आम्ही OBC

आम्ही OBC To raise the voice of OBC

ज्यांनी महाराष्ट्रामध्ये 1978 ला दगाबाजी ला प्रारंभ केला. ज्यांनी स्वतःचेच पक्षाचे सरकार पाडून विरोधी पक्षाबरोबर दुसरे स...
25/02/2025

ज्यांनी महाराष्ट्रामध्ये 1978 ला दगाबाजी ला प्रारंभ केला. ज्यांनी स्वतःचेच पक्षाचे सरकार पाडून विरोधी पक्षाबरोबर दुसरे सरकार तयार केले. ज्यांनी सत्ता प्राप्त होतात गरीब लोकांना घरं देणे ऐवजी लवासा निर्माण केला. ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नागपूरच्या अधिवेशनावर गोवारी आदिवासी मोर्चा घेऊन आले, त्या मोर्चाला सामोरे न जाता किंवा कोणता चांगला मंत्री न पाठविता त्या गोवारी हत्याकांडात जबाबदार असणारे शरदचंद्र काका पवार आज साळसूदपणाचा आव आणीत आहेत. तुम्हाला विश्वातली सारी मोरयालिटी किंवा डिग्निटी किंवा होनेस्टी माहित आहे का??
अम्मा भटक्यांना ती कशी माहीत असेल?? ज्यांनी सत्ता काळामध्ये मावळच्या खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांना पळायला लावून पाठीमागून बंदुकी ने शेतकऱ्यांना ठार करणारे सरकार चालवले ते आपल्याला प्रमाणिकतेचं महत्व सांगत आहेत. ज्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ...ठेवून
त्यांच्यामार्फतच उद्योगधंदे सुरू केले. मराठा आरक्षण मागणाऱ्या शालिनीताई पाटील यांना घालून पाडून बोलण्याचे उद्योगधंदे केले. मराठा आरक्षणाचे आंदोलक अण्णासाहेब पाटलांना आत्महत्येस प्रवर्त केले. ते आपल्याला इमानदारीचा पाढा शिकवीत आहेत. काय म्हणावे या कर्म दरिद्री माणसांना!

24/02/2025

जरंगे चा बार उडविण्यासाठी धसांना फुस... हे काम झाले की,
धसांची कसली विचारपूस?

22/02/2025

ज्या भामट्याला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी पूर्ण हयात भर महत्व दिले नाही, व तो दगाबाज आहे म्हणून सांगितले तो सुरेश धस गोपीनाथ गडावर!
अर्थात त्याची भामटेगिरी...

ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आयुष्यभर आपलं झाकून ठेवून विरोधकांच्या शक्ती स्थळाकडे बोट दाखवले ते शरदचंद्र काका यांनी बारामती...
22/02/2025

ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आयुष्यभर आपलं झाकून ठेवून विरोधकांच्या शक्ती स्थळाकडे बोट दाखवले ते शरदचंद्र काका यांनी बारामती चाललय काय हे तरी तपासून पाहावे. त्यांच्या लेकीने परळी बीडमध्ये येऊन उगीच हवेत गोळ्या मारू नयेत.

20/02/2025

मुंबई -नागपूर राष्ट्रीय महामार्गवर दोन्ही बाजूने वटवृक्ष लावावेत.

आम्ही ओपन गटातून आमची गुणवत्ता सिद्ध केली तरी, आमची जात माहिती होताच महाराष्ट्र लोकसेवा आयोग सरळ सरळ नियुक्ती नाकारत आहे...
16/02/2025

आम्ही ओपन गटातून आमची गुणवत्ता सिद्ध केली तरी, आमची जात माहिती होताच महाराष्ट्र लोकसेवा आयोग सरळ सरळ नियुक्ती नाकारत आहे... हा ओबीसी विद्यार्थ्यांवर सपशेल अन्याय आहे.. लोकसेवा आयोग हा फक्त उच्चवर्णीय सरंजाम्यान साठीच अनुकूल असतो काय??
ओबीसीनो उठा.. जागे व्हा.. नाहीतर तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही



