त देशालाच नव्हे तर सबंध विश्वाला दाखवून दिला.
फाळणीनंतर भारतात आल्यानंतर अत्यंत गरिबीत शिक्षण घेऊन जगाला अर्थनीती शिकवणारा हा स्वयंप्रकाशित सूर्य आज निवला. पण, त्यांनी दिवाळखोरीतून या देशाला बाहेर काढून जे उपकार केले आहेत. त्याची परतफेड कधीच होऊ शकणार नाही. या सच्च्या देशभक्ताला विनम्र आदरांजली !

आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ब्रेक!मुंबई — मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत 2 कोटी 40 लाखांहून अधिक...
20/10/2024

आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ब्रेक!

मुंबई — मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत 2 कोटी 40 लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले मात्र निवडणुकीमुळे लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधान सभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

आज राज्यात दुखवटा जाहीर! भारताचा अनमोल ‘रत्न’ हरपला! टाटा यांची कारकीर्दमुंबई : भारताचे प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा या नाव...
10/10/2024

आज राज्यात दुखवटा जाहीर! भारताचा अनमोल ‘रत्न’ हरपला! टाटा यांची कारकीर्द

मुंबई : भारताचे प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा या नावाजलेल्या कंपनीचे सर्वेसर्वा रतनजी टाटा यांचं निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण देश हळहळला आहे. तसेच रतनजी टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रतनजी टाटा यांच्या निधनामुळे राज्यात आज (10 ऑक्टोबर) एक दवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

जाणून घेऊयात रतन टाटांची थोडक्यात कारकीर्द

▪️ रतनजी टाटा 1961 च्या दरम्यान टाटा स्टील कंपनीत सामान्य कर्मचारी म्हणून रुजू झाले होते.

▪️ 1991 मध्ये रतनजी टाटा यांची टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी निवड झाली.

▪️ रतनजी टाटांकडे टाटा समूहाचं चेअरमनपद आल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांनी स्वतःची हिस्सेदारी वाढवली.

▪️ 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली. तसेच अशा पद्धतीची कार तयार करणं हे रतनजी टाटांचं स्वप्न होतं.

▪️ यानंतर एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना त्यांना सुचली.

▪️ 2008 मध्ये रतनजी टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली, त्यामुळेच रतनजी टाटांना नॅनो कारचे जनक असंही म्हटलं जाते.

▪️ 2012 मध्ये रतनजी टाटांनी टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा राजीनामा देऊन सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला.

▪️ मात्र सायरस मेस्त्रींबरोबर वाद झाल्याने 2016 मध्ये रतनजी टाटा पुन्हा एकदा टाटा समूहाच्या चेअरमनपदी रुजू झाले.

▪️ रतनजी टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत

▪️ रतनजी टाटांचे बंधू नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही तीन मुले आहेत.

▪️ तसेच रतनजी टाटा यांना 2008 मध्ये पद्मविभूषण आणि 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

▪️ टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं.

15/09/2024

बीड जिल्ह्यात ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी बुधवारी

बीड, दि. 15 (जिमाका): बीड जिल्हयात ईद-ए-मिलादची सार्वजनिक
सुट्टी बुधवारी दि. 18 सप्टेंबर 2024 ला आहे.

महाराष्ट्र शासनाचे शासन अधिसूचनेतील तरतुदीनुसार मुस्लिम बांधवाना ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी तसेच सामाजिक सलोखा व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या हेतुने बीड जिल्हयासाठी सोमवार, दिनांक 16 सप्टेंबर, 2024 करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करुन ती बुधवार, दिनांक 18 सप्टेंबर, 2024 या दिवशी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी, बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सावधान ! पॅरासिटामोल सह ‘या’ 156 औषधांवर केंद्र सरकारची मोठी कारवाई, आरोग्यास घातक असल्याने बंदीसर्दी-पडसे, ताप आणि अंगद...
24/08/2024

सावधान ! पॅरासिटामोल सह ‘या’ 156 औषधांवर केंद्र सरकारची मोठी कारवाई, आरोग्यास घातक असल्याने बंदी

सर्दी-पडसे, ताप आणि अंगदुखीसाठी वापरण्यात येणाऱ्या 156 हून अधिक औषधांवर आरोग्य मंत्रालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. या संयुक्त औषधांचा वापर सातत्याने पेनकिलर म्हणजे अंगदुखी कमी करण्यासाठी करण्यात येतो. ही औषधं नागरिकांच्या आरोग्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

यामध्ये पॅरासिटामोल, ट्रामाडोल, टॉरिन आणि कॅफीन यांच्या संयुक्त औषधांवर बंदी आणली आहे. याशिवाय एसिक्लोफेनाक 50एमजी + पॅरासिटामोल 125एमजी कॉम्बिनेशन, मेफेनामिक ॲसिड + पॅरासिटामोल इंजिक्शेन, सेट्रीजीन एचसीएल + पॅरासिटामोल + फेनिलफ्रीन एचसीएल, लेवोसेट्रीजीन + फेनिलफ्रीन एचसीएल + पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरामाइन मॅलेट + फेनिल प्रोपेनोलामाईन, आणि कॅमिलोफिन डाइहाइड्रोक्लोराइड 25एमजी + पॅरासिटामोल 300एमजी या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.

