SATYASAHYADRY

SATYASAHYADRY अस्सल सातारी दैनिक

17/06/2025

पावसाची अपडेट असो वा छोट्या-मोठ्या ब्रेकिंग न्यूज.
एखादा अपघात असो वा युद्धाचे अपडेट.
याशिवाय रोजचा ई पेपर विशेष लेख आणि बरंच काही
यासाठी आत्ताच फॉलो करा आमचा व्हाट्सअप चॅनेल 1000 हून अधिक लोकांची पसंती
*सत्य सह्याद्री*
*अचूक निर्भीड सडेतोड*

16/06/2025

साताऱ्यात पावसाची संततधार सकाळपासून जोर वाढला

14/06/2025

'काँग्रेस सरकारच्या काळात दर महिन्याला एक घोटाळा उघडकीस येत होता. मात्र, मागील 11 वर्षात मोदीजींच्या सरकारमध्ये असा घोटाळा उघडकीस आलेला नाही. केंद्रात किंवा राज्यात कुठेही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत', असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे.

14/06/2025

सातारा: समर्थ मंदिर परिसरात भीषण अपघात
अपघातात एकाचा जागीच मृत्यू एसटी बसचे चाक डोक्यावरून गेल्याने एकाचा मृत्यू

महाबळेश्वर तापोळा मुख्य रस्त्यावर मांघर गोल जवळ टाटा कंपनीचा एलपीडी डंपर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात झाला सुदैवाने...
14/06/2025

महाबळेश्वर तापोळा मुख्य रस्त्यावर मांघर गोल जवळ टाटा कंपनीचा एलपीडी डंपर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात झाला सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झाली नसली तरी चालक केबिन चे मोठे नुकसान झाले आहे.
आज दुपारी दोन च्या दरम्यान महाबळेश्वर पासून पाच किमी अंतरावर मांघर गोल जवळ महाबळेश्वरहून रस्त्याच्या कामाचे डांबर घेऊन निघालेल्या एलपीडी डंपर रस्त्याच्या कडेला नाल्यात पलटी झाल्याची घटना झाली. रस्त्याला लागून असलेल्या झाडाला केबिन धडकल्याने यामध्ये केबिन चे नुकसान झाले आहे.

09/06/2025
08/06/2025

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार; तब्बल ३२ वर्षांनी मिळाला मान, पुण्याच्या बैठकीत एकमताने निर्णय

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..!पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देशसार्वजनिक अस्वछतेबाबत पालकमंत्र्यांची तीव्र न...
07/06/2025

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..!
पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

सार्वजनिक अस्वछतेबाबत पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी ..!
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले.

जिल्ह्यातील सार्वजनिक रस्ते,मंदिरे,रुग्णालये,एसटी बसस्थानक अशा ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा पसारा आणि अस्वच्छता असल्याचे दस्तुरखुद्द राज्याच्या पर्यटनमंत्री ना शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आल्यामुळे मंत्री देसाई यांनी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे पोलीस,महसूल आणि ग्राम विकास विभागाची बैठक घेतली.
या बैठकीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली एवढेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची अस्वच्छता
ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात होत आहेत त्या संस्थांनी तातडीने दखल घेण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले. गट विकास अधिकारी पाटण व मुख्याधिकारी पाटण नगरपंचायत यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात एका स्वतंत्र पथकाची नियुक्ती करणेबाबत सूचित केले. तसेच अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रस्त्याच्या कडेला रात्री अपरात्री कचरा टाकणाऱ्या व्यक्ती ना तत्काळ नोटीसा काढाव्यात. याबाबत आवश्यक ती जनजागृती देखील करावी. तसेच कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था देखील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी. यानंतरही कुणी ऐकत नसेल तर प्रसंगी अशी दुकाने किंवा हॉटेल सील करण्याचा देखील पर्याय वापरण्यात यावा असे निर्देश देण्यात आले. प्रांत अधिकारी पाटण व उपविभागीय पोलिस अधिकारी पाटण यांनी या कार्यवाहीचे संपूर्ण नियंत्रण करावे.तसेच या मुद्द्यासंदर्भात प्रांताधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांची तत्काळ बैठक घेण्याचे आदेश संबंधित गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. सुरवातीला पाटण तालुक्यात राबविण्यात येनारी ही मोहीम नंतर च्या काळात संपूर्ण सातारा जिल्ह्यात देखील राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.
सार्वजनिक ठिकाणावरील स्वच्छता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करून घ्याव्यात त्यानंतर ही अस्वच्छता दिसून आल्यास अथवा संबंधित व्यक्तींनी रात्री अपरात्री कचरा टाकल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पर्यटन मंत्री ना शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले.
सदर बैठकीस पाटण मतदारसंघातील महसूल ,पोलिस व ग्रामविकास विभागाचे विविध अधिकारी हजर होते.

06/06/2025

काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख भैय्या यांची नियुक्ती

संजय राऊत यांच्या पुस्तकाची साताऱ्यात होळी शिवसेना कार्यकर्ते आक्रमक
03/06/2025

संजय राऊत यांच्या पुस्तकाची साताऱ्यात होळी शिवसेना कार्यकर्ते आक्रमक

प्रसिद्ध फोटोग्राफर श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचे कट्टर समर्थक  माजी सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवि उर्फ प्रदीप सूर्...
24/05/2025

प्रसिद्ध फोटोग्राफर श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचे कट्टर समर्थक माजी सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवि उर्फ प्रदीप सूर्यकांत साळुंखे यांचे निधन

23/05/2025

सातारा जिल्ह्यात मुसळदार पाऊस सुरू! ढगफुटी सदृश पावसामुळे ओढे-नाले तुडुंब | Satara News

सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुळधार पाऊस पडतोय....साताऱ्याच्या चिंचणेर वंदन येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे बाजार पटांगणावर पुराचे पाणी आले..... ओढ्याला आलेल्या पुरामुळे चार ते पाच गाड्या पाण्यात फसल्या....ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि जेसीबीच्या मदतीने या फसलेल्या गाड्या सुरक्षित बाहेर काढण्यात आल्या....

Address

Ramakant Towers Shop No. 19, Yadogopal Peth
Peth
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when SATYASAHYADRY posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SATYASAHYADRY:

Share