मा. ना.देवेंद्रजी फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई.
आपण निवडणुकीत ज्या पद्धतीने म्हणता की ओबीसींचा आणि आमचा डीएनए एकच आहे. तर मग मेरिट लिस्ट मध्ये सर्वाधिक गुणांकन मिळवून सुद्धा या ओबीसीतील लेकरांना एमपीएससी बोर्ड का नाकारत आहे?
जर या लेकरांपैकी एकही लेकरू ब्राह्मणाचे असते, तर त्यांना लावलेल्या सर्व प्रकारचा मीडिया, आपण आणि सर्वांनी त्या लेकराला घेणे भाग पाडले असते. परंतु ओबीसींच्या या लेकरांचा कोणी कैवारी आहे का? असेल तर तात्काळ या लेकरांना न्याय द्या. एवढीच कळकळीची नम्र विनंती.
ए. तु. कराड परळी वैजनाथ, जि. बीड.
पेन्शनर्स शिक्षक व अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष

श्री सुरेश धस दोन महिने नऊटंकी केली, अखेर ती नौटंकी बाहेर आली... सुरेश धस आणि विधानसभेला निवडणुकीसाठी लागणारा निधी वाल्म...
15/02/2025

श्री सुरेश धस दोन महिने नऊटंकी केली, अखेर ती नौटंकी बाहेर आली... सुरेश धस आणि विधानसभेला निवडणुकीसाठी लागणारा निधी वाल्मीक कराड यांच्याकडूनच घेतला. माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब व माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या ताकतीचा उपयोग करून ते निवडून आल्याबरोबर फुस लावून दिलेली df काठी ही ना सुरेश धसला कळाली ना मनोज जरंगे ला कळाली!
श्री सुरेश धस यांनी केलेली नोटंकी ही फुस लावून दिल्यामुळेच झाली. हिम्मत असेल तर सुरेश धस यांनी ज्यांनी त्यांना लावून दिले व उघडे पाडले त्या मुख्य व्यक्ती विरोधात उतरावे... छे छे कसे उत्तरतील ते तर महाबली.माननीय नामदार बावनकुळे यांना आपल्या काही चेले चपात्या मार्फत बदनाम करू नये. तुम्हाला फुस लावून दिलेले खरे आका ओळखता येत नसतील तर
तुमची सर्व नोटंकी फेल गेली!
आणि आम्हाला हे माहीत होते की तुमची ही सर्व सोंगाड्या, दारुड्या आणि नौटंकीपणाची नोटंकी उघडी होणारच आहे!