ही औषधं कोणत्याही चाचणीशिवाय घटकांचे प्रमाण, मात्रा न तपासता थेट बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर समितीने ही औषधं बंदी घालण्याची शिफारस आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. ही बंदी तात्काळ लागू करण्यात आली असल्याने औषध विक्री दुकानांवर ही औषधं विक्री करता येणार नाही.

कृषीमंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक (अण्णा) कराड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी...
20/08/2024

कृषीमंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक (अण्णा) कराड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी सहाय्यक संस्था केंद्र मंजूर

*श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्थेची सहाय्यक संस्था म्हणून निवड; या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संपर्क साधावा - सचिन मुंडे*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक (अण्णा) कराडयांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या महिला व बाल विकास खात्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एकल पालकांच्या मुला-मुलांनी व दिव्यांगांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून लाभ मिळविण्यासाठी श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन मुंडे यांनी केले आहे. ही योजना राबविण्यासाठी संधी दिल्याबद्दल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे तसेच ज्येष्ठ नेते वाल्मीक (अण्णा) कराड यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत एकल पालकांच्या मुली - मुलांना वयाच्या १ ते 18 वर्षापर्यंत 2, 250/- रुपये अनुदान मिळते. कोरोना काळात ज्यांचे आई-वडील वारले आहेत. अशा पालकांच्या सर्व मुली-मुलांना तर ज्यांची आई किंवा वडील यांचे निधन झाले आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेत दिव्यांग मुलांचाही समावेश आहे.
या योजनेसाठी 1 ते 18 वर्षापर्यंत एकल पालकांची मुले पात्र आहेत. राज्य शासनाच्या वतीने परळी वैजनाथ अंबाजोगाई, केज, धारूर, बीड, माजलगाव, वडवणी, आष्टी या तालुक्यातील लाभार्थी एकल पाल्यांसाठी श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ या संस्थेची सहाय्यक संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील पात्र पालकांनी व पाल्यांनी संस्थेच्या परळी वैजनाथ येथील संत भगवान बाबा चौकात असणाऱ्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन मुंडे यांनी केले आहे.

या योजनेसाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे :
एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत, अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा एचआयव्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना ही योजना मिळते.
■ अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण
होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी २ हजार २५० रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.
■ घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांनाही हा लाभ मिळतो.
फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रांसह अर्ज
करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत, त्यांनी तसे पुरावे
व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावे. तसेच आवश्यक कागदपत्रे (याचा छापील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून घ्यावा योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज, पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेरॉक्स, मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट,तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, पालकांचे मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला, पालकांचा रहिवासी दाखला. (ग्रामपंचायत, नगरपालिका यांचा), मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक, मृत्यूचा अहवाल (कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल), रेशनकार्ड झेरॉक्स., घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत फोटो (दोन मुले असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचा स्वतंत्र फोटो), मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो लागणार आहेत. तसेच बीड जिल्ह्यात सर्व तालुक्यात ही योजना राबविण्यासाठी श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्थेची निवड केल्याबद्दल व संधी दिल्याबद्दल सचिन मुंडे यांनी कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व वाल्मिक (अण्णा) कराड यांचे आभार मानले आहेत. तसेच या योजनाचा लाभ घेण्यासाठी मो.7620977940 या नंबर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

30/07/2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत

मुंबई, दि. 30 – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

या योजनेचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत : या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे. एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. तसेच फक्त 14.2 किलेग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल.

या योजनेची कार्यपद्धती पुढील प्रमाणे आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” अंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलिंडलचे वितरणही तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल. केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदाना व्यतिरिक्त राज्य शासन 530 रुपये प्रति सिलिंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांचा थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी यांना प्रति सिलिंडर 830 रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही. दि.1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. दि.1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व लाभार्थी निवडीसाठी मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी एक, प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहरासाठी नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, तर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल. या दोन्ही समिती ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांचे (रेशन कार्डनुसार) कुटुंब निश्चित करेल. योजनेतील लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची काळजी घेईल. निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी, आधार संलग्न बँकखाते क्रमांकासह निश्चित करेल. याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समितीही कार्यरत असणार आहे.