14/02/2025

धन्यवाद,बजरंग बप्पा!
तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!!
तुमच्या राजकीय बापाने परळी बीड नगर रेल्वे ला उद्धव सरकारच्या काळात तीन वर्षाची 500 कोटी रुपये राज्य सरकारचा हिस्सा का दिला नाही याची विचारणा करण्याची हिम्मत तुमच्यात आहे का?
तुमचा राजकीय बाप बारामतीचा काका, यांनी मराठवाडा व विदर्भ यासाठी त्यांच्या सत्ता काळामध्ये कोण कोणती कामे केली?? याचे उत्तर तुम्ही देता का??
महाराष्ट्राचा नंबर एक दगाबाज, मराठवाडा व विदर्भाला सातत्याने जातीय द्वेषाच्या खाईत लोटणारा महापापी....
त्याच जातीय द्वेषातून आपली बीड जिल्ह्यात वर्णी लागली, आपला राजकीय बाप जी मोठी स्टंटबाजी करतो. त्याच धर्तीवर आपली गेल्या सात महिन्यांमध्ये स्टंटबाजी सुरू आहे. बारामतीच्या काकाचे चेले चपाटे जेव्हा बजरंग बप्पा यांनी परळी बीड नगर रेल्वे आणली म्हणून अभिनंदन करीत आहेत. तेव्हा आम्हाला खरंच सांगावसं वाटतं की, तुमची संस्कृतीच ही आहे का?
की दुसऱ्याच्या घरी पैदा झालेलं गोड लेकरू तुम्ही आपलंच म्हणून मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरे करता. तुमच्या मनाला किंवा तनाला जराही लाज लज्जा कशी वाटत नाही.असो....
ज्या जातीय द्वेषातून तुम्ही पुढे आलात त्याच थाटामाटात तुम्ही शरदचंद्र पवार काकाच्या पक्षाचे काम करा. उगीच हवेत गोळ्या मारण्यापेक्षा चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या बारामतीच्या काकांनी आपल्यासाठी काय काय कामे केली त्याची यादी जाहीर करा.
परळी बीड नगर रेल्वे प्रमाणे महाराष्ट्रात 22 प्रोजेक्ट मोदी यांनी आणले व त्या प्रत्येक प्रोजेक्टला बजेटही दिले. इतकेच नव्हे तर भाजपच्या सरकारने प्रत्येक कामात बारकाईने लक्ष देऊन तत्कालीन खासदार डॉक्टर प्रीतम ताई गोपीनाथराव मुंडे यांनी प्रशासनाच्या पाचशे बैठका, रेल्वेमंत्री गृहमंत्री व पंतप्रधान मोदी साहेबांच्या पन्नास वेळा भेटी घेतल्या. काँग्रेस सत्ता काळात शरदचंद्र पवार सत्तेत असतानाही परळी बीड नगर रेल्वेला वाटाण्याच्या अक्षदा दिल्या..... तेव्हा तुमचे तोंड कुठे गप्प होते. आता साळसूतपणा करून, सोंगाड्या वाणी, किंवा नोटंकी करून प्रत्येक मंत्र्यांच्या भेटी घेताना दिसता, तेव्हा तुमच्या राजकीय बापाला विचारा. की तुम्ही मराठवाड्यात काय काय दिवे लावले?

15/01/2025

आंतरजिल्हा बदलीतील अतिरिक्त 747 शिक्षक संदर्भातून....... श्री धस यांचा काळा चेहरा.
बीड.. 2014 पूर्वी युतीचे सरकार येण्याच्या अगोदर काँग्रेसचे सरकार होते. या सरकारमधील सहभागी सुरेश धस,- विजय राजे पंडित तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष, संदीप क्षीरसागर - तत्कालीन शिक्षण सभापती
श्रीमान जेवळीकर साहेब - तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांच्या समन्वयातून बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या,आंतरजिल्हा बदलीने प्रचंड मोठा पैशाचा बाजार करून देवाणघेवाण करून अगदी चौका चौकात रस्त्यामध्ये गाडी उभा करून प्रिंटर सह सोबत ठेवून श्रीमान जेवळीकर यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या सुद्धा बदल्या केल्या. त्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने नव्हत्या. आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या बदल्या ह्या नियमानुसार व्हाव्या लागतात. परंतु बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला कधीही नियम किंवा नियमावली पाळावीशी वाटली नाही. त्यातली त्यात सुरेश धस यांनी आज जी खोटी माहिती देणे सुरू केलेले आहे ते धंदात खोटे असून त्यांनीच केलेले हे पाप आहे. मा ना.पंकजाताई मुंडे ह्या 2014 नंतर महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री झाल्या. धस ने केलेले हे पाप त्यांना निस्तारण्यासाठी जवळ जवळ दोन वर्षे लागली. अर्थात ह्या अंदाधुंद पद्धतीने केलेल्या बदल्या यांना पोस्टिंग देण्यासाठी दोन वर्षे लागली. सुरेश धस म्हणजे बीड जिल्ह्याच्या राजकारणात एक कलंक आहे. मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली... हे जे माननीय पंकजाताई वर सद्यस्थितीला आरोप करीत आहेत. ते म्हणतात की 747 शिक्षक मा.पंकजाताई मुंडे यांनी चुकीच्या पद्धतीने आणून बसवले. पब्लिकने गाव गावच्या शिक्षकांना विचारून घ्यावे कोण खोटे बोलतो.
माननीय ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अगदी ऑनलाईन पद्धतीने एन आय सी पुणे मार्फत बदल्या केलेल्या आहेत. त्या बदल्या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वरून करण्यात आलेले आहे. सुरेश धस आका ला कदाचित ही माहिती नसावी. त्यांनी ज्या वेळेस राज्यमंत्री होते, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोरील ऑनलाइन बदल्या प्रसंगी संगणक उचलून स्वतःच्या घरी नेऊन ठेवले.!
ही माहिती खुद्द तत्कालीन जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे. या पुस्तकाचा आधार घेऊन कदाचित सुरेश धस यांच्यावरती गुन्हा नोंद करता येईल.
अशा प्रकारचा महाप्रताप करणारे सुरेश धस. यांचा एक काळाकुट्ट इतिहास आहे. या काळ्या कुट्ट इतिहासाला आम्ही सातत्याने मोर्चे आंदोलने व धरणे करून प्रत्युत्तर दिलेले आहे. हा मस्तवाल माणुस सद्यस्थितीला नागपूर वाल्याच्या मदतीने मा.पंकजाताई मुंडे यांना बदनाम करण्यासाठी टपलेला आहे. परंतु या सुरेशधसाला आम्ही चॅलेंज करू इच्छितो की, 747 शिक्षकांच्या बदल्या या गैर कशा? यासंबंधी सभागृहात आवाज उठवावा. मीडियामध्ये, पब्लिक मध्ये, सत्य झोपेतून उठेपर्यंत असत्याचा बोल बाला ज्या पद्धतीने सुरू असतो. त्या पद्धतीने सुरेश धस मस्तावलेल्या, तराळलेल्या माणसा प्रमाणे आरोप करीत आहे. परंतु आम्हाला माहित आहे की लगाम कसा घालावा? कळवा कसा घालावा?
सुरेश धस यांना कसलीच साधन सुचिता, न्यायनीतीची चाड नाही. पक्षांमध्ये काम करताना सेवा,समर्पण व बांधिलकी तर त्याला माहितीच नाही. आज जरी नागपूरवाल्यांनी फुस दिली असली तरी त्यांची फुसफूस फार काळ टिकणार नाही.कारण वर प्रधानमंत्रीमोदी व गृह मंत्री...शहा बसलेले आहेत. फार काळ असली, नको नको ती बडबड महाराष्ट्राला परवडणार नाही. अशा पद्धतीचा दम शिर्डी येथील दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी भरला आहे. यावरून सुरेश धस यांनीही जरा तोंडाला चिकटपट्टी लावून घ्यावी. आणि मुंडे बंधू-भगिनीवरील आरोप पुराव्यानिशी करावेत. अन्यथा आष्टीत आम्हाला तळ मांडून आपली खरडपट्टी करायला काहीही वेळ लागणार नाही. आपला पुढचा राजकीय प्रवास आपणच स्वतः नको नको ते आरोप करून स्वतःच संपवीत आहात हे लक्षात ठेवा. सुरुवातीपासूनच्या व कालच्याच निवडणुकीमध्ये आपल्याला मुंडे बंधू-भगिनीचा हात असल्याशिवाय यश प्राप्त झालं नाही हे त्रिवार सत्य आहे. परंतु आपली दानत किंवा आपली