थायलंड येथे चालू असलेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये भारताकडून धनश्री फड फायनल मध्ये विजयी.भारताचे प्रतिनिधित...
25/07/2024

थायलंड येथे चालू असलेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये भारताकडून धनश्री फड फायनल मध्ये विजयी.

भारताचे प्रतिनिधित्व करताना (रेसलिंग) कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावून परदेशामध्ये विजयी तिरंगा फडकवल्या बद्दल धनश्री सह तिचे पालक आणि कोच यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वाढती गर्दी लक्षात घेऊन, या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविली आह...
02/07/2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वाढती गर्दी लक्षात घेऊन, या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला, या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

पालकमंत्र्याच्या विरोधात हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या कुंडलिक खांडेच्या गुंडागर्दीला पोलीस प्रशासनाने आळा घालून कठोर कार्य...
30/06/2024

पालकमंत्र्याच्या विरोधात हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या कुंडलिक खांडेच्या गुंडागर्दीला पोलीस प्रशासनाने आळा घालून कठोर कार्यवाही करावी - प्रिया डोईफोडे

बीड / कुंडलिक खांडे तु आमचे नेते ना.धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचतो. तुझ्या या गुंडागर्दीमुळे व तुझ्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्यामुळे दोन वेळा विविध पक्षातून तुझी हकालपट्टी झाली आहे. तुझी हीच लायकी आहे. खांडे ज्या पक्षात तु पदावर होतास त्या पक्षात आपल्या कर्तव्याशी गद्दारी करून तू लोकसभेला पक्ष विरोधी काम केले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुझी आज पक्षातून हकालपट्टी केली आहे आणि तु आमदार होण्याचे स्वप्न बघतोस.
खांडे आमदार होण्याची तुझी लायकी नाही. कुंडलिक खांडे यांच कसलेही सामाजिक काम नसताना दोन नंबरचे धंदे करून फक्त पैशाच्या जोरावर दोन वेळा जिल्हाप्रमुख झाला. उलट वारंवार गुटखा, जुगार, दंगली, सावकारकी असे धंदे करतो. असे लोक आमदार होण्याचे स्वप्न बघतात. मतदार संघात दहशत माजवून आपल्या शहराची व जिल्ह्याची जी भयावह परिस्थिती झाली आहे. त्यास सर्वस्वी जबाबदार हेच लोक आहेत.
बीड जिल्ह्यातील तमाम जनतेने अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना थारा देऊ नये. आमचे नेते ना. धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याची भाषा करणाऱ्या खांडेला माझे खुले आव्हान आहे. मुंडे यांच्या केसाला ही धक्का लागला तर तमाम बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवतींची युवा टीम तुला बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही हे लक्षात ठेव. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की, पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांची सुरक्षा वाढवावी. जिल्हयाचे पालकमंत्री हे सर्वांचे असतात. आपल्या पालकमंत्र्यावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या गुंड प्रवृत्ती असणाऱ्या कुंडलीक खांडेवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करून कुंडलिक खांडेच्या गुंडागर्दीला आळा घालावा अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या बीड जिल्हा अध्यक्ष प्रिया डोईफोडे यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.

CM Majhi Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला १५०० /- रू. मिळणार, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलै पासून ...
29/06/2024

CM Majhi Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला १५०० /- रू. मिळणार, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलै पासून अर्ज सुरु !

👇सविस्तर माहिती खालील प्रमाणे👇

👉 योजनेचे स्वरूप
पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Trancter) सक्षम बँक खात्यात दरमहा रु. १,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु. १,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.

👉 योजनेचे लाभार्थी
महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्त्या आणि निराधार महिला.

👉 योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता
(१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.

(२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

(३) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.

(४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणे आवश्यक आहे.

(५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

अपात्रता

(१) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

(२) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.

(३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.

(४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु. १,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.

(५) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.

(६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.

(७) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.

(८) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

👉आवश्यक कागदपत्रे
सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेतः-

(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.

(२) लाभार्थ्यांचे आधार कार्ड.

(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.

(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).

(५) बैंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.

(७) रेशनकार्ड.

(८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

👉अर्ज करण्याची प्रक्रिया:*
योजनेचे अर्ज सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे.

(१) पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

(२) ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी “अर्ज” भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.

(३) वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.

(४) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.

(५) अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.

१. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
२. स्वतःचे आधार कार्ड

👉महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय:*

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी खालील GR डाऊनलोड करा.

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Newsletter posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Newsletter:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share