फित्रत सत्यवादी नाही हे आम्हाला माहित आहे. आपण दल बदलू आहेत. सत्य स्वीकारणे आपल्या स्वभावात नाही. जो स्वतः तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोरचे ऑनलाइन बदल्याचे संगणक उचलून पळतो, जो स्वतः राज्यमंत्री असतो, तो मा.ना.पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री यांच्या ऑनलाइन बदल्या अतिशय शिस्तबद्ध, महाराष्ट्र शासनाच्या सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांनी केलेल्या बदल्यास चुकीचं म्हणतो त्यास
बये तुला बुरगुंडा होईल गं "... या उक्तीनुसार बीड जिल्ह्यात जन्मलेले हे काळ कार्ट... जिल्ह्याचीच जेव्हा बदनामी करतो. केव्हा पेराल ते उगवते. परळीच्या वैद्यनाथ ने प्रचंड मोठ्या प्रमाणात विष पचवलेले आहे. तू तर काय -किस झाड की पत्ती.
ज्या वैद्यनाथाच्या पावन भूमीत येऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सभेत येऊन स्वतः त्यांच्या चरणी नतमस्तक होणारा धस वेगळा नंतर त्यांच्या वर आरोप करणारा धस वेगळा, त्यांचेच फोटो लावून मते मागणारा धस वेगळा, आज मा.पंकजाताई वरती आरोप करणारा धस वेगळा, स्वर्गीय पंडितांना मुंडे यांच्या पाया पडणारा धस वेगळा,आणि लागलीच माननीय धनंजय मुंडे यांच्या जि प अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाबाज दिसून आलेला धस वेगळा. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दुसऱ्यांदा तिकीट नाकारल्यानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या घरी तासन्तास बसून त्यांच्यापुढे सातत्याने पायावर लोळण घेणारा धस परळीकरांनी पाहिलेला आहे.! अगदी कालच्या निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या सभा लावण्यासाठी परळी तळ मांडलेला व सभी प्रसंगी मुजरा करणारा धस बीड जिल्ह्याने पाहिलेला आहे.असा हा नवटंकीबाज दारुड्या आणि गारुड्या धस वेगळा!!
परळी ही वैद्यनाथाची भूमी, पंचम ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेली भूमी. इथं जगमित्र नागाणाथाचे वास्तव्य आहे! इथे संतांचा वारसा आहे...
खरंतर परळीकरांना काशी वर्ज आहे.... मांजर जरी मारली तरी पळीकरांना काशीला जायची कसलीच गरज नाही! हा पळीकरांचा इतिहास आहे!! नवरात्र मध्ये जर काली मातेने अशा नराधमाला यम सदनी पाठवले तरी काहीही हरकत नाही.
वैद्यनाथाचा जीर्णोद्धार लोककल्याणकारी राणी अहिल्या राणी होळकर यांनी बांधकाम करून केलेला आहे.. वैद्यनाथाचे दर्शन झाल्यावर अहिल्यादेवी राणीचे दर्शन येथील भक्तांना आपोआपच होते!
वैद्यनाथाच्या पायथ्याशी अन्नपूर्णा देवी भोजनालयामध्ये
नित्यनेमाने पाच हजार पर्यंत माणसे दररोज जेवण करीत असतील! परळी ही दानसुरांची आहे.... धस यांनी सर्व प्रकारचे दान परळी वैद्यनाथ कडून घेऊन वैद्यनाथाचीच ते बदनामी करत आहेत.
त्यांनी कदाचित वैद्यनाथाचे दर्शन घेतले नसेल, धस यांना अहिल्या राणी देवी, ज्योतिराव फुले - सावित्री फुले
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जरा वावडे दिसून येत आहे. अंगविक्षेप करून माळी-- माळी करत आहेत.धस हे सन्माननीय भुजबळ साहेबांवरती जेव्हा वाकडया नजरेने आज बोलत आहेत, तेव्हा आम्हाला लक्षात येते की धस हा नागपूरकरांच्या फूस -तंत्रामुळे बोलत आहे. अन्यथा धस ची औकात आम्हाला सर्वांना माहीत आहे.
खरंच धस यांची औकात आहे का की भुजबळ साहेब वर त्यांनी बोलावं. खरंच धस यांची औकात आहे का की माननीय पंकजाताई मुंडे यांच्या वरती बोलावं. खरंच धस यांची औकात आहे का की माननीय धनंजय मुंडे साहेबांवरती बोलावं. त्यांनी असंही म्हटलं की परळीमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा नारळी सप्ताह सुद्धा झालेला नाही, खरंच या धस यांना लाजना लज्जा.... हे काळं स्वतःला लोकनेता समजत आहे.
त्यांनी कालच्या मीडिया माध्यमातून जे झुटा बाजार बोलण्यास सुरुवात केली त्यापैकी परळीतील व्यपारी दुबे यांच्या अपहरणाविषयी खोटे बोलले... त्याचे उत्तर व्यापारी दुबे यांनी ताबडतोब दिले. नंतर प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात अंगविक्षेप करून माळी माळी असा जातीय द्वेष बाहेर ओकला ... त्यात त्यांची एवढी नाचक्की झाली की त्यांना जाहीर माफी मागावी लागली.
त्यांनी धाराशिव च्या सभेमध्ये असं म्हणाले की, परळी वाल्यांनी कधी राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा नारळी सप्ताह सुद्धा घेतला नाही. अरे गधड्या धस तुला काय माहित??
सुरेश धस यांनी परळीची बदनामी करण्यासाठी परळीत 109 गुण घडले झाले अशी बदनामी केली. दुसऱ्याच दिवशी परळीतील पोलीस प्रमुखांनी या संदर्भामध्ये खुलासा करून सांगितले की, बीड जिल्ह्यात केवळ 41 खून नोंद झालेले आहेत. इतर नोंदी ह्या आकस्मात मृत्यूच्या झालेल्या आहेत.
या व्यक्तीचा ना कुठला अभ्यास ना कुठली साधन सुचिता. हा अस्सल दारुड्या - नौटंकी बाज आणि गारुड्या आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी 2004 च्या दरम्यान नारळी सप्ताह परळी येथील वैद्यनाथ कॉलेजच्या मैदानावरती घेतलेला होता. त्या नारळी सप्ताहामध्ये त्यांनी ह भ प नामदेव शास्त्री,पंडित यादव राज, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, अजित कडकडे असे ख्यातनाम गायक- पखवाज वादक आणलेले होते.
धस असे म्हणतात की 30% वंजारी सोबत आहेत, त्यांनी खरंच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आता मुंडे बंधू भगिनीला शरण जाऊ नये. स्वतःच्या हिमतीवरती आता प्रत्येक निवडणूक लढावी. अन्यथा पुन्हा मुंडे बंधू भगिनी समोर पायावर लोळण घेऊ नये.
कालच शिर्डी येथे झालेल्या महा अधिवेशनामध्ये माननीय नामदार पंकजाताई मुंडे समोर येऊन गडगडा लोळण घेऊन नमस्कार केलेला आम्ही पाहिलेला आहे. अशा ह्या नौटंकी बाजने
आता जो त्यांनी स्टॅन्ड घेतलेला आहे तो नागपूरकरांच्या फुस लावल्यामुळे घेतला आहे हे परळीकर यांना ज्ञात झाले आहे. मुंडे बंधू-भगिनींनीही आता लक्षात ठेवावे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस समन्वय असणे गरजेचे आहे.
देवेंद्र फडणवीस यांना कितीही वाटले तरी, त्यांनी स्वतःच कबूल केले आहे की ओबीसी आमचा डीएनए आहे. ते ओबीसीला एवढ्या तात्काळ सोडून देतील असे आम्हास वाटत नाही. कारण त्यांनी कितीही मराठा नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी, सुरेश धस सारखे नेते फडणवीस यांच्या हातावर तुरी देऊन कधीही ते त्यांना दगा देऊ शकतात. त्यांनाही माहित आहे की, सुरेश धस ही व्यक्ती दगाबाज आहे.!
देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय गुरू लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना दगा देणारा सुरेश धस हा फडणवीस यांना दगा देणार नाही याची खात्री कोण देऊ शकतो?? देवेंद्रजी फडणवीस चाणक्य आहेत. या दारुड्याच्या ती नादी लागणार नाहीत. याची आम्हाला खात्री आहे.सुरेश धस च्या एकूण राजकारणामध्ये दगाबाजी चा संचार वावरलेला आहे. तो जो राणा भीमदेवी थाटामध्ये अंगविक्षेप करून, नौटंकी करून, हा दारुड्या गारुड्याप्रमाणे मराठवाड्यातील माणसांची करमणूक करीत आहे. ही अशी माणसे अल्पजीवी असतात.

14/01/2025

महाराष्ट्रात सद्यस्थितीला क्राईम रेटमध्ये नगर, पुणे, सोलापूर आणि नागपूर हे क्रमशः बलात्कार, अन्याय अत्याचार तसेच खून प्रकरणात पुढे आहेत. तरीही परळीची बदनामी का?

Address

Sadhana Niwas
Parli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही OBC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share